Saturday, February 18, 2012

जळगाव शिवजयंती २०१२



छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे पुरस्कार जाहीर
Thursday, February 9, 2012 AT 3:00 PM
Tags: chatrapati shivaji brigade

जळगाव- छत्रपती शिवाजी महाराज बहुजन मित्र पुरस्कार वितरण सोहळा व शंभुराजे या महानाट्याचा प्रयोग दि. १७ रोजी सायंकाळी ५.३० वा. आयोजीत करण्यात आला आहे.
समाजाच्या तळागळातील उपेक्षीत घटकांसाठी व महाराष्ट्राच्या ऐतिहासीक परंपरेसाठी कला साहित्य संस्कृतीच्या माध्यमातुन सतत कार्य करणार्‍या व्यक्तींना छत्रपती शिवाजी ब्रिगेडतर्फे छत्रपती शिवाजी महाराज बहुजन मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा छत्रपती शिवाजी महाराज बहुजन मित्र पूरस्कार प्रतापगडाची पूर्ण बांधणी व माराठयांच्या स्मृती व शौर्य स्थळांच्या सर्ंदभात अजोड कोष बनविने, मराठी इतिहास जिवंत करणारे प्रविण भोसले सांगली आणि पतसंस्थाच्या माध्यामातुन महाराष्ट्रभर कार्य करणारे महाराष्ट्रातील शेतकरी व शेतीपुरक उद्योगांना अर्थ सहाय्य करून हजारो शेतकरी गरीब व सर्व सामान्यांना जीवनात स्वाभिमानाने उभे करणारे राधेश्यामजी चांडक बुलढाणा यांना देण्यात येणार आहे. सदरचा कार्यक्रम व शभुराजे या महानाट्याचा प्रयोग बालगर्ंधव नाटयगृह येथे दि. १७ फुबु्रवारी २०१२ शुक्रवार रोजी सायंकाळी ५.३० वा. संपन्न होणार आहे. तसेच शिवजयंतीच्या निमित्ताने संधटनेच्या वतीने विविध ऐतिहासीक क शिवकालीन पद्धतीने शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात येतो. या सोहळ्यासाठी पद्मश्री ना.धो.महानोर विशेष महानिरीक्षक टी.एस. भाल मुंबई अप्पर जिल्हाधिकारी ठाणे कैलासराव जाधव पुण्याचे सहकार विभागाचे सहनिबधंक सुनिल पवार जळगाव पिपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील अप्पर जिल्हाधिकारी सोमनाथ गुजाळ पुरूषोत्तम निकम आर.टी.ओ. जळगाव यांचेसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असुन यासाठी आनंदराव मराठे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती जय्यत तयारी करीत आहे. शंभुराजे महानाटयासाठी विद्यार्थ्यांंना संभाजी राजांचा पराक्रमी इतिहास कळावा म्हणुन विशेष सवलत देण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला नाटय प्रेमी, शिवप्रेमी इतिहास प्रेमी रसीकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे मार्गदर्शक दादनेवे, डॉ. दिपक पाटील, डॉ. धनंजय बेदे, शशिकांत धांडे डॉ. स्नेहल फेगडे अर्जूनराव जगताप, दत्तात्रय पाटील, पंढरी पाटील, किरण देखने, रोशन मराठे, संजय आवटे, नितीन चौबे, आनदराव साळुंखे, रणजित मोरे, प्रा. संदिप पाटील, प्रमोद मोरे, यशवंत महाडीक, संजय काळे, गिरीष मिस्त्री, मनोज पाटील, महेश पाटील, अमित पाटील, विजय पाटील, डॉ. गणेश पाटील, यांनी केले आहे.

सोलापूर शिवजयंती २०१२


शिवजयंती साजरी न करणा-या शासकीकार्यालयांंवर कारवाईची मागणी

(Updated on 07/02/2012 0 : 44 IST)
शिवजयंती साजरी न करणा-या शासकीकार्यालयांंवर कारवाईची मागणी
सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व शाळा महाविद्यालयांमध्ये शासकीय नियमानुसार १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्याचे आदेश पारीत करावेत. तसेच शिवजयंती साजरी न करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शासकीय नियमानुसार १९ फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टी देण्यात आली आहे. तरीही त्यादिवशी शिवजयंती साजरी केली जात नाही.
त्यामुळे अशा शाळा, महाविद्यालये व शासकीय कार्यालयांवर कायदेशीर कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेड तर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना शहराध्यक्ष महेश सावंत, विजय भोसले, सचिन गायकवाड, नानासाहेब भोसले, विकी सूर्यवंशी, किशोर मोरे, सुरज मोरे, अंबादास माने आदी उपस्थित होते.

शिवजन्मोत्सव समितीची बैठक
मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समिती अकलूजतर्फे दि. १९ रोजी शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी नियोजनाची बैठक मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील यांनी बोलावली आहे. ही बैठक १४ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय अकलूज येथे होईल. मध्यवर्ती नवरात्र महोत्सव, मध्यवर्ती गणेशोत्सव त्याचप्रमाणे मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीमार्फत लहान मुलांना किल्ले बनविणे, शिवाजी महाराजांचा संदेश घराघरात जिवंत ठेऊन राष्ट्रभक्ती जागृत ठेवण्याचे काम हे मंडळ दरवर्षी करत असते. तरी शिवप्रेमींनी या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्षांनी केल्याचे पत्र दिले आहे.

लातूर शिवजयंती २०१२

मुस्लिम बांधव साजरी करणार शिवजयंती औसा येथील आदर्श उदाहरण

लातूर। दि. १८ (प्रतिनिधी)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात ५७ टक्के मुस्लिम सैनिक होते. चार अंगरक्षक, तोफखाना प्रमुख, आरमार प्रमुख, अशा महत्वाच्या पदावरही मुस्लिम सैनिक होते. त्यामुळे औश्यात मुस्लिम समाजबांधवांकडून शिवजयंती साजरी करण्यात येत असल्याची माहिती मुस्लिम समाज सार्वजनिक शिवजयंती महोत्सव औसाचे कार्याध्यक्ष रियाज पटेल यांनी लातूर येथे शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

मुस्लिम समाज सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने औसा येथे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता औसा बसस्थानकासमोर ध्वजारोहण व प्रतिमा पूजन करण्यात येईल. २0 रोजी सायंकाळी ७ वाजता नागपूर येथील प्रा. जावेद पाशा यांचे ‘बहुजनांच्या कल्याणासाठी शिवराज्य’ या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. मुजाहीद शरिफ राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून मोहसीन खान, अँड. गोविंद सिरसाठ, खुशालराव जाधव,कामाजी पवार उपस्थित राहणार असल्याचे रियाज पटेल म्हणाले. पत्रपरिषदेस अँड. शहानवाज पटेल, अँड. फेरोज पठाण, मुजफ्फरअली इनामदार, सुलतान बागवान, ईस्माईल शेख, हकिम बागवान, माजीद काझी, चाँद पटेल उपस्थित होते.


सार्वजनिक शिवजयंती महोत्सव

Updated on : 11/02/2012 23 : 6

प्रतिनिधी उदगीर : प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८२ वी जयंती दि.१९ फेब्रुवारी २०१२ रोजी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील एकंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात येणार आहे. गेल्या पाच वर्षापासून शिवजयंतीचे आयोजन करण्यात येत असून मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी वेशभूषा, पोवाडे, शिवजयंतीवर आधारीत गीते सादर केली जाणार आहेत. कार्यक्रमात उंट, घोडे, लेझिमपथक, झांज पथक, झेंडा पथक, वासुदेव, आराधी, गोंधळी, पोतराज मसनजोगी यांचा सहभागाने देखाव्यासह शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. उदगीर शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, तांत्रिक प्रशिक्षण संस्था, संगीत विद्यालय यांनी सहभागी होण्याचे आवाहन शिवजयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रा.व्ही.एस. कणसे यांनी केले आहे.

रत्नागिरी शिवजयंती २०१२

शिवजयंती दिनी किल्ले विजयदुर्ग भ्रमण; मालिकांमधील कलाकारांची उपस्थिती!

चिपळूण
सुमारे ८ एकर क्षेत्र व्यापलेला सुस्थितीतील तब्बल २० बुरुजांनी समुद्री आक्रमणास तोंड देणाऱ्या किल्ले विजयदुर्गच्या भ्रमंतीचे आयोजन (दि. १९ ते २०) छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८६ व्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले आहे. महाशिवरात्रीचे औचित्य साधून उपस्थितांना कोकणची दक्षिण काशी असलेल्या, इ.स. ११०० मध्ये स्थापित यादवकालीन स्वयंभू श्रीक्षेत्र कुणकेश्वर दर्शन घडणार आहे. मुंबईतील ‘टीम पूर्णा’ने या उपक्रमाचे आयोजन केले असून या भ्रमंतीदरम्यान टेलिव्हिजनवरील सध्याच्या गाजत असलेल्या विविध मालिकांतील सिताऱ्यांची उपस्थिती भ्रमंतीच्या उत्साहात अधिक रंगत आणणार आहे. यात प्रामुख्याने कॉमेडी एक्स्प्रेस फेम प्रदीप पटवर्धन, वादळवाट, या सुखांनो या फेम विघ्नेश जोशी, लेखक समीर चौघुले, धिंका चिका फेम रमेश वाणी, गायक गौतम मुरुडेश्वर, गायिका कल्याणी जोशी, फैयाझ आदींची उपस्थिती राहणार आहे. या अनोख्या, संस्मरणीय भ्रमंतीचे क्षण अनुभवण्यासाठी तब्बल ८० एकरांत वसलेल्या टेकडीवरील आमराईत राहण्याची अनुभूती घेण्यासाठी कांचन आठले- मो. ९६१९२४६४१९, गणेश रानडे- मो. ९४२२४३३६७६ येथे संपर्क साधावा.

पुणे शिवजयंती २०१२

पुणे महानगरपालिकेचा महाराजांना मानाचा मुजरा



शिवजयंती निमित्त आज पुण्यात शिवपुतळ्यावर पुष्पवृष्टी



पुण्यात 'दिपोत्सव'


शिवजयंती च्या पुर्वसंध्येला AISSPMS पुणे येथील शिवरायांच्या जगातील सर्वात पहिला पुतळ्यासमोर 'दिपोत्सव' करताना संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते

शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत बदल
म. टा. प्रतिनिधी पुणे

शिवजयंतीनिमित्त रविवारी (१९) शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. संत कबीर चौक ते सोन्या मारुती चौकापर्यंतची वाहतूक मिरवणूक संपेर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच मिरवणूक मार्गालगतच्या शंभर फूट परिसरात वाहने उभी करण्यास बंदी आहे. सकाळी आठ वाजल्यापासून हा बदल करण्यात येणार आहे.

मिरवणूक संपेपर्यंत वाहनचालकांनी अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी केले आहे.

शहरातील मुख्य मिरवणुकीला भवानी पेठेतील भवानीमाता मंदिरापासून दुपारी चार वाजता प्रारंभ होणार आहे. त्यामुळे संत कबीर चौक, अरुणा चौक, डुल्या मारुती चौक, तांबोळी मशीद चौक, फडके हौद चौक, जिजामाता उद्यान, शिवाजी रोड या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. तसेच; हमाल पंचायत, अल्पना टॉकीज, सिटी पोस्ट चौक हा मार्गही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

लष्कर परिसरातील पूना कॉलेज, मिरवणूक शिवाजी पुतळा चौकात जाणार आहे. त्यामुळे मार्गावराील वाहतूक बंद राहणार आहेत. तसेच पूना कॉले, हरकानगर, जुना मोटार स्टॅण्ड हा मागही बंद ठेवण्यात येणार आहे.




छत्रपति शिवाजी महाराजांची पालखी यात्रा"(वर्ष दुसरे)

दि.३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी २०१२.
"किल्ले शिवनेरी"ते"शिवतीर्थ किल्ले रायगड"
देशातील शिवरायांची पहिली (धारकरयाची) वारी

"राजाश्रयाविराज ित, सकलगुणमंडळीत, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराजाधिराज महाराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय"

शुक्रवार ३ फेबृ.२०१२
वेळ स्थळ कार्यक्रम / वैशिष्ट्ये:
स. ६.०० दत्त मंदिर (हॉल) जुन्नर सकाळचा नास्ता व चहा
स. ६.३० शिवजन्म स्थान शिवनेरी किल्ला अभिषेक राज्यातील ४०० गडावरून आणलेल्या तसेच बारा ज्योतिर्लिंग व अष्टविनायक येथून आणलेल्या पवित्र जलाने अभिषेक सोहळा
स. ८.०० श्री. शिवछत्रपती महा विद्यालय जुन्नर व्याख्यान : छत्रपती शिवरायाचे मावळे व्याख्याते:ह भ प रोहिदास हांडे महाराज
स. ९.३० जयहिंद प्लॉलीटेक्निक कॉलेज मर्दानी खेळ कार्यक्रम स. १०.३० नारायणगाव पालखीचे नारायण गाव येथे आगमन स. १०.४० नारायणगाव बसस्थानक शिवकालीन युद्ध प्रात्यक्षिके दु. १२.०० मंचर पालखीचे मंचर येथे आगमन दु. १२.१० विघ्नहर मंगल कार्यालय मंचर भोजन
दु. १.३० छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर व्याख्यान : छत्रपती शिवरायाची दुरदुष्टी व्याख्याते:श्री रमेश शिंदे (हिंदू जनजागृती समिती प्रवक्ते )
दु. ३.०० कृषी उत्पन बाजार समिती खेड व्याख्यान : विषय राजमाता जिजाऊ
व्याख्याते:ह भ प कांचनताई नेहरे

सां ६.०० संग्रामदुर्ग किल्ला(चाकण)
व्याख्यान : छत्रपती शिवरायांचा आठवावा प्रताप
व्याख्याते: प्रा.मोहन शेटे (इतिहास संशोधक)

सां ८.३0 आळंदी येथे आगमन रात्री ८.४५ राट्रीय रेड्डी वलंम संस्था,आळंदी भोजन रात्री ९.३० राट्रीय रेड्डी वलंम संस्था,आळंदी शिवभक्तांचा विविध गुण दर्शनाचा कार्यकम व मुक्काम

शनिवार ४ फेबृ.२०१२
वेळ स्थळ कार्यक्रम / वैशिष्ट्ये:
स. ७ ०० राट्रीय रेड्डी वलंम संस्था,आळंदी सकाळचा नास्ता व चहा
स. ७ ३० आळंदी ज्ञानेश्वर माउलीच्या पादुकांचे दर्शन
स. ९.०० देहूगाव मोशी मार्ग पालखीचे देहू येथे आगमन व जगदगुरु श्री. तुकाराम महाराज यांच्या पादुका दर्शन
स. १०.०० बजाज मेटेरियल गेट,यमुनानगर पालखीचे आगमन स. १०.३० भक्ती - शक्ती चौक निगडी पालखीचे भक्ती - शक्ती आगमन स. १०.४० भक्ती - शक्ती उद्यान शिवकालीन युद्ध प्रात्यक्षिके स ११ .३० निगडी पालखीचे निगडी येथे आगमन स. ११.४५ आकुर्डी पालखीचे आकुर्डी येथे आगमन दु. १२.०० चिंचवड स्टेशन पालखीचे चिंचवड स्टेशन येथे आगमन दु. १२.०५ चिंचवड ते आंबेडकर पुतळा छत्रपती शिवरायांच्या पालखीची भव्य मिरवणूक दु १.०० आंबेडकर पुतळा, पिंपळी चौक पालखीचे पिंपळी येथे आगमन दु १.१५ एच. ए कॉलनी पिंपळी पालखीचे एच. ए कॉलनी येथे आगमन दु १.२५ ऑफिसर क्लब एच. ए कॉलनी भोजन दु २.३० कासारवाडी पालखीचे कासारवाडी येथे आगमन दु ३.०० दापोडी मर्दानी खेळ सां ४.०० वाकडेवाडी मर्दानी खेळ सां ५ .०० जंगली महाराज मार्ग छ. संभाजी चौक छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण
सां ७ .३० विठ्ठल मंदिर मनपा शाळेजवळ कर्वेवाडी व्याख्यान : छत्रपती शिवरायांचे प्रशासन व आजचे शासन व्याख्याते: श्री.बी.जे.कोळस े पाटील (मा. न्यायमूर्ती ) रात्री ९.५० विठ्ठल मंदिर कर्वेवाडी भोजन व मुक्काम

रविवार ५ फेबृ.२०१२
वेळ स्थळ कार्यक्रम / वैशिष्ट्ये:
स. ७ ३० विठ्ठल मंदिर कर्वेवाडी सकाळचा नास्ता व चहा स. ८ .०० कोथरूड वरून प्रस्तान चांदणी चौक मार्गे शिंदेवाडी स. ९ .३० शिंदेवाडी शिंदेवाडीत आगमन व मर्दानी खेळ स. ११ ०० पौंड पौंड येथे आगमन व शाहिरी कार्यक्रम दु. १२ .३० शेरे पालखीचे शेरे येथे आगमन दु १ .०० शेरे भोजन दु. २.०० शेरे शाहिरी कार्यक्रम सां ६ .३० निजामपूर पालखीचे निजामपूर येथे आगमन मर्दानी खेळ सां ७ .३० मानगाव पालखीचे मानगाव येथे आगमन
रात्री ८.०० अशोक दादा साबळे विद्यालय व्याख्यान :अपरिचित छत्रपती शिवराय व्याख्याते:श्री रवींद्र यादव (इतिहास संशोधक)
रात्री १०.०० अशोक दादा साबळे विद्यालय भोजन

सोमवार ६ फेबृ.२०१२
वेळ स्थळ कार्यक्रम / वैशिष्ट्ये:
स. ७ ०० अशोक दादा साबळे विद्यालय सकाळचा नास्ता व चहा स. ७ ३० मानगाव छत्रपती शिवरायांच्या पालखीचे भव्य मिरवणूक स. ९ .३० अशोक दादा साबळे विद्यालय मर्दानी खेळ स. ११ ३० लोणेरे पालखीचे लोणेरे येथे आगमन स. ११ ४० लोणेरे युद्ध प्रात्यक्षिके दु. १ .०० महाड पालखीचे महाड येथे आगमन दु १ .१५ जाकमाता मंदिर ते शिवाजी चौक भोजन दु. २.ते ४ जाकमाता मंदिर ते शिवाजी चौक पालखी विश्रांती सां. ४ .ते ६ जाकमाता मंदिर ते शिवाजी चौक छत्रपती शिवरायांच्या पालखीचे भव्य मिरवणूक
सां ६ .३० महादेव मंदिर महाड
व्याख्यान : पानिपतचा रणसंग्राम
व्याख्याते:श्री पांडुरंग बलकवडे (इतिहास संशोधक)
रात्री ९ .०० पाचाड पालखीचे पाचाड येथे आगमन रात्री ९ .३० पाचाड भोजन व मुक्काम रात्री १० .३० पाचाड जागरण गोंधळ कार्यक्रम

मंगळवार ७ फेबृ.२०१२
वेळ स्थळ कार्यक्रम / वैशिष्ट्ये:
स. ७ ३० पाचाड सकाळचा नास्ता व चहा
स. ७ .४५ जिजाऊ स्मारक,पाचाड राजमाता जिजाऊच्या मूर्तीचे दर्शन
स. ०८.०० छत्रपती शिवरायांच्या पालखीचे रायगडाकडे प्रस्तान

स. १० ३० किल्ले रायगड गडावरील शिवरायांचा मूर्तीला राज्याभिषेक

स. ११ .३० होळीचा माळ रायगड शिवकालीन मर्दानी प्रात्यक्षिके दु १२.३० होळीचा माळ रायगड जागरण गोंधळ दु. १.३० किल्ले रायगड भोजन दु. २ .३० आभार व शिवरथ यात्रेचा समारोप..
"बहुत काय लिहावे, अगत्य येण्याचे करावे"
_____________________________
शिव जयंती महोत्सव-२०१२
व
जनकल्याण स्वयंसेवी पुरस्कार २०१२
दिनांक : १९ फेब्रुवारी २०१२
स्थळ: शिव छत्रपती क्रिडा संकुल, म्हाळुंगे, ता.मुळशी, जि.पुणे- ४११०४५
उद्घाटक
मा. छत्रपती उदयनराजे भोसले
(खासदार)

___________________________________________________


मराठा लायन्स
|| सन्मान मराठीचा … अभिमान महाराष्ट्राचा ||

श्री शिवजयंती कार्यक्रम २०१२


१९ फेब्रु. २०१२
“प्रेरणा ज्योत” सिंहगड ते भारती विद्यापीठ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा.


१९ फेब्रु. २०१२

सकाळी ९ वाजता – शिव मूर्ती पुजन

सायंकाळी ७ वाजता : दीपोत्सव – छत्रपती शिवजी महाराज पुतळा भारती विद्यापीठ, पुणे.


२२ फेब्रु. २०१२

श्री शिवजयंती व्याख्यान
वक्ते : प्रा. नामदेराव जाधव
( राष्ट्रामाता जिजाऊ साहेब यांचे वंशज, सुप्रसिद्ध इतिहास संशोधक)

वेळ : सकाळी १० वाजता स्थळ : मेडिकल ऑडिटोरीयम, भारती विद्यापीठ, पुणे – ४३

________________________________________________

|| भव्य शिवजयंती महोत्सव ||


Venue : स्थळ:- मु. पो. उंबरे(शिव भूमी), ता. भोर, जि. पुणे.

Created By : Ganesh Raje


|| भव्य शिवजयंती महोत्सव ||



(रविवार, दि. १९ फेब्रुवारी २०१२.)

स्थळ:- मु. पो. उंबरे(शिव भूमी), ता. भोर, जि. पुणे.



सर्व शिवभक्तांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे कि,

सालाबादप्रमाणे यंदाही १२ गाव मावळातील "हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान" आणि "श्री भैरवनाथ तरुण मित्र मंडळ - उंबरे" यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवरायांच्या ३८२ व्या जयंती निमित्त भव्य महोत्सव आयोजित केला आहे.

या महोत्सवाअंतर्गत "किल्ले अजिंक्यतारा - सातारा" येथून दिमाखात आणि वाजत गाजत शिवज्योत आणली जाणार आहे.

त्याचप्रमाणे, शिवप्रतिमेचे पूजन आणि भव्य-दिव्य मिरवणूक होणार आहे.



तरी सर्व शिवप्रेमींनी या महोत्सवात सहभागी होऊन शिवरायांना विश्वव्यापक बनवावे,

हि नम्र विनंती......



|| १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करूया, छत्रपती शिवरायांना विश्वव्यापक बनवूया ||

"जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय"



आयोजक:-

"हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान."

"श्री भैरवनाथ तरुण मित्र मंडळ - उंबरे."



संपर्क:-

गणेशराजे खुटवड (पाटील) - ९५४५९५२४२९.

समीर खुटवड (पाटील) - ९८५०८१५२३१.

तुषार पवार - ८६०५४२७४१५.

सचिन(पप्पू) मोरे - ९६३७१५५२०५.

राहुल खुटवड (पाटील) - ९७६७९०२०३१.

सचिन कांबळे - ९९२२२३२०८७.

यवतमाळ शिवजयंती २०१२


स्थळ:- शिवतीर्थ, जेसिस कॉलनी, घाटंजी
दि. १८ व १९ फेब्रुवारी २०१२

कार्यक्रम पत्रिका

दि.१८ फेब्रुवारी
दुपारी ३ वाजता
जलाराम कॉम्पुटर्स द्वारा प्रायोजीत
तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा
विषय:- भारताचा स्वातंत्र्य लढा
गट अ ( वर्ग ११ ते महाविद्यालय)
प्रथम बक्षिस १००१ रू.
प्रोत्साहनपर १०१ रूपयांची १० बक्षिसे
गट ब (वर्ग ७ ते १०)
प्रथम बक्षिस १००१ रू.
प्रोत्साहनपर १०१ रूपयांची १० बक्षिसे

सायंकाळी ६ वाजता
उद्घाटन सोहळा, सत्कार समारंभ
खुली समुहनृत्य स्पर्धा
प्रथम बक्षिस २००१ रू.
(स्व.मारोतराव अक्कलवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुधाकर अक्कलवार यांचेकडून)
द्वितीय बक्षिस १००१ रू.
(कृष्णा कॉम्पुटर्स, प्रो.प्रा.अरविंद मानकर यांचेकडून)
प्रवेश फि. १०१ रू.

दि.१९ फेब्रुवारी
सकाळी ८ वाजता
मॅराथॉन स्पर्धा
गट अ (खुला)
प्रथम बक्षिस १००१ रू.
(विनायका एजंसी, प्रो.अनुप देव यांचेकडून)
द्वितीय बक्षिस ५०१ रू.
(एकविरा डेली निड्स, प्रो.मनोज ढगले यांचेकडून)
गट ब (वय ६ ते १४ वर्ष)
प्रथम बक्षिस ७०१ रू.
(निमकर बिछायत व कॅटरर्स, प्रो.योगेश व मंगेश निमकर यांचेकडून)
द्वितीय बक्षिस ५०१ रू.
(पुर्ती किराणा स्टोअर्स, प्रो.प्रमोद टापरे यांचेकडून).

सकाळी ११ वाजता
स्वातंत्र्यसेनानी स्व.कवडूजी पिसाळकर स्मृतीप्रित्यर्थ
विदर्भस्तरीय वादविवाद स्पर्धा
विषय:- प्रसारमाध्यमांची वाढती व्यावसायीकता लोकशाहीस मारक .
प्रवेश फि.१०१ रू.
प्रथम बक्षिस ३००१ रू.
(स्व.डॉ.ज्ञानेश्वर राऊत स्मृतीप्रित्यर्थ अमोल राऊत यांचेकडून)
द्वितीय बक्षिस २००१ रू.
(भरत खाटीक यांचेकडून)
तृतिय बक्षिस १००१ रू.
(महालक्ष्मी एजंसी, प्रो.पंकज तन्ना यांचेकडून)

सायंकाळी ५ वाजता
खुली फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धा
नि:शुल्क
प्रथम बक्षिस ७०१ रू.
(अनिता व-हाडे यांचेकडून)
द्वितीय बक्षिस ५०१ रू.
(मोहित हेयर पार्लर, प्रो.विशाल यल्लरवार यांचेकडून)

सायंकाळी ६ वाजता
शिवपुजन व व्याख्यान
प्रमुख वक्ते:- डॉ.साहेबराव खंदारे (ईतिहास संशोधक तथा सुप्रसिद्ध वक्ते, परभणी)

सायंकाळी ७ वाजता
वीर राजे संभाजी पुरस्कार वितरण समारंभ
पुरस्काराचे मानकरी :- दादाजी खोब्रागडे, (एच.एम.टी.तांदुळाचे संशोधक, चंद्रपुर)
कार्यक्रमाचे अध्यक्ष :- वसंतराव पुरके, (उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा)

सायंकाळी ८ वाजता
झी तडका व झी मराठी फेम
अजितकुमार कोष्टी, पुणे यांचा
धमाल विनोदी कार्यक्रम

कॉमेडी एक्स्प्रेस

सर्व स्पर्धकांसाठी संपर्क व नोंदणी
जलाराम कॉम्पुटर्स, घाटंजी
९४२१७७३८४२
९४२३५४५७९७
७५८८१८८३७०
९४२१७७०८८५
ओम साई मेडीकल, घाटंजी
९४२००४७२६७

सर्व शिवप्रेमींना आग्रहाचे निमंत्रण

आयोजक:- राजे छत्रपती सामाजीक संस्था घाटंजी, संभाजी ब्रिगेड, घाटंजी

कर्नाटक शिवजयंती 2012

कर्नाटक सरकार साजरी करणार शिवजयंती
- वृत्तसंस्था
Friday, February 10, 2012 AT 01:15 AM (IST)
बेळगाव - संपूर्ण राष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या वर्षापासून कर्नाटक शासनातर्फे साजरी करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला. आमदार अभय पाटील व आमदार संजय पाटील हे सहा महिन्यांपासून त्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, मुख्यमंत्री सदानंद गौडा व कन्नड सांस्कृतिक विभागाचे मंत्री गोविंद कार्जोळ यांनी त्याला मंजुरी दिली आहे.

यापुढे प्रत्येक जिल्ह्यात सरकारी पातळीवर शिवजयंती साजरी होणार आहे. बेळगावात शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. यापुढे त्याला सरकारी हातभार लागणार असल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहात आणखी भर पडणार आहे.

मुख्यमंत्री गौडा म्हणाले, ""छत्रपती शिवराय हे राष्ट्रपुरुष आहेत. ते कोणत्या एकाच प्रदेशाचे म्हणून वाद निर्माण करणे योग्य नाही. काही दिवसांपूर्वी दावणगेरी येथे त्यांचा अश्‍वारूढ पुतळा उभारला. राज्यातील तीसही जिल्ह्यांत शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदापासून त्याची अंमलबजावणी होईल.'