Saturday, February 19, 2011

तुळजापूर शिवजयंती २०११

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 20, 2011 AT 12:46 AM (IST)

तुळजापूर - छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शनिवारी (ता. 19) उत्साहात साजरी करण्यात आली. तुळजाभवानी मंदिरातही तुळजाभवानी देवीची भवानी तलवार रूपात अलंकार महापूजा बांधण्यात आली होती.

मंदिरात चांदीच्या अंबारीत शिवाजी महाराजांची चांदीची मूर्ती ठेवण्यात आली होती. या प्रतिमेची पूजा देवस्थान समितीचे सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी केली.

दुग्धविकासमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी साडेआठ वाजता व पालिकेतर्फे नगराध्यक्ष संतोष कदम, मुख्याधिकारी संतोष टेंगळे यांनी शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. आर्य चौकातील मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीतर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, ऋषिकेश मगर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली. शहरातील अश्‍वारूढ पुतळ्यास विविध संघटना, संस्था, मंडळांनी अभिवादन केले

No comments: