Saturday, February 19, 2011

नागपुर शिवजयंती २०११

शहरात शिवजयंती उत्साहात साजरी
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 20, 2011 AT 12:15 AM (IST)
नागपूर - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरातील विविध राजकीय, सामाजिक संस्थांनी उत्साहात साजरी केली. यामध्ये विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक उत्साहात सहभागी झाले होते.

राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानातर्फे महापौर अर्चना डेहनकर यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सलामी प्रात्यक्षिक सादर केले. त्यात प्रहार सैनिक शाळा, राजेंद्र हायस्कूल, उमिया शंकर विद्यालयासह विविध शाळा सहभागी झाल्या होत्या. यावेळी विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी राजे मुधोजी भोसले, आमदार दीनानाथ पडोळे, क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, नगरसेवक मनोज साबळे, बंडू राऊत, डॉ. हंबीरराव मोहिते, मोहन नाहातकर, गजानन ठाकरे, दुर्गाताई रेहपांडे उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गोविंद कॉम्प्लेक्‍स येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष रमेशचंद्र बंग यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी अजय पाटील, नगरसेविका प्रगती पाटील, शहर सचिव चरणजितसिंह चौधरी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेतर्फे गांधी गेट महाल येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला महापौर अर्चना डेहनकर यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपमहापौर शेखर सावरबांधे, सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, स्थायी समिती अध्यक्ष संदीप जोशी, शहर अध्यक्ष अनिल सोले, आमदार विकास कुंभारे, नगरसेवक गिरीश व्यास, नगरसेवक मनोज साबळे उपस्थित होते. तसेच महानगरपालिका मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला मुख्य अग्निशमन अधिकारी चंद्रशेखर जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गुजरवाडी शनिवारी वाडीत डालडा कंपनी चौकात शिवाजी महाराज यांच्या छायाचित्राला मालार्पण करून या परिसरातील लहान मुलांना मिठाईचे वितरण करण्यात आले. यावेळी रमेश नाचनवार, शहर संपर्कप्रमुख अरुण कुमार मौंदेकर, मो. इकबाल रिझवी, विक्रम गुप्ता उपस्थित होते.

नागपूर शहर कॉंग्रेसतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम कॉंग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी पुतळा महाल येथे आयोजिण्यात आला होता. यावेळी आमदार दीनानाथ पडोळे, माजी आमदार यादवराव देवगडे, विजय जिचकार, यादवराव शिरपूरकर उपस्थित होते.

याशिवाय महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीअंतर्गत नागपूर शहर मध्य नागपूर अनुसूचित जाती विभाग, आझाद भीम सेना, रिपब्लिकन युथ फोर्स, अखिल भारतीय मराठा महासंघ, हंसापूर नागरिक मंच, भारतीय रिपब्लिक परिषद, मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर सेवा प्रतिष्ठान, ऑल इंडिया बॅकवर्ड एम्प्लॉईज फेडरेशन, रिपब्लिकन आघाडी, भारतीय दलित साहित्य अकादमी, आंबेडकरी विचार मोर्चा, भारतीय नागरिक संघर्ष मंच, भारतीय बहुजन विकास परिषद, सामाजिक एकात्मता ग्रंथालय, युनायटेड स्टुडन्ट असोसिएशन, सामाजिक सुरक्षा मंच, पांढरबोडी, ऑल इंडिया बॅकवर्ड एम्प्लॉईज फेडरेशन, नागपूर शहर कॉंग्रेस सेवादल, छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती, भारतीय जनता पक्ष, जेसी नागपूर कळमना सिटी, सदर गांधी चौक ऑटो स्टॅण्ड, आपुलकी बहुउद्देशीय संस्था, भारतीय उत्तर भारतीय आघाडी, राधिकाताई पांडव चॅरिटेबल ट्रस्ट, होमगार्ड वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वॉर्ड क्रमांक 9, डेक्कन युथ वेलफेअर ऑर्गनायझेशनसह विविध संस्थांनी शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेतले.

No comments: