Saturday, February 19, 2011

शिवनेरी - शिवजयंती शासकीय कार्यक्रम २०११

शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी...

जुन्नर (पुणे) - 19 फेब्रुवारी 2011

किल्ले शिवनेरीवर आज शासकीय शिवजयंती साजरी होत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव फक्त निमंत्रितांनाच प्रवेशीका देण्यात आल्याने बाकी शिवप्रेमींना उत्सवात सामील होता आले नाही.

या शासकीय शिवजयंतीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते, उपस्थित राहणार आहेत. आज सकाळी सात वाजता पुण्याचे जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी आणि आयुक्त दिलीप बंड यांच्या हस्ते गडदेवतेची पुजा करण्यात आली. राज्यभरातून शिवप्रेमी शिवनेरीवर दाखल झाले आहेत,

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवनेरी किल्ल्यावर आज (शनिवार) शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी साडेनऊच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे शिवनेरीवर आगमन झाले. त्यानंतर शिवकुंज येथील बाल शिवाजी व जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. युवकांनी विविध खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी शिवनेरीवरील विविध विकासकामांची पाहणी करण्यात आली।

सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 20, 2011 AT 02:00 AM (IST)


किल्ले शिवनेरी (ता.जुन्नर) - येथील शिवजन्मसोहळा प्रसंगी पाळण्याची दोरी ओढून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाळणा कार्यक्रमात सहभाग घेतला.
या वेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार वल्लभ बेनके, आमदार बापूसाहेब पठारे व इतर उपस्थित होते.
---
ओझर - शिवजयंती सोहळ्यानिमित्त आयोजित अभिवादन सभेत श्री. चव्हाण बोलत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते, किल्ले शिवनेरी परिसर विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार वल्लभ बेनके, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार विनायक मेटे, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता दगडे, विभागीय आयुक्‍त दिलीप बंड, जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी, पोलिस महानिरीक्षक भगवंतराव मोरे तसेच विविध मान्यवर या वेळी उपस्थित होते.

किल्ले शिवनेरीवरील शिवजन्मसोहळा तसेच राजमाता जिजाऊ व बालशिवाजीच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी किल्ले शिवनेरीवरील विकासकामांची पाहणी केली. शिवजन्मसोहळ्यानंतर शिवजन्मस्थळाबाहेरील प्रांगणात झालेल्या ठाणे येथील लहुजी वस्ताद तालीम मंडळाने सादर केलेली दांडपट्ट्यांची प्रात्यक्षिके व शिवकालीन मर्दानी खेळांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

श्री. चव्हाण म्हणाले, की ""शिवनेरी परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित व्हावा. यासाठी उपमुख्यमंत्री व मी स्वतः आग्रही आहे. त्यामुळे हा विचार आम्ही पूर्णत्वास नेऊ. खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पाला पूरक असा अणुशक्‍ती केंद्राचा प्रकल्प येथे उभा राहावा यासाठी प्रयत्न करणार आहे.''

अजित पवार म्हणाले, की ""किल्ले शिवनेरी विकासासाठी 88 कोटी खर्च करून परिसर विकासाचे शासनाचे ध्येय आहे. यंदाच्या वर्षासाठी 10 कोटी रुपये निधी दिला आहे. अजूनही निधी देण्याची शासनाची तयारी आहे.'' जुन्नर तालुक्‍याला पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्राधान्यक्रम देण्याचे आश्‍वासन देऊन ते म्हणाले, की शिवनेरीच्या संरक्षक भिंतीच्या परिसरात 100 मीटरपर्यंत कोणतेही बांधकाम करता येणार नाही. त्यासाठी पुरातत्त्व खात्याच्या कायद्याचे पालन करावेच लागेल.

आमदार बेनके म्हणाले, की ""जुन्नर तालुक्‍यात जीएमआरटी प्रकल्पामुळे तालुक्‍याच्या रोजगाराच्या संधी गेल्या. येथे कारखानदारी होऊ शकत नाही; परंतु येथील परिसर निसर्गसंपन्न असल्याने रोजगार उभा करण्यासाठी तालुका पर्यटन क्षेत्र आणि येडगाव परिसरात यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक पूर्णत्वास यावे.''

किल्ले शिवनेरीवरील सोहळ्यासाठी विविध शिवप्रेमी संघटना, मराठा सेवा, संघ संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक किल्ले शिवनेरी विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार बेनके यांनी केले. आमदार विनायक मेटे यांनी आभार मानले.

पर्यटन विकासासाठी अधिकाधिक निधी
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 20, 2011 AT 12:00 AM (IST)

जुन्नर - "पर्यटन क्षेत्रातून अन्य क्षेत्रांच्या तुलनेत अधिक रोजगारनिर्मिती होत असल्याने पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी अधिक निधी उपलब्ध करून दिला जाईल,'' असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.

शिवजन्म सोहळ्यानंतर जुन्नर येथील बाजार समितीच्या आवारात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते, आमदार वल्लभ बेनके, विनायक मेटे, दिलीप मोहिते, बापू पठारे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता दगडे, उपाध्यक्ष अरुण गिरे, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष संजय काळे, बाजीराव ढोले, पंचायत समितीचे सभापती देवेंद्र खंडे, उपसभापती गंगाराम गुंजाळ, नगराध्यक्षा भारती मेहेर, उपनगराध्यक्ष संजय साखला, प्रकाश म्हस्के, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, नगरसेवक तसेच शिवप्रेमी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ""तालुक्‍याचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व लक्षात घेता येथे पर्यटनाला अधिक वाव आहे. येथे औद्योगिक विकास होऊ शकत नाही, यामुळे पर्यटन विकासासाठी अतिरिक्‍त निधी दिला जाईल. येडगाव येथील यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. शिवनेरीसाठी दिलेल्या निधीतून शंभर वर्षे टिकतील अशी दर्जेदार कामे होतील याकडे लक्ष द्यावे.''

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंतीनिमित्त महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर एका उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिवनेरी गडावर सजावट करण्यात आली होती. काही बालकांनी शिवाजी महाराजांची वेषभूषा धारण केली होती. सकाळपासून असंख्य शिवप्रेमी गडावर या उत्सवासाठी हजर झाले होते. ढोलताशे आणि चौघड्यांच्या आवाजाने शिवनेरीचा परिसर दणाणून सोडला होता.

सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे शिवनेरीवर आगमन झाले. त्यानंतर शिवकुंज येथे असणा-या बाल शिवाजी आणि जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. शिवप्रेमी युवकांनी यावेळी विविध खेळांची प्रात्यक्षिकं सादर करुन उपस्थितांची मनं जिंकली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवनेरी गडावरील विकासकामांची पाहणी देखिल केली.

No comments: