Monday, February 21, 2011

वाशिम शिवजयंती २०११

वाशिम जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात
शिवजयंतीनिमित्त वाशीममध्ये मोफत नेत्रतपासणी




वाशीम, १८ फेब्रुवारी / वार्ताहर
अखिल भारतीय छावा संघटना व राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे शिवजयंतीनिमित्त शनिवार, १९ फेब्रुवारीला वाशीम बसस्थानकासमोर मोफत नेत्र तपासणी व आंतरभिंगारोपण नेत्रशस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबीर सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत होणार असून नेत्ररुग्णांची शस्त्रक्रिया येथील सामान्य रुग्णालयात होणार असल्याची माहिती आयोजक व छावा संघटनेचे विदर्भ संपर्क प्रमुख मनीष डांगे यांनी दिली.
या शिबिरामध्ये जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. अभय पाटील, डॉ. कविता ठाकरे, नेत्रचिकित्सा अधिकारी जगदीश बाहेकर, किरण हाके व त्यांचे सहकारी नेत्ररुग्णांची तपासणी करून उपचार करणार आहेत. या शिबिराचे उद्घाटन रतनगड येथील संत गोपाल बाबा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव इंगोले राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. म्हात्रे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजू चौधरी, वाशीमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, सार्वजनिक शिवजयंती सोहोळ्याचे अध्यक्ष गंगूभाई बेनिवाले, भाजप शहर अध्यक्ष मिठूलाल शर्मा, नगरसेवक नागोराव ठेंगडे, राजू वानखेडे, अजय वाघ, हरीश सारडा, बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन पगार, कार्याध्यक्ष बाळासाहेब देशमुख, मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे, पीरिपाचे जिल्हाध्यक्ष दौलत हिवराळे, रिपाइंचे अध्यक्ष गोवर्धन चोथमल, वसंत धाडवे, अ‍ॅड. जोगी, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अध्यक्ष सोनाली ठाकूर, काँग्रेस महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अलका मकासरे, सरकार इंगोले, बबन भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष बबलू अहीर आदी उपस्थित राहणार आहेत.

No comments: