Sunday, February 20, 2011

रायगड शिवजयंती २०११

रायगडला ‘हेरिटेज-1’ दर्जासाठी प्रयत्न करेन

महाद- कोकणातील किल्ले पुरातत्त्व खात्याच्या सर्वसामान्ययादीवर आहेत. ते हेरिटेज-1च्या यादीवर आल्यास अधिक निधी मिळेल व किल्ल्यांवर सुधारणा अधिक जलद गतीने होतील. याचा विचार करूनच सिंधुदुर्ग, विजयदुर्ग या किल्ल्यांसोबत किल्ले रायगडचे नाव सरकारच्या हेरिटेज-1यादीत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन काँग्रेसचे खासदार डॉ. निलेश राणे यांनी रायगडावर दिले. गुरुवारी त्यांच्या हस्ते किल्ले रायगड ते शिवमंदिर (सिंधुदुर्ग) या शिवतेज मशाल रॅलीस सुरुवात झाली. शिवजयंतीचे औचित्य साधून या रॅलीचे प्रथमच आयोजन केले जात आहे.

या रॅलीच्या निमित्ताने डॉ. निलेश राणे गुरुवारी सकाळी रायगडवर आले. त्या वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व जगदीश्वराची विधिवत पूजा केली व त्यांना अभिषेकही केला. त्यानंतर त्यांनी रायगडाची पाहणी करून जगदीश्वर मंदिराच्या प्रांगणातून मशाल पेटवून शिवतेज मशाल रॅलीचा शुभारंभ केला. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, अशा प्रकारच्या रॅलीच्या माध्यमातून तरुणपिढीला छ. शिवाजी महाराजांचा इतिहास, शौर्य, तेज सांगण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. डॉ. राणे यांनी रायगडवरील आणि परिसरातील रहिवाशांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच या प्रश्नांचा संपूर्ण अभ्यास करून परिपूर्ण माहितीसह आपण पुन्हा येथे येऊ, असेही आश्वासन त्यांना दिले.

रायगड रोप-वेसहा दिवस बंद

वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी रायगडवर जाणारा रोप-वे 21 ते 26 फेब्रुवारीदरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. रायगडावर जाणा-या पर्यटकांची संख्या वाढत असल्याने सुरक्षितताही महत्त्वाची आहे. त्यामुळे वार्षिक दुरुस्तीमध्ये काही बदलही करण्यात येणार आहेत.

No comments: