Sunday, February 21, 2010

विविध उपक्रमांद्वारे शिवजयंती उत्साहात साजरी

पुणे, १९ फेब्रुवारी/प्रतिनिधी
ढोलताशांचा गजर करीत, ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत काढण्यात आलेल्या मिरवणुका; विद्यार्थी, अनाथ मुलांना मिठाई वाटप; अभिवादन सभा या उपक्रमांद्वारे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहून प्रत्यक्षात ते साकारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना विविध संस्था, संघटनांनी मानाचा मुजरा करीत जयंती उत्साहात साजरी केली.
शिवजयंतीनिमित्ताने शहरात विविध भागांतून मिरवणुका काढण्यात आल्या. भवानी माता मंदिरापासून मोठी मिरवणूक काढण्यात आली. भगवे झेंडे, घोडे, पेहराव परिधान केलेली मुले हे सर्वच मिरवणुकांचे आकर्षण ठरले. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळात सभापती अंकुश काकडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी मुख्याधिकारी नानासाहेब बोठे अध्यक्षस्थानी होते. उपअभियंता दिलीप रामतीर्थ, नंदकुमार क्षीरसागर, मिळकत व्यवस्थापक एस. जी. घोडे, ज्ञानेश्वर डवरी, दिनेश रेडकर, डी. जी. गायकवाड आदींची उपस्थिती होती. राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या शहर शाखेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस रवींद्र माळवदकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष अ‍ॅड. वंदना चव्हाण होत्या. अ‍ॅड. औदुंबर खुने पाटील, कासमभाई शेख, नारायण साठे, मुश्ताक पटेल, शालिनी जगताप, किरण पोकळे आदींची उपस्थिती होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक सेलच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आले. या वेळी नाझनीन सय्यद, प्रा. अविनाश ताकवले, लुकमान खान आदी उपस्थित होते.
कोंढव्यातील पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने वर्धमान जैन यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यात आली. अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला. संस्थेचे अध्यक्ष रशीद हसन खान, संचालिका नजीमा खान उपस्थित होते. वानवडी गाव ट्रस्ट आणि विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानच्या वतीने वानवडी येथे शिवजयंतीच्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी हनुमंतराव गवळी उपस्थित होते. वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त व्ही. टी. पवार, नगरसेवक अभिजित शिवरकर, जनसेवा बँकेचे नाना कचरे, नगरसेविका रत्नप्रभा जगताप, श्रीरंग आहेर आदी उपस्थित होते.
पूना कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. अफताब अनवर शेख, डॉ. अरुणकुमार वाळुंज, डॉ. नजरूल बारी, डॉ. शाकीर शेख यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र कॉस्मोपोलेटिन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने २९ शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी आझम कॅम्पस ते लाल महालपर्यंत मिरवणूक काढली. मिरवणुकीचा प्रारंभ संस्थेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी केला. सचिव लतीफ मगदूम, प्रा. मुझफर शेख, इकबाल मुलानी, मुमताज सय्यद यांची उपस्थिती होती.
शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने शिवजयंती निमित्ताने शहरातून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. त्यात दहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. सरदार कान्होजी जेधे यांनी वतनावर पाणी सोडल्याचा देखावा सादर करण्यात आला. समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण क रण्यात आला. ध्येयवादी शिवाजी महाराजांचे विचार अनुकरणीय आहेत. महाराजांवर अनेक संकटे आली, तरी त्यांनी ध्येयवाद सोडला नाही. कोणत्याही निराशेने खचून न जाता ध्येय डोळ्यांसमोर ठेवून विद्यार्थ्यांनी महाराजांचे अनुकरण करावे, असे मत वैद्य यांनी व्यक्त केले. सोसायटीचे मानद सचिव सर्जेराव जेधे यांनी प्रास्ताविक केले. माजी महापौर कमल व्यवहारे, माजी आमदार वसंत थोरात, सुरेश खैरे, आबासाहेब शिंदे, राजेंद्र जगताप, जगदीश जेधे, संभाजी कापसे, राजाराम जेधे, धनाजी जेधे, बाळासाहेब जगताप, विकास गोगावले, नगरसेवक अशोक ऐनपुरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य म. ना. कांबळे यांनी केले. सिंहगडावरून शिवज्योत घेऊन आलेल्या शंभर कार्यकर्त्यांचे नगरसेवक रामचंद्र कदम यांनी स्वागत केले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक साधू ठोंबरे, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती, हमाल पंचायत, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, महात्मा फुले कामगार संघटना, तोलणार संघटना, टेम्पो पंचायत, पथारी व्यावसायिक पंचायत या संघटनांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. भवानी पेठेतील हमाल चौक ते लाल महालापर्यंत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. कष्टकरी महिलांच्या हस्ते राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सनई, चौघडा, नगारखाना, अश्वारूढ मावळे, बॅन्ड पथक आदींचा मिरवणुकीत समावेश होता. मिरवणुकीनंतर डॉ. बाबा आढाव यांनी मार्गदर्शन केले. गणेश घुले, सुरेश शेवाळे, राजेंद्र चोरघे आदींची उपस्थिती होती. पुणे विद्यापीठात शिवजयंती साजरी करण्यात आली. कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. पंडित विद्यासागर, जयकर ग्रंथालयाचे डॉ. एस. के. पाटील, डॉ. धनजंय लोखंडे, प्रा. तेज निवळीकर उपस्थित होते. मराठा महासभेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन संगणक अभियंता देवेंद्र लाटे यांच्या हस्ते क रण्यात आले. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ, महापौर मोहनसिंग राजपाल, संस्थेचे सचिव शिवाजी महाडकर, उत्तमराव पाटील उपस्थित होते.
राष्ट्रीय दलित पॅंथर, कॅन्टोन्मेंट बोर्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय, अखिल भारतीय युवक मराठा महासंघ, स्वाभिमान संघटना, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेस, लोकमान्य टिळक प्रस्थापित गणपती ट्रस्टसह विविध संस्था, संघटनांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली.
कोथरूड ब्लॉक कॉँग्रेसच्या वतीने आज कोथरूडमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. माजी नगरसेवक दामोदर कुंबरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी संदीप कुदळे, हनुमंत राऊत, बबनराव भिलारे, किशोर मारणे, राजेंद्र मगर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तत्पूर्वी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते आशिष गार्डन या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.

सांगलीत मुस्लिम बांधवांकडून ठिकठिकाणी शिवजयंती



लोकसत्ता वृत्तान्त
सांगली, १९ फेब्रुवारी/ प्रतिनिधी
सांगली शहर परिसरात आज शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. या शिवजयंती उत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी ठिकठिकाणी छत्रपती शिवाजीमहाराजांचा पुतळा ठेवून विधिवत शिवजयंती साजरी केली.
मिरज येथे गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी झालेला वाद व त्यानंतर मिरज, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर येथे उसळलेल्या दंगलींचे कोणतेही सावट आजच्या शिवजयंती उत्सवावर दिसत नव्हते. या दंगलीमुळे दुभंगली गेलेली हिंदू-मुस्लिम समाजाची मने सांधण्याचा प्रयत्न आजच्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने केला गेला. शहरातील मुस्लिम समाजातील तरुणांनी पुढाकार घेऊन शहरात ठिकठिकाणी मांडव घालून शिवाजीमहाराजांचे विविध आकारांतील पुतळे, प्रतिमा ठेवल्या होत्या, त्यांना काही ठिकाणी आरासही केली होती. या ठिकाणी स्टिरिओवर लावलेल्या शिवभक्तिपर पोवाडय़ांनी व गीतांनी वातावरण दुमदुमून गेले होते. शहरभर भगवे झेंडे फडकत होते. बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजीमहाराजांच्या सैन्यात असणाऱ्या अनेक मुस्लिम सरदार व शिपायांची नावे असलेला फलक समस्त शिवप्रेमी मुस्लिम समाजातर्फे लावण्यात आला होता.
शहरातील विविध तरुण मंडळांनी वेगवेगळय़ा गडांवरून आणलेल्या शिवज्योती आज सकाळीच शहरात दाखल झाल्या होत्या.
या ज्योतींचे व शिवप्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘छत्रपती शिवाजीमहाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांच्या निनादात सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. शहराचा केंद्रबिंदू असणाऱ्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळय़ाला सकाळी अभिषेक करण्यात आला.


प्रेरणादायी शिवजन्मसोहळा
शनिवार, २० फेब्रुवारी, २०१०

' जय भवानी, जय शिवाजी ' किंवा ' छत्रपती शिवाजी महाराज की जय ' या घोषणा ऐकल्यावर अंगात वीरश्री न संचारणारा महाराष्ट्रीयन विरळाच ! छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. देव, देश अन् धर्मासाठी त्यांनी सर्व जाती-धर्माच्या ' मावळ्यांना ' बरोबर घेऊन गाजवलेला पराक्रम आजही प्रेरणादायी आहे.

शिवनेरी हे शिवरायांचं जन्मस्थळ. १९ फेब्रुवारी, १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेल्या बाल शिवबानं पुढं हिंदवी स्वराज्य स्थापन करुन सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आठवण राहावी, नव्या पिढीला त्यापासून स्फुर्ती मिळावी यासाठी दर वर्षी १९ फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मसोहळा साजरा होत असतो. शिवजयंती निमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवाई देवीचं आणि शिवजन्मस्थळाचं दर्शन घेणं ही एक आनंददायी घटनाच असते !

महाराष्ट्र हा गड-किल्ल्यांचा प्रदेश ! छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या किल्ल्यांना भेटी देणं आणि इतिहासात रमणं हा माझा आवता छंद ! शासकीय सेवेत आल्यानंतर हा छंद वाढवता आला नाही. तथापि सन २००६ पासून शिवजयंतीनिमित्त दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांना मानाचा मुजरा करण्याची संधी मी सोडलेली नाही. तसं म्हटलं तर शिवनेरी किल्ला व परिसर विकास बैठकीच्या निमित्तानं या किल्ल्याला भेट देण्याचा योग येतो.

शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मस्थळास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दरवर्षी अभिवादन करण्यास येतात. यंदाही मुख्यमंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे येणार असल्यानं वृत्तांकन आणि चित्रीकरणासाठी जाणं आवश्यक होतं.

पुण्यापासून शिवनेरीचं अंतर साधारण ८० कि.मी. आहे. शिवजन्मसोहळा सकाळी ९ च्या सुमारास होतो. पायथ्यापासून शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्मस्थळापर्यंत जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नाही, त्यामुळं पायी चालण्याशिवाय पर्याय नसतो. या सर्व गोष्टींचा विचार करुन आम्ही पुण्याहून आदल्या रात्री म्हणजे १८ फेब्रुवारीसच निघालो. रात्री मंचर जवळ मुक्काम करुन सकाळी ६ च्या सुमारास शिवनेरीकडे प्रयाण केले. शिवनेरी परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

शिवनेरीच्या पायथ्यापर्यंत शासकीय वाहनानं गेल्यानंतर तिथून पुढचा प्रवास पायी करावा लागणार होता, त्यामुळं मी, मुख्य कॅमेरामन जयसिंग जाधव, सहायक संजय गायकवाड, छायाचित्रकार सतीश कुलकर्णी, राहुल पाटील असा आमचा लवाजमा निघाला !

शिवाई देवी मंदिरातील देवीचं भजन, शिवरायांचा पोवाडा लाऊडस्पीकरमुळं संपूर्ण परिसरात ऐकू येत होता. पोवाड्यामुळं एक वेगळाच उत्साह जाणवत होता. वरपर्यंत तयार करण्यात आलेल्या पायर्‍यांवरुन आम्ही गडाकडं कूच केलं. महादरवाजा, गणेश दरवाजा, पिराचा दरवाजा, पालखी दरवाजा, हत्ती दरवाजा, मेणा दरवाजा, कुलूप दरवाजा असे दरवाजे पार करत असताना आजूबाजूस लावण्यात आलेली विविध प्रकारची झाडं लक्ष वेधून घेत होती. जुन्नर वन विभागानं या किल्ल्यावर जांभूळ, साग, काटेसावर, निलमोहर, कडूलिंब, गुलमोहर, करंज, पायर, बांबू, वड, चिंच, खैर, वरस, ग्लिरिसिडीया, पळस, चाफा, जास्वंद, बिट्टी अशी अनेक झाडं लावून परिसर शोभीवंत केलेला आहे. या झाडावरील वेगवेगळ्या पक्षांच्या आवाजानं वातावरण आणखीनच भारावून गेलं होतं. प्रत्येक दरवाजावरील फुलांच्या माळा, सजावट किल्ल्याच्या सौंदर्यात भरच घालत होती.

ठराविक अंतरावरील सौरदिवे, कचरा कुंडी, पाने, फुले, फळे न तोडण्याचे आवाहन आणि त्यानुसार किल्ल्याचं पावित्र्य राखण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करताना दिसत होता. किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोणी कॅमेर्‍यानं तर कोणी मोबाईलवरुन फोटो काढून घेत होते.

सकाळी साधारण ७.३० च्या सुमारास आम्ही शिवाई देवी मंदिरात पोहोचलो. जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी अभिषेक आणि महापूजा केली. त्यानंतर शिवजन्मस्थळी आलो. त्या ठिकाणी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन मांडण्यात आलं होतं. लाठी-काठी, ढाल, तलवार, फरशी, भाला, दांडपट्टा, खंजीर, बाणा, बनाटी आदी शस्त्रे ठेवण्यात आली होती.

सकाळी ८.३० वाजता शिवाई देवी मंदिर ते छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. ठीक सव्वा नऊ वाजता मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या हेलीपँडवर हेलिकॉप्टरनं आगमन झालं. शिवजन्मस्थळी पारंपरिक पध्दतीनं शिवजन्म सोहळयात सहभागी झाल्यानंतर पोलिसांच्या वतीनं हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यांनतर सर्व प्रमुख पाहुण्यांनी शिवकुंज इमारतीतील जिजाऊ आणि बालशिवबाच्या पुतळयास अभिवादन केले. उपस्थित शिवप्रेमींना संबोधित करताना मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, शिवरायांनी त्यांच्या काळात रयतेला दिलासा देणारे निर्णय घेतले. शिवरायांचा हाच आदर्श डोळयासमोर ठेवून महाराष्ट्र शासन वाटचाल करीत आहे.

अभिवादनानंतर विजय माने यांच्या शिवकालीन शस्त्र कला पथकाच्या श्याम पाटील, राजाराम, प्रकाश या सहकार्‍यांनी दांडपट्टयाच्या सहाय्याने दुसर्‍याच्या डोक्यावरील नारळ फोडणे, जमिनीवर आडवा झोपलेल्या व हनुवटीखाली ठेवलेला बटाटा कापणे यासारखी श्वास रोखून धरायला लावणारी प्रात्यक्षिके सादर केली.

साधारण ११.३० च्या सुमारास मुख्य शिवजन्मसोहळा संपन्न झाला. आम्ही सर्वांनी युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य प्रेमाची ज्योत हृदयात सतत तेवत ठेवण्याची शपथ घेतली आणि गड उतरायला सुरूवात केली
विजयदुर्गावर आरमारी शिवस्मारक साकारणार
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 21, 2010 AT 12:45 AM (IST)
Tags: konkan, malvan, shivaji maharaj
मालवण - "इतिहास जपण्याबरोबरच तो जगविता आला पाहिजे. त्यामुळे इतिहासाचा खोलवर व वस्तुनिष्ठ अभ्यास व्हायला हवा. यासाठी छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या माध्यमातून राज्यातील जलदुर्गापैकी विजयदुर्ग येथे आरमारी शिवस्मारक व बालोद्यान साकारण्यात येणार आहे,'' अशी माहिती कोल्हापूरचे श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.संभाजीराजे येथे शिवराजेश्‍वर मूर्तीला वस्त्रे प्रदान करण्याच्या कार्यक्रमासाठी आले होते. ते म्हणाले, ""इतिहासावर संशोधनात्मक काम झाले पाहिजे. अनेक नवनवीन अंगाने इतिहासाचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे. असे न झाल्यास आपल्याला राष्ट्रजीवन जगताना अंधारात चाचपडत जगल्याप्रमाणे वाटेल. अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपल्या भागात असणाऱ्या ऐतिहासिक वास्तूंची जपणूक दुसरा कोणी येऊन करणार अशी समज न करता आपणच अशा वास्तूंच्या जपणुकीसाठी प्रयत्न केला पाहिजे. अशाच एका ध्येयाने प्रेरित झालेल्या छत्रपती शिवाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी विजयदुर्गवर शिवरायांचे आरमारी स्मारक व बालोद्यान उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी ८० लाख रुपयांची आवश्‍यकता असून या कामाचा प्राथमिक आराखडा बनविल्यानंतर विजयदुर्गमधील स्थानिकांशी चर्चा करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी या गावातील शिवभक्‍त दानशूर विजय जांभेकर यांनी आपली ५००० चौरस फुटांची जागा या दिली आहे. त्यामुळे या स्मारकाच्या कामासाठी शिवप्रेमींमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.''ते म्हणाले, "या प्रकल्पामध्ये शिवरायांच्या आरमाराचे गलबत व गलबतावर महाराज, एक प्रधान व एक दर्यावर्दी नाविक असे पुतळे उभारून त्याभोवती बालोद्यान उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामधील पुतळे साकारण्यासाठी कोल्हापूर येथील शिल्पकार समीर सावंत व विक्रम सावंत यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी या कामाला सुरवातही केली आहे. या कामाचा आराखडा प्रसिद्ध आर्किटेक्‍चर सत्यजित पवार यांनी बनविला आहे. तरी या प्रकल्पासाठी राज्यातील शिवप्रेमींनी, देणगीदारांनी, विविध संस्थांनी मदत करावी. त्यांनी आपली मदत छत्रपती बिग्रेड घर नं. १०४७, ए वॉर्ड, फिरंगाई मंदिरानजीक, शिवाजी पेठ, कोल्हापूर, तसेच अतुल माने, गिरीश जाधव यांच्याशी संपर्क साधावा.''

shivaji maharaj birth anniversary celebrated ....

शिवजयंती उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 20, 2010 AT 12:00 AM (IST)

पिंपरी - "छत्रपती शिवाजी महाराज की जय,' "जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पिंपरी-चिंचवड शहर परिसरात शुक्रवारी (ता. 19) उत्साहात साजरी करण्यात आली.महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत महापौर योगेश बहल आणि आयुक्त आशिष शर्मा यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स (एचए) कंपनी, खराळवाडी, पिंपरी वाघेरे, डांगे चौक (थेरगाव), रहाटणी, भक्ती-शक्ती चौक (निगडी), लांडेवाडी (भोसरी), मोशी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांसही महापौर बहल यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. महापालिकेत उपमहापौर डब्बू आसवानी, "ड' प्रभाग अध्यक्षा विजया सुतार, प्रभाग अधिकारी दिलीप गावडे, विश्‍वास भोसेकर, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे उपस्थित होते. रहाटणी, लांडेवाडी, दापोडी, फुगेवाडी, मोहननगर (चिंचवड), थेरगाव गावठाण, पीसीएमटी चौक (भोसरी) येथील शिवरायांच्या पुतळ्यांस स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अखिल भारतीय विकास आघाडीच्या वतीने आघाडीचे अध्यक्ष ईश्‍वर कांबळे यांनी एचए कॉलनीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. सचिव प्रवीण कांबळे, कार्याध्यक्ष आनंद नरवाडे, भागवत कांबळे उपस्थित होते. शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खराळवाडी येथील कार्यालयात झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष अशोक भगत, सेवा दलाचे अध्यक्ष विजय लोखंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. रवींद्र ओव्हाळ, आनंदा कुदळे उपस्थित होते. सावित्रीबाई फुले भाजी व्यवसाय मार्गदर्शक संघातर्फे श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मंदाकिनी रोकडे यांनी पुष्पहार अर्पण केला. यशवंत शेउबाळे, राजाराम भोसले, संस्थेचे सचिव सूर्यकांत उबाळे यांनी मनोगत व्यक्त केले. भीमराव वाघमारे, महादेव वडमारे, भाऊसाहेब अभंग उपस्थित होते. चिंचवडमध्ये उपक्रमप्रेमलोक पार्कमधील प्रेमलोक पार्क मित्रमंडळाच्या वतीने सकाळी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. चिंचवड गावात मोरया रिक्षा स्टॅंड व वंदना पॅलेस ग्रुपतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. शिव गर्जना ग्रुप, झुंजार ग्रुपच्या आणि गांधी पेठ तालीम मित्रमंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. आकुर्डीत पूजनयेथील विठ्ठलवाडीत नगरसेविका सविता वायकर यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. अमर कांबळे, योगेश साळुंके उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या वॉर्ड क्रमांक 51 शाखा आणि नगरसेवक उल्हास शेट्टी मित्र परिवाराच्या वतीने दत्तवाडी येथे श्री. शेट्टी आणि सामाजिक कार्यकर्ते जयराम मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष हरेश तापकीर यांच्या हस्ते रहाटणीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवाजी खुळे, संतोष ओझा उपस्थित होते. महात्मा फुले जनसेवा मंडळातर्फे अध्यक्ष विजय जाधव, विठ्ठल लडकत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. बोपोडीतील वंदे मातरम संघटनेने उत्साहाने शिवजयंती साजरी केली. माणिकराव खेडेकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. खडकीतील संघटनेचे अध्यक्ष मोतीराज स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. संघटनेचे सतीश यमतेलू, आनंद चंडालिया, संतोष भिसे आदी उपस्थित होते. "शिवाजी महाराजांच्या नीतीची गरज' श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने एचए कॉलनीत आयोजित कार्यक्रमात पुणे-इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहनराव शेटे म्हणाले, ""देशापुढे असणाऱ्या दहशतवादी आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नीतीची गरज आहे.'' एचए कंपनीचे महाव्यवस्थापक के. पी. राजन अध्यक्षस्थानी होते. विजय कापसे, महंमद पानसरे उपस्थित होते.

"जय भवानी...जय शिवाजी'
Saturday, February 20, 2010 AT 03:57 PM (IST)
गजराने दुमदुमली शाहूनगरी ! सातारा, दि. 19 : डफावर पडणारी थाप, कडाडणारी हलगी, धडाडणारे ढोल आणि ताशांच्या कडकडाटात शुक्रवारी सातारा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एकच गजर झाला तो म्हणजे, "जय भवानी...जय शिवाजी'चा! अशा अंगावर रोमांच उभे करणाऱ्या वातावरणात संपूर्ण जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून सातारा शहरात 19 फेब्रुवारीची शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. यंदाही सातारा पालिकेने पुढाकार घेवून शिवजयंतीला शाही स्वरुप दिले. शिवजयंतीनिमित्त गांधी मैदानापासून शहरातील दोन्ही प्रमुख रस्त्यांवर भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. राजवाड्यासमोरील जवाहर बागेस विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पोवई नाक्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शहरातील विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रायगड, प्रतापगड, अजिंक्यतारा, सज्जनगड, वर्धनगड आदी ठिकाणांहून शिवज्योत आणली. सायंकाळी 6 च्या सुमारास शिवजयंतीच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत विविध शाळांनी साकारलेले चित्ररथ शाहूनगरवासियांचे आकर्षण ठरले होते. शिवजन्म सोहळ्यापासून राज्याभिषेकापर्यंतच्या घटना जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून दाखविणारे 22 चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. या चित्ररथांसह लेझीम पथक, झांजपथक, घोडेस्वारांसह काढलेल्या या मिरवणुकीने सातारकरांसमोर शिवकाल उभा केला. मिरवणुकीच्या अग्रभागी भगवे फेटे परिधान केलेले बाल मावळे, युवतींचे लेझीम पथक, घोडेपथक, बालशिवाजी, पारंपरिक वेषभूषेतील युवती सहभागी झाल्या होत्या. सनई, चौघडा, ढोल-ताशे, लेझीम पथक, हलगी पथक, पारंपरिक वेशभूषेतील वासुदेव, सयाजीराव महाविद्यालयातील मुलांचे बॅंडपथक आणि विविध शाळांची झांजपथके सहभागी झाली होती. यांच्यापाठीमागे शिवाजी उदय मंडळाच्या पालखीची मिरवणूक होती. त्यामध्ये पारंपरिक वेषभूषेतील फेटाधारी युवक-युवती सहभागी झाले होते.शाहूनगरवासियांचे खरे आकर्षण ठरले ते विविध शाळांचे चित्ररथ. निर्मला कॉन्व्हेंटचे पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी, कलाविहार विद्यालयाची ग्रंथ दिंडी, शाळा क्र. 20 ची ज्ञानेश्वरांची पालखी, शाळा क्र. 11 चा जातीभेद विरोधी देखावा, मराठी मिशन युनियन स्कूलचा पावन खिंड हा देखावा, तुकाराम भेट, इक्रा स्कूलचा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा सन्मान, आबासाहेब चिरमुले विद्यालयाचा पावन खिंड, हिंदवी पब्लिक स्कूलचा राज्याभिषेक सोहळा, जानकीबाई प्रेमसुख झंवर शाळेचा कोंढाणा, नूतन मराठी शाळेचा हिरकणी बुरूज आदी चित्ररथ सहभागी झाले होते. शिवाजीराजे व रामदास स्वामी भेट, शिवरायांचे बालपण, शिवरायांचे गोरक्षण आदी चित्ररथ मिरवणुकीचे आकर्षण ठरले. दरम्यान, मिरवणुकीच्या पूर्वी उत्कृष्ट खेळाडूंना खा. श्री.छ.उदयनराजे यांच्या हस्ते गुणगौरव पुरस्कार देवून गौरवण्यात आले. कार्य आणि कर्तृत्वावर व्यक्ती मोठी होते, छ. शिवाजी महाराज त्याचे उदाहरण आहेत, असे प्रतिपादन खा. उदयनराजे यांनी यावेळी केले. किल्ले प्रतापगडावर शिवजयंती साजरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले प्रतापगड येथे जिल्हा परिषदेच्यावतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त रयत सेवक प्राध्यापक शिवाजीराव चव्हाण यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले. किल्ले प्रतापगड येथे शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. ज्योती जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. मुळूक, कृषी सभापती राजाभाऊ शेलार, शिक्षण सभापती भास्करराव गुंडगे, समाजकल्याण सभापती अशोकराव खरात, महिला व बालकल्याण सभापती सौ. जयश्री भोसले, उद्योजक राजेंद्र भोसले, पंचायत समित्यांचे सभापती, वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर, शिवप्रेमी उपस्थित होते. शिवजयंती उत्सवा-निमित्त जिल्हा परिषदेच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात भवानी मातेची पूजा करुन करण्यात आली. यावेळी भवानी माता मंदिरात सौ. ज्योती जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, विलास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नंतर मिरवणुकीने शिंग तुतारी, लेझीम पथक यांच्या निनादात मिरवणुकीस सुरुवात होऊन ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजंाच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रारंभी चंद्रकांत जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, उपशिक्षणाधिकारी जगदाळे यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. या समारंभास उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, शिक्षणाधिकारी उदयसिंह भोसले, दीपक मगर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोकरे, कृषी विकास अधिकारी चांगदेव बागल यांच्यासह विषय समित्यांचे तसेच पंचायत समित्यांचे सन्माननीय सभापती, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि गावपातळीवरील पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, नागरिक, ग्रामस्थ आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरी करण्यात आली. शिवजयंतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील सभागृहात आयोजित करण्यात येवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन केले. शिवजयंती कार्यक्रमास तहसीलदार अंकुश भिलावे, जिल्हाधिकारी यांचे चिटणीस नेताजी कुंभारे तसेच अधिकारी, कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवजयंती साजरी

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.शहराच्या वतीने महापौर योगेश बहल यांनी हिंदूस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनी वसाहतीमधील अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. या वेळी महापलिका आयुक्त आशिष शर्मा, उपमहापौर डब्बू आसवाणी आदी प्रमुख उपस्थित होते. श्री छत्रपती शिवाजी स्मारक समितीच्या वतीने अध्यक्ष मोहन शेटे, कंपनी महाव्यवस्थापक के.पी. राजन, मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील पाटसकर तसेच महंमदभाई पानसरे उपस्थित होते.
संभाजीनगर (चिंचवड) येथे ‘श्रीं’ ची इच्छा प्रतिष्ठानच्या वतीने शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. कुशाग्र कदम यांनी प्रतिमा पूजन केले. सुरेश जासूद, सारंग अवचट, श्रीकांत परंदले यांनी संयोजन केले. काळेवाडी येथे हिंद युवा प्रतिष्ठानच्या वतीने आजपासून चार दिवस व्याख्यानमालेची सुरुवात नेताजी चव्हाण यांच्या व्याख्यानाने करण्यात आली. महेश नढे यांनी संयोजन केले. जिजाऊ ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ यांच्या वतीने थेरगाव येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. मोनिका भोसले यांनी आयोजन केले होते.
निगडी येथे भक्ती-शक्ती उद्यानात छत्रपतींच्या पुतळ्यासमोर महापालिकेच्या वतीने व्याख्यानमालेचा शुभारंभ करण्यात आला तसेच दीपोत्सवाची सजावट करण्यात आली. शहर राष्ट्रवादीच्या खराळवाडी कार्यालयात सेवादल अध्यक्ष विजय लोखंडे, आनंदा कुदळे, उल्हास जाधव यांनी प्रतिमा पूजन केले. संत तुकारामनगर येथे शंभुराजे प्रतिष्ठानने नेत्रदानाचे अर्ज भरून घेतले. श्रीकांत मचाले आणि वीरेंद्रसिंह शितोळे यांनी संयोजन केले. भोसरी येथे समता संघर्ष प्रतिष्ठानतर्फे हरिष डोळस, भारत कुंभारे यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. सांगवी येथे लोकसेवा शिक्षण संस्थेच्या अध्यापक विद्यालयात गुरुराज चरंतीमठ यांनी छत्रपतींचा आदर्श आजच्या पिढीला आवश्यक असल्याचे व्याख्यानात सांगितले. प्रा. संजय पन्हाळकर, सुनीता चव्हाण, प्राजक्ता खटाटे आदी उपस्थित होते. पिंपरी येथील सावित्रीबाई फुले भाजी मंडई संघटनेच्या वतीने मंदाकिनी रोकडे, महादेव वडमारे, भीमराव वाघमारे, सूर्यकांत उबाळे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. बोपोडी येथील वंदे मातरम् संघटनेच्या वतीने माणिक खेडेकर यांनी पुतळ्याला अभिवादन केले. आनंद चंडालिया, संतोष भिसे आदी उपस्थित होते
शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हरीश तापकीर यांनी रहाटणीगाव येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. या वेळी शिवाजी खुळे, संदीप गोडांबे, संतोष ओझा, प्रशांत वाघमारे उपस्थित होते. रिपाइं युवा मोर्चाचे शहर संघटक सचिन गायकवाड यांनी एचए कंपनी जवळील पुतळ्याला अभिवादन केले. आबा वाघमारे, अशोक निर्सगध, पांडुरंग डोंगरे, भारत वाघमारे उपस्थित होते.

जळगाव शहरात आज विविध संस्थांचे वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली .या निमित्त शिवकालीन देखाव्यासह मिरवणुक काढण्यात आली होती .या मिरवणुकीची सांगता शिवतीर्थ मैदानावर शिवाजी महाराजंाच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली.

शहरात आज मराठा सेवा संघ ,शिवाजी ब्रिगेड ,छावा संघटना आदी संघटनांचे वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

आकर्षक मिरवणूक काढून शिवजयंती साजरी

ढोलताशांचा निनाद, लेझीम पथक, पोवाडे पथक, चित्ररथ व त्यावरील जिवंत देखावे यासह काढण्यात आलेल्या मिरवणुकीने नगर शहरात तारखेनुसार शिवजयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत 4 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. याशिवाय शहरातील विविध चौकांतही छत्रपती शिवाजी महाराजांची छायाचित्रे लावून शिवजयंती साजरी करण्यात आली. जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आज सकाळी सव्वा आठ वाजता जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी पुष्पहार अर्पण केल्यावर मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी पोलिस अधीक्षक विजय चव्हाण, महापालिका आयु्नत संजय काकडे, अप्पर पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, प्रांताधिकारी डॉ. महेश पाटील, प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक ज्योती सिंह यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य विलासराव आठरे, उपाध्यक्ष रामनाथ वाघ आदी उपस्थित होते. जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत रेसिडेन्शिअल विद्यालय, अध्यापक विद्यालय, शिशू संगोपन विद्यालय यांच्यासह संभाजी ब्रिगेडही सहभागी झाले होते. यावेळी मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रथासह अन्य आकर्षक देखावे सादर करण्यात आले होते. या मिरवणुकीत गोडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दांडपट्टा देखावेही सादर करण्यात आले होते. ही मिरवणूक शिवाजी महाराज पुतळ्यापासून माळीवाडा, पंचपीर चावडी, माणिक चौक, कापडबाजार, तेलीखुंट मार्गे नेताजी सुभाष चौकात आल्यावर शिवसेनेच्या वतीने मिरवणुकीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. नंतर तेथून चौपटी कारंजामार्गे रेसिडेन्शिअल महाविद्यालयाच्या मैदानावर गेल्यानंतर मिरवणुकीचा समारोप झाला. दिल्लीगेट येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीनेही शिवजयंती साजरी करण्यात आली. येथे आकर्षक सजावट करून शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे ध्वनिवर्धकावर लावण्यात आले होते. भिस्तबाग नाका येथेही संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. नगरसेवक गणेश भोसले यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. येथेही आकर्षक सजावट करण्यात आली होती. केडगाव येथेही स्पंदन प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माजी महापौर संदीप कोतकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Friday, February 19, 2010

राज्यभर शिवजयंती उत्साहात

आज शिवजयंती...त्यानिमित्त मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी शिवनेरी गडावर जाऊन शिवप्रतिमेचे पूजन केले. तर जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी शासकीय पूजा केली.


दरम्यान पुण्यात झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर शिवनेरी गडावर कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गडावर आज 500 सुरक्षा कर्माचारी तैनात आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मराठा महासंघाच्या मागणीशी आपण सहमत आहोत, असे मुख्यमंत्री भाषणात म्हणाले.


नागपूरमध्ये उत्साह


नागपूरमध्येही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नागपूरच्या गांधी गेट येथील शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. याच निमित्ताने लहान मुलांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सगळे विद्यार्थी मावळ्यांच्या वेशात आले होते. यावेळी 'जय भवानी जय शिवाजी'च्या घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला.


सोलापुरात सांस्कृतिक कार्यक्रम


सोलापूरमध्येही शिवजयंती जोरदार साजरी करण्यात आली. यावेळी सोलापुरमधील मान्यवर मंडळी उपस्थित होती. शिवजयंती निमित्त वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


सांगलीत मुस्लिम समाजाचा सहभाग


सांगलीत आज मुस्लिम समाजाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शहरातील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मुस्लिम समाजाच्या वतीने हार घालण्यात आला.

शिवाजी महाराजांच्या सय्यद बंडा, हिरोजी फर्जद अशा मुस्लिम शिलेदारांची यावेळी माहिती सांगण्यात आली. कार्यक्रमाला महिला आणि तरुणांची मोठी उपस्थिती होती.

Tuesday, February 2, 2010

international chhatrapati festival-विश्व छत्रपती महोत्सव 2010.

विश्व छत्रपती महोत्सव 2010.

औरंगाबाद येथील कार्यक्रम

दि.१८ फेब्रुवारी २०१०.
व्याख्यान - श्रीमंत कोकाटे ( प्रदेशाध्यक्ष- मराठा इतिहास कक्ष,महाराष्ट्र)
स्थळ - शिवाजी नगर.औरंगाबाद.
विषय - शिवाजी महाराज.

दि.१ फेब्रुवारी २०१०. शिवजयंती

शिवजयंती मिरवणूक
सुरुवात- क्रांती चौक
सकाळी ८ वाजता समारोप- मुकुंदवाडी.औरंगाबाद.

दि. २० फेब्रुवारी २०१०.

व्याख्यान - प्रदीप सोळुंके (संभाजी ब्रिगेड प्रवक्ता ) विषय- राजर्षी शाहू महाराज. स्थळ -टी व्ही सेंटर,औरंगाबाद

दि. २१ फेब्रुवारी २०१०.
व्याख्यान - दिलीप चौधरी (जगतगुरू तुकोबाराय साहित्य परिषद,सचिव,चंद्रपूर )
विषय - शिवाजी महाराज आणि पंजाबराव देशमुख. स्थळ - मौलाना आझाद संशोधन केंद्र,औरंगाबाद .

दि. २२ फेब्रुवारी २०१०.

व्याख्यान - लीलाधर पाटील
विषय - संभाजी महाराज,
स्थळ - बालाजीनगर,औरंगाबाद.

दि.3 फेब्रुवारी २०१० .

व्याख्यान - प्रा. गणेश बेलंबे. विषय - जिजाऊ -येसूबाई-ताराराणी.
स्थळ -गजानन महाराज मंदिर, पुंडलिक नगर,औरंगाबाद.


दि. फेब्रुवारी २०१०.(राजाराम महाराज जयंती.)

व्याख्यान - प्रा.रवींद्र बनसोड.
विषय - शिवाजी महाराज ते राजाराम महाराज.
स्थळ - अविष्कार चौक, एन ६. सिडको.औरंगाबाद.

दि. फेब्रुवारी २०१0
व्याख्यान - गंगाधर बनबरे विषय - संत तुकाराम महाराजांचे स्वराज्य योगदान

दि. फेब्रुवारी २०१0

व्याख्यान - संजीव भोर
स्थळ - बजाज नगर वाळूज
दि. फेब्रुवारी २०१0

व्याख्यान - विठ्ठल भुसारे
स्थळ - शाहू भवन .


सर्व कार्यक्रम वेळ 6 pm daily .

शिवजयंती उत्सव भव्य मिरवणुकीचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, February 18th, 2009
सातारा पालिकेचा पुढाकार - 39 चित्ररथांसह लेझीम, झांजपथक, घोडेस्वार सहभागी होणार
सातारा - शिवजन्म सोहळ्यापासून राज्याभिषेकापर्यंतच्या घटना जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून दाखविणारे 39 चित्ररथांसह लेझीम पथक, झांजपथक, घोडेस्वार आदींद्वारे गुरुवारी (ता. 19) शिवजयंतीनिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालिकेच्या पुढाकाराने काढण्यात येणारी ही मिरवणूक सातारकरांना चक्‍क शिवकालीन काळात घेऊन जाणारी असणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून साताऱ्यात 19 फेब्रुवारीस मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. यंदाही सातारा पालिकेने पुढाकार घेऊन शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यासाठी विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन केले आहे. शिवजयंती उत्सवाच्या उपक्रमांना आजपासून (मंगळवार) शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या वक्‍तृत्व स्पर्धांनी झाला.
दरम्यान, शिवजयंतीनिमित्त राजपथावर भगव्या पताका लावण्यास प्रारंभ झाला आहे. राजवाड्यासमोरील जवाहर बागेस विद्युतरोषणाई करण्यात आली असून, पोवई नाक्‍यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात रोषणाईची जय्यत तयारी सुरू आहे. शहराच्या विविध भागांतील युवा मंडळांचे कार्यकर्ते जिल्ह्यातील किल्ले अजिंक्‍यतारा, सज्जनगड, प्रतापगड, वर्धनगड आदी ठिकाणांहून शिवज्योत आणण्यासाठी रवाना झाले आहेत.
सातारा पालिकेतर्फे सायंकाळी पाच वाजता शिवजयंती मिरवणूक काढण्यात येईल. या मिरवणुकीचा प्रारंभ माजी राज्यमंत्री उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होणार आहे. या वेळी नगराध्यक्ष निशांत पाटील व उपाध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका तसेच शिवप्रेमी सहभागी होणार आहेत. ही मिरवणूक पोलिस मुख्यालय मार्गे शेटे चौक, कमानी हौद, देवी चौक मार्गे राजवाड्यावर गांधी मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत शिवरायांच्या जन्मकाळापासून त्यांचा लग्न सोहळा, प्रतापगडावरील पराक्रम, आग्य्राहून सुटका, तसेच शिवराज्याभिषेक सोहळा असे विविध प्रसंग शालेय विद्यार्थ्यांद्वारे सादर केले जाणार आहेत.
संग्रहालय पाहण्यासाठी सवलत
छत्रपतींच्या राजधानीत साजरा केला जाणारा शिवजयंती उत्सव राज्यात आदर्शवत ठरावा, यासाठी पालिका गेली दोन वर्षे प्रयत्नशील आहे. यंदाही पालिकेतर्फे हा उत्सव दिमाखदार व्हावा, यासाठी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. नगराध्यक्ष निशांत पाटील व उपाध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांतून 19 फेब्रुवारीस छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय नागरिकांना मोफत पाहता येणार आहे.