Saturday, February 19, 2011

सांगली शिवजयंती २०११

सांगली परिसरात शिवजयंती उत्साहात

जिल्हा परिषदेत शिवजयंती उत्साहात



सांगलीत धार्मिक ऐक्याची अवतरली शिवशाही

दीनदयाळ सूतगिरणीवर शिवजयंती साजरी


सांगलीत मुस्लीम समाजाच्या वतीने शिवजयंती साजरी



तिथीनुसार शिवजयंती साजरी करणाऱ्या शिवसेनेचे शिवप्रेम तपासले पाहिजे..




Sunday, February 20, 2011 AT 12:00 AM (IST)

सांगली - छत्रपती शिवाजीमहाराजांची जयंती आज शहर आणि परिसरात अमाप उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रांतील व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. मुस्लिम समाजातील लोकांनी सक्रिय सहभाग घेऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले.

सर्व जाती-धर्मांचे लोक एकत्रित येऊन शिवजयंती साजरी करण्याची येथे परंपरा आहे. ती आजही टिकून आहे. आजही त्याचे प्रत्यंतर आले. येथील मारुती चौकाजवळील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी लोकांची री लागली होती. विविध संघटना, संस्था, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार, पुष्पांजली वाहून अभिवादन केले. त्यामध्ये प्रामुख्याने महापौर इद्रिस नायकवडी, उपमहापौर युवराज बावडेकर, जिल्हाधिकारी श्‍याम वर्धने, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख बाळासाहेब वाघमोडे, उपअधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, निरीक्षक भीमानंद नलावडे, महाआघाडीचे गटनेते किरण सूर्यवंशी, नगरसेवकांचा त्यात समावेश होता.

महापालिकेत झालेल्या कार्यक्रमात महापौर नायकवडी यांनी शिवाजीमहाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या वेळी अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक आणि कर्मचारी उपस्थित होते. मुस्लिम समाजाच्या वतीने येथील जुने स्टेशन चौकात शिवजयंती साजरी करण्यात आली. असिफ बावा, युसूफ जमादार, लालू मेस्त्री, सलीम मुल्ला यांच्यासह समाजातील तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी समाजाच्या वतीने राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. नागरिकांना सरबतचे वाटप करण्यात आले.

कॉंग्रेसच्या वतीनेही शिवाजीमहाराजांना अभिवादन करण्यात आले. आम आदमी का सिपाही संघटनेच्या वतीने कॉंग्रेस भवन चौकात जयंतीचा कार्यक्रम झाला. संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अजित सूर्यवंशी यांनी शिवपुतळ्याचे पूजन केले. या वेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील सार्वजनिक संस्थांच्या वतीने रांगोळी, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

मराठा समाजातर्फे रक्तदान शिबिर
मराठा समाजाच्या वतीने मोठ्या उत्साही वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी साडेबारापर्यंत 30 जणांनी रक्तदान केले होते. पोलिस उपअधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अर्धपुतळ्याचे पूजन केले. या वेळी मराठा समाजाचे अध्यक्ष तानाजीराव मोरे, सरचिटणीस बाळासाहेब सावत, बाबासाहेब भोसले, आर. एस. पाटील, रघुनाथ पाटील, ऍड. उत्तमराव निकम, विकास मोहिते, प्रदीप सूर्यवंशी, डॉ. मोहन पाटील, सुधीर सावंत, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा सोशल ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदान शिबिरासाठी भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाने सहकार्य केले।

जयघोष, वाद्यांचा निनाद, चित्ररथांसह शिवजयंती
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 20, 2011 AT 12:24 AM (IST)

सांगली - शिवरायांचा जयघोष, वाद्यांचा निनाद, चरित्र रथ आणि पारंपरिक पद्धतीने आज येथे सायंकाळी जल्लोषात शिवजंयती मिरवणूक निघाली. शहर शिवमय झाले होते. मुस्लिम समाजाने काढलेली मिरवणूक लक्षवेधी ठरली. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून मिरवणुकीचे स्वागत झाले.
शहरातील सर्व जाती धर्माचे लोक, विविध संघटना, संस्था आणि पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन शिवोत्सव समिती स्थापन केली आहे. समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज सायंकाळी पारंपरिक पद्धतीने शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

मारुती चौकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सायंकाळी सहा वाजता शिवाजी महाराजांचा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी आणि वाद्यांच्या दणदणाटात माजी मंत्री मदन पाटील यांच्या हस्ते मिरवणुकीला प्रारंभ झाला. अग्रभागी झांजपथक, शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित सजीव देखावे, चित्र रथांचा समावेश होता. मिरवणुकीत आबालवृद्धांचा सहभाग होता. तरुणांच्या हाती भगवे ध्वज होते. पोवाड्याच्या तालावर भगवे ध्वज हाती घेऊन तरुण नाचत होते.

जिजाऊ ब्रिगेडच्या महिला नऊवारी साडी परिधान करून सहभागी झाल्या होत्या. त्यांनी बाल शिवाजी हा सजीव देखावा सादर केला होता. मिरवणुकीत मुस्लिम समाज, मराठा समाज, मराठा सेवा संघ, रिपब्लिकन पक्ष, दलित संघटना, पुरोगामी संघटना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले.

मुस्लिम समाजाच्या मिरवणुकीचा प्रारंभ जुने स्टेशन चौकातून झाला. माजी मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत मिरवणुकीचा प्रारंभ झाला. अग्रभागी बावीस घोडे, त्यावर शिवाजी महाराजाच्या सैन्यातील मुस्लिम सरदार सैनिकांच्या वेषात मुले होती. नावाच्या पाट्या त्यांच्या गळ्यात अडकवल्या होत्या. ते घोड्यावर स्वार होते. मिरवणूक शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी शिवोत्सव समितीच्या मिरणवुकीत सामील झाली. आम आदमी सिपाही संघटनेच्या वतीनेही मिरणवणूक काढण्यात आली. तिचा प्रारंभ कॉंग्रेस भवन चौकात झाला. यात झांजपथके, डॉल्बीचा समावेश होता.

शिवरायांचा जयघोष वाद्यांच्या निनादात सुरू असलेल्या जल्लोषामुळे शहर शिवमय झाले होते. फटाक्यांची आतषबाजी करून मिरवणुकीचे स्वागत करण्यात येत होते. नळभागातील मुस्लिम मोहल्ल्यातही जल्लोषात स्वागत करण्यात आले. मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मिरवणुकीत प्रामुख्याने मराठा समाजाचे तानाजीराव मोरे, बाळासाहेब सावंत, रघुनाथराव पाटील, मराठा सेवा संघाचे श्रीरंग पाटील, डॉ. संजय पाटील, काका हलवाई, पुरोगामी संघटनेचे ऍड. के.डी. शिंदे, मुस्लिम समजाचे प्राचार्य डॉ. सिकंदर जमादार, आसिफ बावा, करीम मेस्त्री, हारूण शिकलगार, कय्यूम पटवेगार, युसूफ जमादार, सलीम शेख, युनूस महात, अमन पठाण, हारूण परांडे, अकबर भोजानी, मौलवी, जिजाऊ ब्रिगेडच्या ऍड. तेजस्विनी सूर्यवंशी, सौ. आशा पाटील, जयश्री घोरपडे, श्रेया भोसले, मानसी भोसले, आमआदमी सिपाही संघटनेचे अजित सूर्यवंशी, नगरसेवक राजेश नाईक, लक्ष्मण नवलाई, उत्तम साखळकर, सुभाष यादव, शामकांत आवटी, अन्य पदाधिकारी, मदन पाटील युवा मंचचे सतीश साखळकर सहभागी होते. शहरातील प्रमुख मार्गावर फिरून मिरवणुकीचे जुने स्टेशन चौकात विसर्जन झाले.

डोक्‍यावर गोल टोपी, हाती भगवा ध्वज
मुस्लिम समाज हिंदूच्या सण आणि उत्सवात नेहमीच सहभागी होतात. सांगली शहरात त्याला मोठी परंपरा आहे. मुस्लिम समाज गेल्यावर्षीपासून शिवजयंती स्वतंत्रपणे साजरी करीत आहे. आज पहिल्यांदाच मुस्लिम समजाने पारंपरिक पद्धतीने जंगी मिरवणूक काढली. प्रत्येकाच्या डोक्यावर गोल पांढरी टोपी, हाती ध्वज होता. शिवरायांचा जयघोष आणि आमची जात मुसलमानाची, महाराष्ट्र आमचा स्वाभिमान.. अन देशासाठी आम्ही दिले प्राण.. ही मिरवणुकीत डॉल्बीवर ध्वनिफित वाजवली जात होती. ही शिस्तबद्ध मिरवणूक लक्षवेधी ठरली

धन्यवाद - दै.पुढारी,शिवश्री सचिनजी पाटील

2 comments:

Sunil said...

Jai Bhavani Jai Shivaji
RAJE Punha Janmala Ya Hi aamchi Sarvanchi Iccha.....
Shivjayntichya Sarv Bhartiyana Hardik Hardik Shubheccha.....

sachin said...
This comment has been removed by the author.