Monday, February 21, 2011

नांदेड शिवजयंती २०११

शिवरायांच्या जयजयकाराने लोहानगरी दुमदुमली



लोहा,नांदेड १९ फेब्रुवारी/वार्ताहर
छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने लोहानगरी दुमदुमली. संपूर्ण शहरात रोषणाई, आकर्षक आणि मनोवेधक आतीषबाजी, आदिवासी नृत्य, स्वराज्यभिषेकाचा जिवंत देखावा आणि उंच घोडय़ाचा समावेश असलेली छत्रपती शिवरायांची भव्य मिरवणूक आज शहरातून निघाली. माजी आमदार प्रताप पाटील यांच्या वतीने काढलेल्या मिरवणुकीत नागरिक सहभागी झाले होते.
शिवाजी चौकापासून मोटरसायकल फेरी निघाली. जुन्या शहरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रताप पाटील यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आल्यानंतर शिवरायांना अभिवादन करून मिरवणूक निघाली. यामध्ये सर्व जातीधर्माचे लोक सहभागी झाले होते. शिवजयंतीनिमित्त मिलिंद पवार यांनी मोटारसायकल फेरी काढली होती.
आदिवासी नृत्य, स्वराज्यभिषेकाचा जिवंत सोहळा, आकर्षक मूर्ती मंडप यासह लेझिम आणि आतीषबाजीने जयंती सोहळा आनंदात पार पडला. या वेळी शहरातील मान्यवर, राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी शिवरायांना अभिवादन केले. यामध्ये पंचायत समिती सभापती केशव पाटील, कंधारचे पंचायत समिती सभापती रामचंद्र राठोड, कृउबा सभापती रुस्तुम धुळगंडे, उपसभापती रंगनाथ भुजबळ आदींसह मोठय़ा संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते.

भोकरमध्ये अपूर्व उत्साह
भोकर-
नगरपालिकच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष डॉ. विजयकुमार दंडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी सभापती शिवाजीराव पांचाळ, डॉ. पुरुषोत्तम कल्याणकर, विनोद पा. चिंचाळकर, विनायक कदम यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

गंगाखेडमध्ये देखाव्यांसह मिरवणूक
गंगाखेड-
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज शहरात उत्साहात साजरी झाली. सकाळी विविध कार्यालयांत छत्रपतींना अभिवादन करण्यात आले. दुपारी सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा व प्रतिमेची सवाद्य देखाव्यांसह मिरवणूक काढली. प्रतिमेचे पूजन नगरसेवक रामप्रभू मुंडे, गोविंद निरस, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गोविंद यादव यांनी केले. कलावंत गोपी मुंडे यांच्या नादबिंदू मंडळाने सादर केलेल्या शिवरायांच्या सजीव देखाव्याने लक्ष वेधले. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष उमाकांत फड, बाळासाहेब मडके, विवेकानंद माने, विजय अवचार, सिद्धार्थ धिटे, संतोष वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.

No comments: