Saturday, February 19, 2011

नाशिक शिवजयंती २०११

जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवजयंती उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 20, 2011 AT 12:45 AM (IST)
नाशिक - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम उत्साहात झाले. शासकीय कार्यालयांसह विविध संस्था, संघटना, तसेच शाळांमध्ये शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

मालेगावला विविध कार्यक्रम
मालेगाव - शहर व परिसरात विविध कार्यक्रम उत्साहात झाले. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हार अर्पण केला.

कॅम्प भागातील मराठा सेवा संघातर्फे मिरवणूक काढण्यात आली. मनसेचे गुलाब पगारे, श्रीराम सोनवणे, शांतता समितीचे प्रकाश पाटील, अप्पर जिल्हाधिकारी गावडे, तहसीलदार एस. एम. अवळकंठे, शिरस्तेदार गायधनी, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रशेखर चौगुले, महापालिका आयुक्त जीवन सोनवणे, सुनील चांगले, मराठा सेवा संघाचे जगदीश खैरनार, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष शांताराम लाठर, अद्वय हिरे, सुधीर चव्हाण, अशोक बच्छाव, शेखर हिरे, दिलीप केसकर, रियाज शेख, पवन ठाकरे, संजय वाणी, प्रसाद पवार, प्रल्हाद पाटील, भालचंद्र सोनवणे, शिवप्रसाद पवार, संजय पाटील, संतोष शेवाळे आदींनी पुतळ्यास हार अर्पण केला. कॉंग्रेस पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रांतिक सदस्य डॉ. तुषार शेवाळे अध्यक्षस्थानी होते. सुकदेव देवरे, डॉ. ठाकरे, डॉ. पठाडे, बच्छाव आदींची भाषणे झाली. दत्तू खैरनार, साहेबराव देवरे, नीलेश शेवाळे, राजेंद्र सूर्यवंशी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

येथील आई प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. सुनील देसले यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र दिघे, मधू शेवाळे, अविनाश भामरे, गिरीश सूर्यवंशी, निवृत्ती सावंत, श्रीराम ह्याळीज, जितेंद्र सावंत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

सोयगाव येथील सम्राटनगरमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक, सामाजिक, सेवाभावी संस्थेतर्फे जयंतीचा कार्यक्रम झाला. अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रशेखर चौगुले प्रमुख पाहुणे होते. रवी उशिरे यांनी प्रास्ताविक केले. सरपंच जे. पी. बच्छाव, बाबा पाटील, डॉ. विक्रम वैद्य, ग्रामपंचायत सदस्य विमलबाई सोनवणे आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. एम. सी. पानपाटील यांनी आभार मानले. महापालिका सभागृहात आयुक्त जीवन सोनवणे यांनी प्रतिमापूजन केले. सहाय्यक आयुक्त अशोक कापडे व भास्कर तिवारी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास विभागप्रमुख व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

निफाडला पुतळ्याचे पूजन
निफाड - येथील ग्रामपालिका, तहसीलदार कार्यालय व कर्मवीर गणपतदादा मोरे महाविद्यालय येथे जयंतीचा कार्यक्रम झाला. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्‍वारूढ पुतळ्यास मान्यवरांनी हार अर्पण करून अभिवादन केले.

ग्रामपालिका कार्यालयात सरपंच भारतीताई कापसे, उपसरपंच जावेद शेख, माजी सरपंच मुकुंद होळकर यांनी प्रतिमापूजन केले. शिवाजीराव धारराव, अश्‍पाक पठाण, नूर शेख, अशोक कर्डिले, ऍड. फिरोज इनामदार, निवृत्ती भवर, नितीन खडताळे, दत्तू बागडे, गणेश कापसे, सुनील कापसे, बाबूलाल थोरात, दिलीप जाधव, राजेंद्र भवर, विलास साळुंके, भाऊसाहेब मोगरे, नरेश धारराव, बाळासाहेब वाघचौरे, सुनील दुधेडिया, रामदास कराटे, राजेंद्र कापसे उपस्थित होते.

तहसील कार्यालयात प्रतिमेस व अश्‍वारूढ पुतळ्यास तहसीलदार गणेश राठोड, पोलिस निरीक्षक रामचंद्र देसाई यांनी हार अर्पण केले. निवासी नायब तहसीलदार बनसोडे, नायब तहसीलदार बाळासाहेब कापसे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष रमेश जेऊघाले आदींसह कर्मचारी उपस्थित होते. कर्मवीर मोरे महाविद्यालयात प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी प्रतिमापूजन केले. प्रा. माधवराव खालकर, प्रा. पेखळे आदी उपस्थित होते.

विंचूर येथे कार्यक्रम
विंचूर - विंचूर ग्रामपंचायत व शिवसेनेतर्फे बाजार गल्लीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास सरपंच राजाराम दरेकर, तालुका उपप्रमुख विजय पाटील, शिवाजी पाटील, किशोर पाटील यांनी हार अर्पण केला. ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्‍वर जाधव, नीलेश गायकवाड, बापू सोदक, राजेंद्र शिंदे, फिरोज मोमीन, राहुल कर्पे, दादा धंद्रे, कृष्णा जाधव, बापू कर्पे, अमोल पाटील, लखन कर्पे, राहुल निकाळे, किरण नेवगे, पंकज मानकर, सागर साळुंके, सचिन दरेकर, अक्षय पाटेकर, वैभव गायकवाड, पिनू थोरात, अविनाश खैरनार, मनोज जेजूरकर, हेमंत बागूल, अक्षय क्षीरसागर, उत्तमराव गायकवाड, कुमावत आदी उपस्थित होते.

पोखरी येथे प्रतिमापूजन
नांदगाव - पोखरी (ता. नांदगाव) येथील माऊली माध्यमिक विद्यालयात प्रतिमापूजनाचा कार्यक्रम झाला. मुख्याध्यापक व्ही. डी. बोरसे अध्यक्षस्थानी होते. नितीन शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. आर. एस. घोडके यांनी सूत्रसंचालन केले.

जनता विद्यालयात जयंती कार्यक्रम
सटाणा - अंतापूर (ता. बागलाण) येथील नाशिक जिल्हा विधायक कार्य समिती संचलित जनता विद्यालयात जयंतीचा कार्यक्रम झाला. मुख्याध्यापक एस. डी. भामरे यांनी प्रतिमापूजन केले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. अंबादास देवरे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध कार्यक्रम झाले. सभापती शैलेश सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. संचालक डॉ. भास्कर भामरे, देवीदास सोनवणे, जयप्रकाश सोनवणे, सचिव अशोक भामरे, उपसचिव विजय पवार, पी. के. भदाणे, ए. एस. साळे, पोपट सोनवणे आदींसह संचालक, शेतकरी, व्यापारी उपस्थित होते. श्री गजानन अध्यापक विद्यालयात संस्थेचे सचिव डॉ. दौलतराव गांगुर्डे यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. प्राचार्य मंगेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. अनिल कापडणीस, प्रा. वैशाली पाटील, प्रा. सुवर्णा खैरनार, प्रा. सुरेखा पाटकरी, प्रमोद खैरनार, विद्यार्थी प्रमुख नितीन वैष्णव आदींसह विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. अमित बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. "मविप्र'च्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सेवानिवृत्त उपप्राचार्य बी. जे. शेवाळे यांचे व्याख्यान झाले. प्रा. एस. एल. कापडणीस अध्यक्षस्थानी होते. शशिकांत कापडणीस, प्रा. ए. डी. गोसावी, प्रा. एस. के. सूर्यवंशी, प्रा. एन. आर. निकम, प्रा. व्ही. आर. पाटील, प्रा. एन. ए. माळी, प्रा. कुशल कुलकर्णी आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. प्रदीप निकम यांनी सूत्रसंचालन केले. धनश्री पाटील हिने आभार मानले.

No comments: