Saturday, February 19, 2011

मुंबई शिवजयंती २०११

शिवतेज रॅली’ची दिमाखदार सांगता

खासदार डॉ. निलेश राणे यांच्या पुढाकाराने आयोजित रायगड ते सिंधुदुर्ग ‘शिवतेज रॅली’चे शनिवारी, शिवजयंती दिनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरात शेकडो शिवप्रेमींच्या गर्दीत दिमाखदार सांगता झाली. उद्योगमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे, खासदार डॉ. निलेश राणे, ‘स्वाभिमान’ संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे हेही या वेळी उपस्थित होते.

मालवण- खासदार डॉ. निलेश राणे यांच्या पुढाकाराने आयोजित रायगड ते सिंधुदुर्ग शिवतेज रॅलीचे शनिवारी, शिवजयंती दिनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरात शेकडो शिवप्रेमींच्या गर्दीत दिमाखदार सांगता झाली. उद्योगमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे, खासदार डॉ. निलेश राणे, ‘स्वाभिमानसंघटनेचे अध्यक्ष नितेश राणे हेही या वेळी उपस्थित होते.

कोल्हापूरामधून आलेल्या तरुणांनी तलवारबाजी व लाठय़ा-काठय़ांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करुन या सोहळ्यात रंगत आणली. रायगड येथून गुरुवारपासून सुरू झालेली ही रॅली शुक्रवारी सायंकाळी मालवण शहरात दाखल झाली होती. शनिवारी सकाळी खासदार डॉ. निलेश राणे यांच्या हस्ते कुंभारमाठ येथील शिवपुतळयाला पुष्पहार अर्पण करून मालवणमधील रॅलीचा शुभारंभ झाला. कुंभारमाठ येथील न्यू छत्रपती ब्रिगेडच्या युवकांनी या वेळी थरारक प्रात्यक्षिके करून दाखवली. त्यानंतर शिवज्योतीसह किल्ले सिंधुदुर्गच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या या रॅलीत सुमारे 100 मोटरसायकलस्वार सहभागी झाले होते. स्वत: खासदार डॉ. निलेश राणेही मोटरसायकलवरुन या रॅलीत सहभागी झाले होते.

बंदर जेटी येथे या रॅलीचे आगमन झाल्यानंतर पालखीसह ढोलताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज व मावळयांच्या वेशभूषेत कार्यकत्रे सहभागी झाले होते. येथूनच उद्योगमंत्री नारायण राणे व स्वाभिमानचे अध्यक्ष नितेश राणे शोभायात्रेत सहभागी झाले. यानंतर रॅली वाजतगाजत किल्ले सिंधुदुर्गवर नेण्यात आली.

आमदार राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेधा पाताडे, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रविंद्र फाटक, यांच्यासह राष्ट्रीय व युवक कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शिवराजेश्वर मंदिरात शिवज्योत रॅली पोहोचल्यावर उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते शिवराजेश्वराला गंगासागरातील सप्तनद्यांच्या पाण्याने अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर उद्योगमंत्री नारायण राणे, खासदार डॉ. निलेश राणे व स्वाभिमानचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या हस्ते शिवराजेश्वराच्या मूर्तीची पूजा करण्यात आली.

महाड- कोकणातील किल्ले पुरातत्त्व खात्याच्या सर्वसामान्ययादीवर आहेत. ते हेरिटेज-1च्या यादीवर आल्यास अधिक निधी मिळेल व किल्ल्यांवर सुधारणा अधिक जलद गतीने होतील. याचा विचार करूनच सिंधुदुर्ग, विजयदुर्ग या किल्ल्यांसोबत किल्ले रायगडचे नाव सरकारच्या हेरिटेज-1यादीत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन काँग्रेसचे खासदार डॉ. निलेश राणे यांनी रायगडावर दिले. गुरुवारी त्यांच्या हस्ते किल्ले रायगड ते शिवमंदिर (सिंधुदुर्ग) या शिवतेज मशाल रॅलीस सुरुवात झाली. शिवजयंतीचे औचित्य साधून या रॅलीचे प्रथमच आयोजन केले जात आहे.

या रॅलीच्या निमित्ताने डॉ. निलेश राणे गुरुवारी सकाळी रायगडवर आले. त्या वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व जगदीश्वराची विधिवत पूजा केली व त्यांना अभिषेकही केला. त्यानंतर त्यांनी रायगडाची पाहणी करून जगदीश्वर मंदिराच्या प्रांगणातून मशाल पेटवून शिवतेज मशाल रॅलीचा शुभारंभ केला. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, अशा प्रकारच्या रॅलीच्या माध्यमातून तरुणपिढीला छ. शिवाजी महाराजांचा इतिहास, शौर्य, तेज सांगण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. डॉ. राणे यांनी रायगडवरील आणि परिसरातील रहिवाशांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच या प्रश्नांचा संपूर्ण अभ्यास करून परिपूर्ण माहितीसह आपण पुन्हा येथे येऊ, असेही आश्वासन त्यांना दिले.

रायगड रोप-वेसहा दिवस बंद

वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी रायगडवर जाणारा रोप-वे 21 ते 26 फेब्रुवारीदरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. रायगडावर जाणा-या पर्यटकांची संख्या वाढत असल्याने सुरक्षितताही महत्त्वाची आहे. त्यामुळे वार्षिक दुरुस्तीमध्ये काही बदलही करण्यात येणार आहेत.
सागरी शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करा
सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 20, 2011 AT 12:00 AM (IST)
मुंबई - अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाचे काम सरकारने तातडीने सुरू करावे किंवा त्याची जबाबदारी शिवप्रेमी संघटनांकडे सोपवावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत यांनी केली आहे. या स्मारकाला दिरंगाई होत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.
जागतिक दर्जाचे हे सागरी स्मारक उभारण्याची घोषणा सरकारने केली आहे. यासाठी खास निधीची तरतूददेखील करण्यात आली आहे; मात्र अद्याप या स्मारकाच्या उभारणीला सुरुवात झाली नसल्याने शिवप्रेमी जनतेत नाराजी आहे. सरकारने या स्मारकाची उभारणी तातडीने सुरू करावी, असे सावंत म्हणाले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी मुंबईत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: