Monday, February 21, 2011

मराठवाडा शिवजयंती २०११

औरंगाबाद शहरात शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी



औरंगाबाद, १९ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी
औरंगाबाद शहरात शनिवारी शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध पक्ष आणि संघटनांतर्फे मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीपासून शनिवारी सायंकाळी मिरवणुकीला प्रारंभ झाला. रात्री उशिरा या मिरवणुकीचा समारोप झाला.
औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीतर्फे मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अनेक संस्थांनी सजीव देखावे साकारले होते. लेझिम, टाळ मृदंग यामुळे शहांगज, सराफा, मच्छली खडक, गुलमंडी हा मार्ग दणाणून गेला होता. या मिरवणुकीचा समारोप क्रांतिचौकात करण्यात आला. या मिरवणुकीत आमदार डॉ. कल्याण काळे, आमदार संजय वाघचौरे, माजी खासदार उत्तमसिंह पवार, ज्येष्ठ नेते मधुकरराव मुळे, पोलीस आयुक्त श्रीकांत सावरकर, शिवजयंती समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, अध्यक्ष विनायक गुंजाळ, हर्षवर्धन तुपे पाटील, रंगनाथ काळे, प्रकाश मुगदिया, सुभाष झांबड, अभिजीत देशमुख, संदीप शेळके, मनमोहनसिंग ओबेरॉय, जी.एस.ए. अन्सारी, तनसुख झांबड आदी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांदे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त नामदेव जोगदंड यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
विद्यापीठात शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ कुलगुरु डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. प्रवेशद्वारापासून ते विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताश्यांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा घोषणा देत ही मिरवणूक काढण्यात आली.
उस्मानाबादेत शिवजयंती साजरी


उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या प्रमिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना जिल्हाधिकारी डॉ.प्रविण गेडाम.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपविभागीय अधिकारी सुनील यादव,उपजिल्हाधिकारी दिनकर जायभाय दिसत आहेत.

श्रमिक
गोजमगुंडे यांना शिवबा पुरस्कार प्रदान
Latur News
Thursday, February 20, 2011 AT 05:00 AM (IST)

लातूर (latur) - भूमिपुत्र स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी शिवजयंती निमित्त देण्यात येणारा शिवबा ऐतिहासीक कार्य गौरव पुरस्कार पुण्याच्या सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक संजयकुमार सुरवसे यांनी हा पुरस्कार जाहिर केला होता . कै. विद्याभूषण वाजपेई यांच्या स्मरणार्थ स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असून शिवजयंती दिनी लातूर येथे पुरस्कार वितरण केले गेले,ह्यावेली शिवप्रेमिन्ची मोठ्या संख्येने उपस्थिति होती..

No comments: