शिवजयंती - 19 February - Shivjayanti

Shivjayanti Festival 2009,2010,2011

Sunday, February 20, 2011

सोलापुर शिवजयंती २०११




Posted by Dr.Kadam at 1:02 AM
Labels: chhatrapati festival, shivaji maharaj birth anniversary, shivaji maharaj jayanti, shivjayanti 2011, solapur, शिवाजी महाराज जयंती २०११, सोलापुर

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

शिवजयंती उत्साहात


शिवजयंती २०१२ विशेष
शिवनेरी शिवजयंती २०१२
कर्नाटक शिवजयंती २०१२
गोवा शिवजयंती २०१२
पुणे शिवजयंती २०१२
सोलापूर शिवजयंती २०१२
जळगाव शिवजयंती २०१२
लातूर शिवजयंती २०१२
रत्नागिरी शिवजयंती २०१२
यवतमाळ शिवजयंती २०१२
वाशीम शिवजयंती २०१२
कोल्हापूर शिवजयंती २०१२
बीड शिवजयंती २०१२
जालना शिवजयंती २०१२
औरंगाबाद शिवजयंती २०१२
सातारा शिवजयंती २०१२
अहमदनगर शिवजयंती २०१२
_____________________________

शिवनेरी शिवजयंती २०११
पुणे शिवजयंती २०११
सातारा शिवजयंती २०११
कोल्हापुर शिवजयंती २०११
नागपुर शिवजयंती २०११
मुंबई शिवजयंती २०११
गोवा शिवजयंती २०११
रायगड शिवजयंती २०११
अहमदनगर शिवजयंती २०११
सोलापुर शिवजयंती २०११
तुळजापूर शिवजयंती २०११
औरंगाबाद शिवजयंती २०११
नाशिक शिवजयंती २०११
कल्याण-डोंबिवली शिवजयंती २०११
सांगली शिवजयंती २०११
ठाणे शिवजयंती २०११
जळगाव शिवजयंती २०११
कोकण शिवजयंती २०११
अकोला शिवजयंती २०११
वाशिम शिवजयंती २०११
यवतमाळ शिवजयंती २०११
मराठवाडा शिवजयंती २०११
नांदेड शिवजयंती २०११
हिंगोली शिवजयंती २०११
परभणी शिवजयंती २०११
धुळे शिवजयंती २०११
नंदुरबार शिवजयंती २०११

१९ फेब्रुवारी २०११ शिवजयंती

१९ फेब्रुवारी २०११ शिवजयंती

संभाजीराजे आणि उदयनराजे

संभाजीराजे आणि उदयनराजे

शिवजयंती-शिवरायांच्या वंशजांची मते

युवराज संभाजीराजे छत्रपती कोल्हापूर ह्यांचे आवाहन..
शिवजयंती तारीख आणि तिथी वाद दुर्दैवी आहे..राजकीय पक्षांनी ह्यावर राजकारण करू नये..शिवजयंती १९ फेब्रुवारी तारखेप्रमाणेच साजरी करावी..
राजमाता कल्पनाराजे आणि छत्रपती उदयनराजे भोसले,सातारा ह्यांचे आवाहन..
शिवजयंती हि तारखेप्रमाणेच साजरी करावी..जगभरात शिवजयंती व्हावी असे वाटत असेल तर तारीख हाच योग्य पर्याय आहे..त्या मुले १९ फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करावी..

शिवजयंती तारखेप्रमाणे साजरी करावी


छत्रपती शिवरायांना जगभर पोचवण्यासाठी शिवजयंती तारखेप्रमाणे साजरी करावी, त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण आणू नये, असे मत 'आजचा सवाल'च्या व्यासपीठावर व्यक्त झाले.


शिवजयंतीच्या तारखेच्या वादामागे राजकारण आहे का? या विषयावरील आजच्या चर्चेत संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड, ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे, शिवनेरी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष बिंदू माधव जोशी, शिवसेना प्रवक्त्या नीलम गोर्‍हे सहभागी झाले होते.


सुरुवातीला प्रवीण गायकवाड म्हणाले, 1869मध्ये महात्मा फुले यांनी पहिल्यांदा रायगडावर जाऊन शिवरायांची समाधी शोधली. शिवरायांवर दीर्घ पोवाडा रचला. त्यानंतर अनेक पुरावे मिळाले. तिथीचा वाद संपवण्यासाठी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी तज्ज्ञांची समिती नेमली. त्यांनी फाल्गुन वद्य तृतीया 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 ही शिवरायांची जन्मतारीख नक्की केली. तर भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात 19 फेब्रुवारी हीच तारीख नक्की करण्यात आली. तसा जीआरही काढण्यात आला. पण आता हिंदुत्त्वाच्या मुद्द्याकडे वळल्याने शिवसेना तिथीचा आग्रह धरत आहे.


तर शिवजन्मतिथीत शिवसेना किंवा अन्य पक्षांचा काहीही संबंध नाही. फाल्गुन वद्य तृतीया ही शिवजन्मतिथी लोकमान्य टिळकांच्या काळापासून साजरी केली जात आहे. मी स्वत: 1980पासून शिवनेरीवर जाऊन तिथीनुसार शिवजयंती साजरी करणे सुरू केले. त्यामुळे तिथीनुसार जयंती साजरी करणे हे संयुक्तिक आहे, असे बिंदुमाधव म्हणाले.


त्यावर बिंदुमाधव शिवजयंतीचा आग्रह परशुरामाच्या जन्मदिवसाच्या दिवशी करत आहेत. पण आता आपल्या लोकांना, तरूणांना तिथी नव्हे तर तारखा समजणे सोयीचे जाते, म्हणून जयंती तारखेने साजरी करणे सोयीचे आहे, असे गायकवाड म्हणाले.


तर जेधे शकावली, परमानंदाचे शिवभारत, राजस्थानातील शिवरायांची कुंडली तसेच ब्रिटीश काळातील इतर साधने उपलब्ध झाल्यानंतर 19 फेब्रुवारी 1630 या तारखेलाच शिवरायांचा जन्म झाल्याचे नक्की झाले आहे. पण हिंदुत्त्ववाद्यांना ही जयंती तिथीनुसारच व्हावी, असे वाटते असे सदानंद मोरे म्हणाले.


त्यावर तुमचा 19 फेब्रुवारीला विरोध का? असे 'आयबीएन-लोकमत'चे संपादक निखिल वागळे यांनी बिंदुमाधव यांना विचारले. त्याला उत्तर देताना बिंदुमाधव म्हणाले, भारतात आजही सर्व गोष्टी तिथीवर चालतात. ब्रिटीशांपूर्वीच्या घटना तिथीवर आणि ब्रिटीशांनंतरच्या घटना तारखेवर असे आता आपण ठरवावे.

यावर मग आता हिंदुत्त्ववाद्यांनीही तिथीप्रमाणे आपले वाढदिवस साजरे करावेत, असे मोरे म्हणाले.


तर बिंदुमाधव यांच्या मुद्द्याचे समर्थन करताना नीलम गोर्‍हे म्हणाल्या, आपले सगळे सण तिथीप्रमाणे साजरे होतात. त्यामुळे शिवजयंतीही तिथीप्रमाणे साजरी व्हावी.


19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्यासाठी गोवा सरकारने प्रत्येक ग्रामपंचायतीला 50 हजार रुपये देण्याचा आदर्श उपक्रम राबवला. त्यामुळे खर्‍या अर्थाने शिवराय वैश्विक पातळीवर पोहोचवायचे असतील तर 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करावी, असे गायकवाड म्हणाले.
त्यावर शिवराय हे महाराष्ट्राचे मर्मस्थान आहे. त्यामुळे त्यावरून राजकारण होतच राहणार असे मोरे म्हणाले.
तर चर्चेचा समारोप करताना वागळे म्हणाले, शिवजयंतीचा वाद आता थांबावा. रयतेने वर्षाचे 365 दिवस शिवजयंती मनोमन साजरी करावी. शिवरायांच्या कार्याचे स्मरण करावे.

शिवजयंती उत्सव, दिल्ली

शिवजयंती उत्सव, दिल्ली
संसद प्रांगण,दिल्ली..
मान्यवरांच्या उपस्थितीत शिवपुतळा पूजन आणि अभिवादन कार्यक्रम

शिवजयंती महोत्सव २०११,महाराष्ट्र राज्य

शिवजयंती महोत्सव २०११,महाराष्ट्र राज्य

शिवजन्मस्थळ - शिवनेरी किल्ला येथे भव्य दिव्य कार्यक्रम,
उपस्थिती-मु.पृथ्वीराज चव्हाण,उप.मु.अजित पवार..आणि मंत्रीगण
१९ फेब्रुवारी , सकाळी १० वाजता

शिवजयंती महा-उत्सव हरियाना

शिवजयंती महा-उत्सव हरियाना
मराठा वीरेंद्र वर्मा आणि हरयाणाचे मुख्यमंत्री हुड्डा ह्यांच्या उपस्थितीत काला आम मैदान येथे भव्य शिवजयंती कार्यक्रम
१९ फेब्रु.२०११

गोवा शिवजयंती


गोवा शिवजयंती
विचारवंत पी.बी.सावंत ह्यांचे व्याख्यान,गोवा विधानसभा भवन,पणजी
उपस्थिती- मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ सदस्य, गोवा सरकार
दि. १९ फेब्रुवारी २०११

पुणे शिवमहोत्सव २०११

पुणे शिवमहोत्सव २०११

१३ फेब्रुवारी २०११ पुणे शाहिरी महोत्सव उद्घाटन

१४ फेब्रुवारी २०११ पुणे शाहिरी महोत्सव सांगता

१५ फेब्रुवारी २०११
लाल महाल शिवमहोत्सव उद्घाटन व नृत्यस्पर्धा संपन्न, सिनेअभिनेते विजय कदम ह्यांच्या हस्ते शनिवारवाडा प्रांगणात उद्घाटन झाले..मोहनसिंग राजपाल,बी.जी.कोळसे पाटील,पुरुषोत्तम खेडेकर,इतिहासकार नामदेवराव जाधव ह्यांची उपस्थिती होती..शिवप्रेमींचा भरघोस प्रतिसाद..

पुणे-आंबेगाव शिवमहोत्सव उद्घाटन

५:०० वाजता - सिनेअभिनेते अमोल कोल्हे ह्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न..

कोथरूड आणि पिंपरी चिंचवड शिवदशरात्रोत्सव - नितीन बानगुडे ह्यांची तीनदिवसीय शिवचरित्र व्याख्यानमाला, उद्घाटन संपन्न..

१६ फेब्रुवारी २०११ - ऐतिहासिक आणि प्रबोधनात्मक कवी संमेलन..शनिवारवाडा प्रांगण..
महाराष्ट्रभरातून कवी आणि कवियत्रींची हजेरी..

१७ फेब्रुवारी २०११ -
१२:०० वाजता - आंतरशालेय बाल शाहिरी स्पर्धा, लाल महाल,पुणे
४:०० वाजता - ज्ञानेश महाराव ह्यांचा शाहिरी कार्यक्रम,बालगंधर्व नाट्यमंदिर,पुणे
५:०० वाजता - ज्ञानेश महाराव ह्यांचे शिवचरित्रावर व्याख्यान , बालगंधर्व नाट्यमंदिर,पुणे
६:०० वाजता. -विचारवंत गंगाधर बनबरे ह्यांचे शिवचरित्रावर व्याख्यान.लालमहाल (शनिवारवाडा) प्रांगण
७:०० वाजता. धमाल विनोदी नाटक "आबांची सभा" , लालमहाल (शनिवारवाडा) प्रांगण

१८ फेब्रुवारी २०११
रांगोळी स्पर्धा,सकाळी ८ वाजता ,शनिवार वाडा पटांगण
महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम,५:०० वाजता,शनिवारवाडा पटांगण,
लिटल च्याम्प - कार्तिकी गायकवाड आणि साथीदार,७:०० वाजता,शनिवारवाडा पटांगण,
मी जिजाऊ,मी सावित्री नाटिका - ५ वाजता, बालगंधर्व रंगमंदिर

१९ फेबुवारी २०११
शिवजयंती उत्सव - लाल महाल येथे जन्मोत्सव,सकाळी ९ वाजता
हमाल संघटना शिवजयंती सभा व मिरवणूक ,दुपारी १२ वाजता,श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी,पुणे.बाबा आढाव,संभाजीराजे छत्रपती,मालोजीराजे छत्रपती,जयसिंगराव पवार
४ वाजता- महानगर पालिका व शिवजयंती उत्सव समिती आयोजित भव्य मिरवणूक
८ वाजता- शिवमहोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम - "नटरंगी नार", शनिवार वाडा पटांगण

छत्रपती फेस्टिवल औरंगाबाद

छत्रपती फेस्टिवल औरंगाबाद
दि.१६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०११
व्याख्याने,स्पर्धा,नाटक,मिरवणूक..अनेक कार्यक्रम

छत्रपती महोत्सव,नांदेड

छत्रपती महोत्सव,नांदेड
१३ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०११
विविधरंगी कार्यक्रमांचे आयोजन , माजी.मुख्यमंत्री.अशोक चावण ह्यांच्या उपस्थितीत १९ तारखेला समारोप

शिवपर्व २०११,पुसद.

शिवपर्व २०११,पुसद.
१२ ते १९ फेब्रुवारी २०११
शिवाजी सभागृह,पुसद.
रोज- संध्याकाळी ६ वाजता विविध कार्यक्रम

शिवजयंतीचा वाद

महाराष्ट्रात काही कुटील लोक व राजकारण्यांनी शिवजयंतीचा वाद मुद्दाम चिघळता आहे।आजही शिवरायांच्या महाराष्ट्रात त्यांच्या २-२ जयंत्या साजऱ्या केल्या जाव्यात यासारखा शिवरायांचा दुसरा अपमान तो कोणता? (याशिवाय महाराष्ट्रात शिवजयंती टिळकांनी सुरू केली असाही एक गोड गैरसमज आहे।पण टिळक जेव्हा खरोखरच बाळ होते तेव्हा १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडावरील शिवरायंची समाधी शोधून काढली व शिवरायांच्या जिवनावर एक प्रदिर्घ पोवाडा रचला. शिवरायांचे कार्य घरोघर पोहचावे यासाठी त्यांनी १८७० साली शिवजयंती सुरू केली. शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुण्यात पार पडला. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात सुरू झाली.) असो, सध्याचा प्रश्न शिवजयंतीच्या वादाचा आहे.हा वाद संपाव म्हणून महाराष्ट्र शासनाने १९६६-६७ साली वा. सी. बेंद्रे, न. र. फाटक, ग. ह.खरे, द. वा. पोतदार, डॉ. अप्पासाहेब पवार, ब.मो.पुरंदरे यांची एक समीती स्थापन केली. शिवजयंतीची तारीख निश्चित करण्याचे काम या समितीकडे सोपवण्यात आले. ज्या कामाला २-३ वर्ष लागतात तेथे त्यांनी ३०-३३ वर्ष लागले, म्हणजेच हा वेळकाढूपणा होता‌. शेवटी त्यांनी १९ फ़ेब्रुवारी १६३० ही तारिख शासनाल सादर केली. १९ फ़ेब्रुवारी ही तारिख जाहीर झाल्याबरोबर कालनिर्णय कॅलेंडरवाले जयंत साळगांवकर यांनी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करावी असे आवाहन केले.त्यासाठी वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या.त्यांनी तिथीचा आग्रह धरतच पुरंदरे, बेडेकर, मेहेंदळे यांनी तिथी समर्थनार्थ साळगांवकरांना पत्रे दिली. शासनाच्या समितीत असणारे तथाकथीत शिवशाहीर तिथीच्या कळपात घुसले. शिवजयंतीचा वाद हा कोणत्याही राजकीय पक्षाने सुरू केला नाही, पण हा वाद सर्वत्र व्हावा यासाठी त्या नंतर राजकीय स्वरूप देण्यात आले. यामागे षड् यंत्र काय? या वादतून बहुजन समाजात दोन गट पडावेत, लढण्यातच त्यांची सर्व शक्ती नष्ट व्हावी, खऱ्या शिवचरित्राकडे त्यांचे लक्षच जाऊ नये असा हेतू नसू शकेल काय? जयंत साळगांवकरांना तिथीबद्दल एवढे प्रेम आहे तर मग ते आपले कॅलेंडर चैत्र महिण्यात बाजारात का आणत नाहीत? कॅलेंडरमध्ये तारखेचे आकडे मोठे आणि तिथीचे आकडे लहान का टकतात? पण तिथीचा आग्रह धरल की पंचांग आलेच , मग़ साळ्गांवकरांसारख्यांचा रोजगार हमी धंदा आलाच . पंचांग वाचनाचा बिन भांडवली धंदा चालावा आणि खरे शिवभक्त वादातच संपावेत यासाठीच हे कारस्थान आहे. बहुजनांनी शिवजयंतीच्या वादचे हे मूळ जाणून आपसातील सर्व मतभेद विसरून सर्वांनी १९ फ़ेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करावी याचसाठी हा खटाटोप ! जय जिजाऊ ! जय शिवराय !
website-hit-counters.com
Provided by website-hit-counters.com site.

About Me

Dr.Kadam
View my complete profile

Blog Archive

  • February (17)
  • February (35)
  • February (7)
  • December (3)
  • June (1)
Business Analysis
Business Analysis
Awesome Inc. theme. Theme images by molotovcoketail. Powered by Blogger.