Monday, February 21, 2011

धुळे शिवजयंती २०११

धुळे शहरात शिवजयंती उत्साहात साजरी
धुळे, दि.20 (प्रतिनिधी)-(21-February-2011)
Tags : Dhule

शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येवुन शिवरायांना अभिवादन करण्यात आले. श्रीसाईनाथ मतिमंद विद्यालय- अंचाडे ता.धुळे येथील श्री साईनाथ मतिमंद निवासी विद्यालय येथे शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डी.बी. पाटील होते. मुख्याध्यापक छाया पाटील यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र कथन केले. अमरदीप खैरनार यांनी आभार मानले. कार्यक्रमास सुभाष पाटील, भरत पाटील, नंदराज पाटील, अणासाहेब पाटील, रवींद्र खैरनार, मोहन पाटील आदी उपस्थित होते. स्वाभिमान- येथील स्वाभिमान संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. साक्री रोडवरील स्वाभिमान संघटनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी धुळे जिल्हा स्वाभिमान संघटनेचे जिल्हा संघटक आनंद लोंढे, जिल्हा संपर्क प्रमुख राजन जगताप, जितेंद्र पाटील, अजय पाटील, प्रकाश अहिरे, दादु देसले, पप्पू पगारे, कपिल जाधव, विक्की लोंढे, गौरव सोनवणे, वंदेश साळवे, बंटी भामरे, विशाल वाघ, अमोल भामरे, राहुल वाघ, हेमंत लोंढे, सिध्दार्थ लोंढे, मिलिंद भालेराव, अरुण राऊत, प्रकाश ठाकरे, जितेंद्र वाघ, संदीप बनसोडे आदी उपस्थित होते. शाहूसेना- शाहुसेना जिल्हा धुळे शाखेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शाहु सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद साळुंके यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शाहीर भटू गिरमकर, संदीप पाटोळे, विजय देवकर, रवींद्र आघाव, मनोज बजाज, नेनेश साळुंके, राजेंद्र जाधव, अरुण मोहिते, चंद्रकांत थोरात, अनिल जगताप, चंद्रकांत थोरात आदी उपस्थित होते।


शिवाजींचे राज्य प्रेरणास्त्रोत होते शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या व्याख्यान कोकाटे यांचे मत
धुळे, दि.17-(प्रतिनिधी)( धुळे, 18-February-2011 )
Tags : Dhule
शिवाजी महाराजांचे राज्य गरीबांचे, उपेक्षितांचे राज्य होते. सामान्य लोकांसाठी ते प्रेरणास्त्रोत ठरणारे होते. त्यामुळे हे राज्य लोकांना आपले वाटत होते. असे मत शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.
शिवाजी महाराजांचे राज्य गरीबांचे, उपेक्षितांचे राज्य होते. सामान्य लोकांसाठी ते प्रेरणास्त्रोत ठरणारे होते. त्यामुळे हे राज्य लोकांना आपले वाटत होते. असे मत शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले. धुळे येथील श्री. शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचेतर्फे शिवजयंती निमित्त आज (दि.17) या दिन दिवसांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. शहरातील गरुड मैदानावर व्याख्यानमाला होत असून आज या व्याख्यानमालेत शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी प्रथम पुष्प गुफले. शिवचरित्रातून या शिकावे या विषयावर ते बोलत होते. प्रारंभी व्याख्यामालचे उद्‌घाटन शिवचरित्रकार श्रीमंत कोकाटे यांच्यासह महापौर मोहन नवले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मात्री मंत्री रोहिदास पाटील, संस्थेचे चेअरमन कुणाल पाटील, सचिव उत्कर्ष पाटील, उपाध्यक्ष डॉ. एस. टी. पाटील, गुणवंत देवरे आदी उपस्थित होते. यावेळी शिवचरित्रातून काय शिकावे या विषयावर बोलतांना श्रीमंत कोकाटे यांनी सांगितले, सिद्दी जौहरने पन्हाळगडाला वेढा टाकला तेव्हा वेढा जास्त दिवस टिकून होता. यामुळे शिवाजी महाराज चिंतेत पडले. त्यांनी सिद्दी भेट घेण्याचे ठरविले. त्यानुसार आपला विश्वासू साथीदार शिवाजी काशीद याला त्यांनी शिवाजी महाराज म्हणून सिद्दीच्या भेटीला पाठविले. शिवाजी भेटीला येत असल्याचे समजल्यामुळे त्याचे सैन्य गाफील राहिले. याचवेळी शिवाजी महाराजांनी चलाखी करत संधी साधत सिद्दीच्या सैन्यावर हल्ला केला. याचवेळी इकडे शिवाजी काशिदला पकडण्यात आले. त्याला खोदूनखोदून विचारण्यात आले. पण त्याने अखेरपर्यंत आपण शिवाजी असल्याचे सांगितले. अखेर त्याला वधस्तंभावर बांधले. छातीला भाले लावले तरीही त्याने आपण शिवाजी असल्याचे सांगितले. त्याच्या छाती आणि पोटात भाले खुपसले तेव्हा खाली घसरत शिवाजी म्हणाला की, खोट्या शिवाजीची सुध्दा तुम्हाला पाठ दिसली नाही. तर खरा शिवाजी तुम्हाला कसा दिसेल. शिवाजी काशिद, बर्हिजी नाईक, तानाजी मालुसरे या लोकांना काही मोठा खजिना मिळाला नाही. पण त्यांना प्रेम मिळाले, प्रेरणा मिळाली. शिवाजीचे राज्य गरीबांचे, उपेक्षितांचे राज्य होते. त्यांनी कुणालाही उघड्यावर पडू दिले नाही. हा संदेश आत्ताच्या राज्यकर्त्यांनी शिवचरित्रातून घ्यायला हवा असेही त्यांनी सांगितले. याच व्याख्यानमालेत उद्या दि.18 रोजी गुलाबराव वळसेे पाटील हे एक अष्टपैलू राजा शिवछत्रपती या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहे.
शिवरायांचा इतिहास प्रेरणादायी -प्रा. पाटील
साक्री, दि. 20 (श.प्र.)- (21-February-2011)
Tags : Dhule

जगाच्या पाठीवर आजपर्यंत झालेल्या क्रांतीचे मुळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोक कल्याणकारी राज्य व्यवस्थेत आपणाला पहायला मिळाल्याशिवाय रहात नाही. त्यामुळे शिवरायांचा इतिहास प्रेरणादायी होता असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक प्रा. लिलाधर पाटील यांनी केले. येथील श्री. छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज एक युगपुरुष’ या विषयावर यावेळी प्रा. पाटील यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष तथा तहसीलदार सुभाष दळवी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सी. गो. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. तोरवणे, माजी प्राचार्य डॉ. पी.डी. देवरे, प्रभाकर चौधरी, एस.एन. खैरनार, प्रा. एल.जी. सोनवणे, संदीप पाटील, बापूसाहेब शिंदे, ग्रा.पं. सदस्य सुमित नागरे, देविदास पाटील, दिलीप भामरे, प्राचार्या मिनाक्षा जावळे, वाचनालयाचे कार्यवाह आर.डी. भामरे, प्रा. डी.एन. खैरनार, बी. एम. भामरे, नरेंद्र खैरनार आदी उपस्थित होते. प्रा. लिलाधर पाटील व्याख्यानात पुढे म्हणाले की, इतिहास म्हणजे भूतकाळाचा वर्तमान काळशी चालेला सुसंवाद असून या वर्तमान काळातही आपल्या हातून इतिहास घडत असतो. परंपरा आणि आधुनिकता सृजनांना जन्म देत असते. मात्र त्या परंपरेची जाण आणि भान आपण राखले पाहिजे. कारण चुकीचा इतिहास समाजात अंधश्रध्दांना जन्माला घालण्याचे काम करीत असतो. प्लेटोने आपल्या ग्रंथातून लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना सर्व प्रथम मांडली. मात्र या ग्रंथातील कल्पना कुठलाही जगातील राजा अंमलात आणू शकला नाही. जगजेत्ता अलेझांडरही हे करु शकला नाही मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी लोक कल्याणकारी राज्यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. क्युबात व व्हीएतनाममध्ये झालेल्या राज्यक्रांतीचे प्रेरणास्थान शिवाजी महाराजांची राज्य पध्दती आहे. ही अभिमानाची गोष्ट असल्याची बाब लक्षात येते मात्र आपण विश्व कल्याणकारी राज्यांला संकुचीत करण्याचे पातक करीत असल्याची खंतही प्रा. लिलाधर पाटील यांनी व्यक्त केली. विचार, पुस्तक, इतिहासही क्रांतीची कारक असू शकते. मात्र ही कारक रस्त्यावर उतरुन क्रांती करु शकत नाहीत. हा विचार पुस्तकातून, इतिहासातून आपल्या डोक्यात घेवून चालणारी माणसेच क्रांती करु शकतात. शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास हा क्रांतीची बीज पेरणारा इतिहास असल्याचे नमुद करुन शिवाजी महाराजांच्या अस्सल इतिहासाची साधणे आज अभ्यासने आवश्यक असल्याचे सांगतांना परमानंद लिखीत शिवभारत, शिवाजी महाराजांची पत्रे, सभासदांची बखर, मुधभूषणम्‌ ही पुस्तके अभ्यासने आवश्यक असल्याचे नमुद केले. तत्पर्वी सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन पंचायत समितीचे सभापती ज्ञानेश्वर नागरे, तहसीलदार सुभाष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आ. जयवंत ठाकरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत पवार, हाजी सत्तार उमराणी, ऍड. उत्तमराव मराठे, प्रा. एल. जी. सोनवणे, एस.एन. खैरनार, प्रा. विनय शाह, मनोज कार्ले, प्रा. नरेंद्र तोरवणे, मुलदकरंजे, नरेंद्र खैरनार, आबा सोनवणे, कैलास चाळसे, आर. डी. भामरे, डी. एन. खैरनार आदी उपस्थित होते. या दोन्ही कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे प्रमुख विजय भोसले यांनी केले. तर आभार नरेंद्र खैरनार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल दिलीप पाटील, राजेंद्र सोनार, राजेंद्र लाडे, अग्नीहोत्री पाटील आदींनी परीश्रम घेतले।

शिवाजी महाराज देशाचे अमृत संजीवनी एसएसव्हीपीएसच्या शिवचरित्र व्याख्यानमालेत गुलाब वळसे-पाटील यांचे मत
धुळे, दि. 18 (प्रतिनिधी)-( धुळे, 19-February-2011 )
Tags : Dhule
शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नाही तर देशाचे अमृत संजीवनी होते. अन्यायाच्या विरोधात लढणार्‍या शिवाजी महाराजांनी ज्या गोष्टी अंगीकारल्या त्याचा धडा सद्याच्या राजकारण्यांनी घेण्याची गरज आहे असे मत शिवचरित्र व्याख्यानकार गुलाब वळसे-पाटील यांनी व्यक्त केले.
शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नाही तर देशाचे अमृत संजीवनी होते. अन्यायाच्या विरोधात लढणार्‍या शिवाजी महाराजांनी ज्या गोष्टी अंगीकारल्या त्याचा धडा सद्याच्या राजकारण्यांनी घेण्याची गरज आहे असे मत शिवचरित्र व्याख्यानकार गुलाब वळसे-पाटील यांनी व्यक्त केले. धुळ्यातील गरुड मैदानावर श्री. शिवाजी विद्याप्रसारक संस्थेतर्फे शिवचरित्र व्याख्यानमाला घेण्यात येत आहे. या व्याख्यानमालेत शिवचरित्रकार गुलाब वळसे-पाटील यांनी आज दि 18 रोजी दुसरे पुष्प गुंफले. याप्रसंगी जिल्हाधिकारी गोकूळ मवारे, डॉ. भाईदास पाटील, माजीमंत्री रोहिदास पाटील, कुणाल पाटील, उत्कर्ष पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी गुलाब वळसे-पाटील यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांनी तरुणांच्या मनातील कर्तृत्वाचा यज्ञ प्रजोलित केला. अन्यायाच्या विरोधात कधी न शांत झालेला झंझावाद म्हणजे राजा छत्रपती होय. अत्याचारी माणसाच्या शरिरावर घाव घालून त्यांच्या रक्ताच्या थेंबथेंबातून स्वराज्य उभे करण्यात शिवाजी महाराजांनी कामगीरी बजावली. तरुण नेतृत्व असलेल्या शिवाजी महाराजांनी जनतेच्या सुख, दु:खाशी समरसता दाखविली. त्यामुळेच जनताजनर्दानाची ताकद उभी राहीली. महाराष्ट्रात मोगलशाही, आदिलशाही, कुतबशाही यांचा बोलबाला होता. त्यात महाराष्ट्र पिसला जात होता तेव्हा शिवाजी महाराजांनी शुन्यातून स्वराज्य उभारले. महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार येवढीच त्यांच्या कार्याची ओळख नव्हती तर एक अष्टावधाने, अष्टपैलू, प्रजाहित दक्ष, चारित्रसंपन्न, थोर सेनानी, दूरदृष्टीचा जाणता राजा दुसरा कुणी झाला नाही. शिवाजी महाराज धार्मिक होते सांधूसंतांचा आदर करणारे होते. मात्र धर्मभोळे नव्हते, शत्रुशी प्रसंगी तडजोड करणारे होते. परंतु व्यवहारी होते. ध्येयशुन्य नव्हते. महाराष्ट्र राज्याचे ते छत्रपती होते. जनतेचे हित आणि कल्याण ते कधी विसरले नाही. शेतकर्‍यांना बि-बियाणे आणि अवजारे देण्यासह धर्म सुधारकांना त्यांनी मदत केली. शिवारायांचे राज्य सगळ्यांचे राज्य होते. कर्तृत्व, बलिदान, निष्ठेचे फळ यामधून स्वराज्य साकारले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांना स्वामीनिष्ठ सेवकांची कमतरता कधी पडली नाही. म्हणूनच राजनितीत त्यांचे संकीर्तन जगाच्या पाठीवर केले जाते. असेही वळसे-पाटील म्हणाले. या व्याख्यानमालेत उद्या दि. 19 रोजी तिसरे आणि शेवटचे पुष्प प्रा. अरुण घोडके हे शिवरायांचे आठवावे रुप या विषयावर गुंफणार आहे.
शिवरायांनी जगण्याचा मंत्र दिला -प्रा.घोडके शिवचरित्र व्याख्यानमालेचा समारोप; भव्य शोभायात्रा
धुळे, दि. 19 (प्रतिनिधी)-(20-February-2011)
Tags : Dhule

छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नाहीतर माणसाला जगण्याचा मंत्र दिला. असे प्रतिपादन प्रा. अरुण घोडके यांनी केले. धुळ्यातील गरुड मैदानावर श्री. शिवाजी विद्याप्रसारक संस्थेतर्फे शिवचरित्र व्याख्यानमाला गेल्या तीन दिवसापासून घेण्यात येत आहे. आज या व्याख्यानमालेचा समारोप झाला. समारोपाचे पुष्प प्रा. अरुण घोडके यांनी शिवरायांचे आठवावे रुप या विषयावर गुंफले. यावेळी जिल्हाधिकारी गोकूळ मवारे, पोलिस अधीक्षक शशिकांत शिंदे, माजीमंत्री रोहिदास पाटील, ऍड. सौ. अनुराधा शिंदे, मधुकर गर्दे, कुणाल पाटील, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, दरबासिंग गिरासे, उत्कर्ष पाटील, एम.जी. धिवरे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. घोडके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र उलगडून सांगितले. त्यात त्यांनी हिंदवी स्वराज्यांची स्थापना करुन गरीब जनतेला न्याय मिळवून दिला. जीवनातील प्रत्येक प्रसंगाना ते धैर्याने समोरे गेले, कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा. असे आवाहनही त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ हिंदवी स्वराज्य निर्माण केले नाही तर जनतेला जीवन जगण्याचा मंत्रही दिला असेही प्रा. घोडके यांनी सांगितले. शिवाजी विद्याप्रसारक संस्थेतर्फे दरवर्षी व्याख्यानमाला घेण्यात येते. तसेच आज शिवाजी महाराजांच्या जन्म दिनानिमित्त भव्य शोभायात्रा शहरातील विविध मार्गावरुन काढण्यात आली. या शोभायात्रेत सजीव देखावे देखील सादर करण्यात आले होते. शोभायात्रानिमित्त रांगोळ्यांनी रस्ते सजविण्यात आले होते.


शिवरायांना अभिवादन
धुळे, दि. 20 (प्रतिनिधी)-(21-February-2011)
Tags : Dhule,Blog

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भारत मुक्ती मोर्चा, मुलनिवासी संघ, छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा स्टॉप, भारत मुक्ती मोर्चा व ऑटो रिक्षा चालक मालक संघातर्फे अभिवादन करण्यात आहे. यावेळी प्रकाश शिरसाठ, राजदिप आगळे, अशोक कवाडे, ऍड. प्रसेनजित बैसाणे, सतिष अहिरे, राकेश मोरे, शाम मोरे, विजय करनकाळ, भारत जाधव, सुनिल आगळे, वामन अहिरे, शांतीलाल गवळी, राजेश खैरनार, सुरेश झाल्टे आदी उपस्थित होते।

शिवजयंतीनिमित्त उद्या शोभायात्रा
धुळे, दि.17 (प्रतिनिधी)- ( धुळे, 18-February-2011 )
Tags : Dhule
शहरासह जिल्ह्यात शिवजयंती उत्सवानिमित्त दि. 19 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त जिल्ह्यात बंदोबस्तात वाढ करण्यात आला तसेच मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
शहरासह जिल्ह्यात शिवजयंती उत्सवानिमित्त दि. 19 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त जिल्ह्यात बंदोबस्तात वाढ करण्यात आला तसेच मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. मराठा युवक मंडळ- जिल्हा मराठा युवक मंडळातफेर् शिवजयंती उत्सव दि. 19 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता मराठा मंगल कार्यालय येथून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. राजवर्धन कदमबांडे, धुळे ग्रामीणचे आ. प्रा. शरद पाटील, डॉ. सुभाष भामरे, तर शोभा यात्रेचे उद्‌घाटन महापौर मोहन नवले हे करतील. प्रमुख पाहुणे म्हणून शाम जाधव, अतुल सोनवणे, कुणाल पाटील, उत्कर्ष पाटील, विजु देवकर, योगीराज मराठे, डॉ. जितेंद्र घुमरे, विजय ढोबळे, प्रविण भडक आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दीपक रवंदळ, सचिव अनिल जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र ढवळे, चंद्रकांत थोरात, नैनेश साळुंके, रजनीश निंबाळकर, शाम रायगुडे, राजेंद्र जाधव, संदीप सूर्यवंशी, अविनाश बहादुरगे, पुरुषोत्तम जाधव, वामन मोहिते, बाळासाहेब ठोंबरे, रमेश साळुंके आदींनी केले आहे. कॉंग्रेस कमिटी- जिल्हा व शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मनोहर टॉकीज समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास कॉंग्रेसचे पदाधिकारी, सभासद, युवक कॉंग्रेस, कॉंग्रेस सेवादल, महिला कॉंग्रेस, एन. एस. यू. आय., इंटक, अल्पसंख्यांक यांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच महापालिका, जि. प. पं.स.चे सभासद, प्रदेश प्रतिनिधी तसेच कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर, शहर अध्यक्ष युवराज करनकाळ यांनी केले आहे. तीन चाकी सायकल स्पर्धेचे आयोजन- अ.भा. मराठा महासंघावतीने शिवजयंती निमित्त अपंग बांधवांकरिता तिन चाकी सायकल स्पर्धेचे आयोजन दि. 19 रोजी शिवतिर्थ संतोषी माता चौक साक्रीरोड येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्‌घाटन प्रसंगी ग.स. बँकेचे गटनेते सी.एन. देसले, सुनील सोनार, डॉ. सुभाष भामरे, खा. प्रतापराव सोनवणे, प्रा. शरद पाटील, शेखर पाटील, अतुल सोनवणे, महेश घुगरी, विजयकुमार ठोंबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सतिष महाले, सुनिल महाले, चंदू सोनार, दिलीप जगताप, सुनिल कदमबांडे, स्वप्नील महाले, राजू शिंदे, भुरा शिंदे, अंकुशराव पाटील, रघुनाथ ताकटे, गणपत पवार, पुरुषोत्तम जाधव, गोविंद साखला, विकास मिरजकर, संदीप महाले, भटु गिरमकर, हिंमतराव थोरात, मनोहर पाटील, भरत पवार, राजु कौठळकर, बी. बी. गीते, रामदास सूर्यवंशी, सुनिल देवरे, डॉ. बी. एफ. पाटील, जाधव, चिंतामण ताकटे, विलास लवांदे, विजय देवकर, रावण नवले, प्रमोद साळुंगे, किशोर शिंदे, विनायक शिंदे, शशि रवंदळे, काशिनाथ मराठे, ल. की. चहाकर, उदय ठाकरे, दिलीप जाधव, राजाराम जाधव, गोरख रासकर, दिलीप वाघ, चंद्रकांत रावळे, लक्ष्मण भवर, संदीप पाटोळे अरविंद जावळे, निंबा मराठे उपस्थित राहणार आहेत. साक्री वाचनालय- श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी साक्री येथील श्री. छत्रपती शिवाजी वाचनालयाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन वाचनालयाचे अध्यक्ष तथा तहसीलदार सुभाष दळवी यांच्या हस्ते होणार असुन पुतळा पुजन कार्यक्रमाच्या साक्री पंचायत समितीचे सभापती ज्ञानेश्वर नागरे व इतर मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी श्री. छत्रपती शिवाजी महाराज एक युगपुरुष या विषयावर प्रा. लिलाधर पाटील (अमळनेर) यांचे व्याख्यान आयोजित करणात आला आहे. सदर व्याख्यान वाचनालयाच्या सभागृहात सायंकाळी 5.30 वा आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सी. गो. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. तोरवणे हे उपस्थित करणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन वाचनालयाचे उपाध्यक्ष अजीज खॉ पठाण, कार्यवाह आर. डी. भामरे, सांस्कृतिक कार्यक्रम समिती प्रमुख विजय भोसले, सहकार्यवाह प्रा. जे. एन. खैरनार, संचालक प्रा. विनय शाह, जितेंद्र मराठे, मनोज कार्ले, आबा सोनवणे, मुनंद करंजे, नरेंद्र खैरनार, सौ. मिनाक्षी जावळे, बी. एम. भामरे आदींनी केले आहे. मनाई आदेश लागू- दि. 19 फेब्रुवारी 2011 रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल्याने एखाद्या क्षुल्लक कारणावरुन वाद होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) नुसार जिल्ह्यात मनाई आदेश जिल्हाधिकारी गोकूळ मवारे यांनी जारी केला आहे.

No comments: