Sunday, February 20, 2011

जळगाव शिवजयंती २०११

शिवजयंतीनिमित्त मंगलमय वातावरणात शहरातून मिरवणूक
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 20, 2011 AT 12:00 AM (IST)
जळगाव - शिवजयंती दिनानिमित्ताने छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्यावतीने आज (ता. 19) शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्कालीन साजेशा अशा शिवकालीन शिवजयंती मिरणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीत आकर्षण बनले ते बालशिवाजी महाराजांच्या वेशातील बालकाने सोन्याचा नांगर हाकल्याचे ठरले.

शहरातून आज काढण्यात आलेल्या मिरवणूकीची सुरवात गोलाणी मार्केट समोरील आदिती साडीयॉं येथून सकाळी 10 वाजता करण्यात आली. शिवाजी ब्रिगेडच्या मंगलमय शिवकालीन मिरवणूकीची सुरवात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. मिरवणूकीचे उद्‌घाटन आ. सुरेशदादा जैन, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र), प्रमोद पवार, जळगाव पिपल्स को-ऑप बॅंकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, नगरसेवक विष्णू भंगाळे, शरद लाठी यांनी बालशिवाजी महाराजांचे पूजन करून केले. हि मिरवणूक आदिती साडीयॉंपासून सुरवात झालेली मिरवणूक टावर चौक, चित्रा चौक या मार्गाने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून मिरवणूकीचा समारोप करण्यात आला. मिरवणूकीत 300 महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी शिवाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक शिवराज दादा नेवे, संस्थापक अध्यक्ष अशोकराव शिंदे, प्रकाश पाटील, डॉ. धनंजय बेद्रें, अर्जुनराव जगताप, डॉ. स्नेहल फेगडे, शशिकांत धांडे आदी उपस्थित होते.

सोन्याच्या नागरांचे आकर्षण
मिरवणूकीची सुरवात मॉं साहेब जिजाऊ यांच्यासोबत बालशिवाजी महाराज सोन्याच्या नांगराने जमीन नांगरतात असा जिवंत देखावा करण्यात आला होता. या सोन्याच्या नांगराचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मिरवणूकीत बालशिवाजी म्हणून सोहम वाणी, तर जिजाऊ मॉं साहेब म्हणून तेजस्वीनी आठवले (रावेर) हे होते.

शिस्तबद्ध मिरवणूक
मिरवणूकीत सजविण्यात आलेल्या रथात सनई चौघडे, मागे अबदागिरी झेंडे धारी मावळे, जिजाऊ मॉं सोबत बालशिवाजी, अष्टप्रधान मंडळ नंतर ब्रम्हवृंद व नऊवारी परिधान केलेल्या मुली, स्त्रिया व मावळे, दमणी अशी अत्यंत शिस्तबद्ध मिरवणूक सनई चौघड्यांच्या गजरात मंगलमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीदरम्यान कसल्याही घोषणा किंवा गुलालाची उधळण करण्यात आली नाही.

यशस्वीतेसाठी डॉ. गणेश पाटील, दिप पाटील, संभाजी पाटील, सागर शिंदे, अनिल पाटील, भुषण लाडवंजारी, मच्छिंद्र सोनवणे, लोणी मराठा समाजाचे अमित पाटील, पंढरी पाटील आदींनी सहकार्य केले.

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंती
सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीतर्फे बहुजन प्रतिपालक कुळवाडी भुषण जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराज क्रिडा संकूल येथे हजारो शिवप्रेमी अनुयायी एकत्र येवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूतळ्याचे पूजन कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष उदय पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश मोरे, सार्व. शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकूंद सपकाळे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे विनोद देशमुख आदी पूजन व अभिवादन करून भव्य मिरवणूकीला सुरवात केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळा तयार केलेल्या रथात बसून रथाच्या चोहो बाजूने भगवान गौतम बुद्ध, संत रोहिदास, संत तुकाराम, संत गाडगे महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर भगतसिंग, बिरसामुडां या बहुजन समाजाच्या महापुरूषांच्या प्रतिमा लावून सजवलेल्या रथातून शिव जयंतीच्या भव्य मिरवणूकीची सुरवात करण्यात आली. यात बैल गाडीला नांगर बांधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी धरलेला सजिव देखावा, राष्ट्रमाता जिजाऊचा सजिव देखावा मिरवणूकीचे आकर्षण ठरले. मिरवणूक कोर्ट चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू चौक, टावर चौक, चित्रा चौक, गोलाणी मार्केट मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

सद्‌गुरू महाविद्यालय
सद्‌गुरू एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र व शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त विद्यार्थी शिक्षक व शिक्षिकांचा समावेश असलेली शोभायात्रा काढण्यात आली. संस्थेचे प्रमुख प्रा. डॉ. नारायण खडके यांच्या हस्ते फीत कापून शोभायात्रेस प्रारंभ झाला. नगरसेविका प्रा. वर्षा खडके, प्रा. अजय इंगळे, प्रा. माधुरी चौधरी, प्रा. प्रतिभा पाटील, प्रा. अश्‍विनी अमृतकर, प्रा. दीपाली पाटील, प्रा. लीना पाटील, प्रा. अनिता वानखेडे, प्रा. विजय नारखेडे, प्रा. समाधान बोरसे, प्रा. भादोलकर, प्रा. बन्नोरकर, प्रा. बांगले, प्रा. वंजारी, विद्यापीठ प्रतिनिधी नरेश चौधरी आदी याप्रसंगी उपस्थित होते. घोड्यावरस्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा विद्यार्थी शिक्षक किरण अडकमोल यांनी केली तर, योगेश लांबोळे व मधुसूदन सोनवणे हे मावळ्यांच्या वेशभूषेत होते. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातात भगवे ध्वज व विविध घोषणांची फलके होती. ख्वाजामियॉं, वकील चेंबर्स, नूतन मराठा महाविद्यालय, कोर्ट चौक यामार्गे आलेल्या या शोभायात्रेचा समारोप "शिवतीर्थ' (जी. एस. ग्राउंड) मैदानावर झाला. सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले।

शिवजयंती उत्साहात साजरी
तोंडापूर, ता. जामनेर दि. 21 (वार्ताहर) -(22-February-2011)
Tags : Jalgaon,Blog

येथून जवळच असलेल्या ढालसिंगी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी शिवाजी चौक येथे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पुजा करण्यात आली. त्यानंतर गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी गावातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोभायात्रेत दामू गोतमारे, निलेश गोतमारे, डॉ. दिलीप पाटील, सुधाकर साबळे, अनिले बेलेकर, देवानंद गोतमारे, रितेश गोतमारे, गणेश गाढवे, कमलाकर पाटील, सुनिल गोतमारे, गजानन पवार, प्रविण गोतमारे, कृष्णा इंगळे, निलेश उगले, भारत गाढवे, लक्ष्मण गव्हारे, दीनकर अहिरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: