Saturday, February 19, 2011

ठाणे शिवजयंती २०११

ठाण्यात शिवजयंतीचा उत्साह...

Sunday, February 20, 2011 AT 12:00 AM (IST)


ठाणे - शिवजयंती निमित्त आयोजित मिरवणुकीत शिवप्रेमी मोठ्या संख्येने सामिल झाले होते.. ह्यावेळी उज्वल निकम ह्याना पुरस्काराने गौरविण्यात आले या वेळी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, महापौर अशोक वैती, ज्योती निकम, अनिकेत निकम, निरंजन डावखरे, पूर्वेश सरनाईक, मंडळाचे अध्यक्ष सुरेश सुर्वे, उपाध्यक्ष नामदेव तावडे, सचिव रवींद्र सावंत आदी उपस्थित होते.

सध्या मराठा समाजात दुर्दैवाने अनेक गट निर्माण झाले आहेत. त्यांच्यात वाद सुरू आहेत. या प्रकारांमुळे समाजात अपेक्षित कार्य होण्यात अडथळे निर्माण होत असल्याची खंत प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज येथे व्यक्त केली.
मंडळाचा सुवर्णमहोत्सव व शिवजयंती उत्सवानिमित्ताने ऍड. निकम यांना "मराठा समाजरत्न' पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे होते. या वेळी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, महापौर अशोक वैती, ज्योती निकम, अनिकेत निकम, निरंजन डावखरे, पूर्वेश सरनाईक, मंडळाचे अध्यक्ष सुरेश सुर्वे, उपाध्यक्ष नामदेव तावडे, सचिव रवींद्र सावंत आदी उपस्थित होते.समाजात गट असले, तरी ठाण्यातील मराठा समाजात गट नाहीत, याबद्दल निकम यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, या मंडळाचे काम सामाजिक बांधिलकीतून सुरू आहे. मंडळाने दिलेल्या पुरस्कारातून मला भावी आयुष्यात प्रेरणा मिळेल.नेता वा अभिनेता यांना कायद्याचा मापदंड एकच असावा. त्यातून समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल. खोटी गांधीगिरी करून कोणताही उपयोग होणार नाही, असा टोलाही त्यांनी कोणाचेही नाव घेता लगावला. दारिद्य्र, शिक्षणाचा अभाव धर्माच्या चुकीच्या संकल्पनेतून दहशतवाद फोफावला आहे. मोठ्या देशांमध्येही गुन्हेगार हस्तांतरणाबाबत अडचणी आहेत, असे ते म्हणाले. या वेळी वसंत डावखरे, एकनाथ शिंदे, सुरेश सुर्वे आदींची भाषणे झाली.

No comments: