Friday, February 18, 2011

जगभरात आज साजरी होतेय शिवजयंती ..हार्दिक शुभेच्छा..

शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवपूजन








मध्य भागातील वाहतुकीत मिरवणुकांमुळे आज बदल
Saturday, February 19, 2011 AT 12:48 AM (IST)

पुणे - श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शनिवारी तीन मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे शहराच्या मध्य भागातील वाहतुकीत बदल होणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

शिवजयंतीनिमित्त मुख्य मिरवणूक सायंकाळी चार वाजता भवानी माता मंदिरापासून निघणार आहे. ही मिरवणूक पद्मजी चौकी, एडी कॅंप चौक, नेहरू रस्ता, संत कबीर चौक, लक्ष्मी रस्ता, सोन्या मारुती चौक, मोती चौक, लाल महाल चौक, शिवाजी रस्ता, गाडगीळ पुतळा चौकमार्गे नव्या पुलावरून शिवाजी पुतळा चौकात जाणार आहे. तसेच हमाल पंचायतीतर्फे त्यांच्या कार्यालयापासून सकाळी साडेदहा वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्तामार्गे ही मिरवणूक जाणार असून शिवाजी पुतळा चौक येथे ती विसर्जित होणार आहे. आझम कॅंपसतर्फे सकाळी साडेआठ वाजता लष्कर भागातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. पद्मजी पोलिस चौकी, संत कबीर चौक, लक्ष्मी रस्ता, सोन्या मारुती चौक, जिजामाता चौकमार्गे ती शनिवार वाडा येथे जाणार आहे.

या मिरवणुकांमुळे लक्ष्मी रस्ता ते सोन्या मारुती चौक दरम्यानची वाहतूक दुपारी तीन वाजल्यापासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. तसेच मिरवणूक मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मिरवणूक पुढे जाईल, त्यानुसार वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूककोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी शनिवारी मिरवणुका संपेपर्यंत पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त मनोज पाटील यांनी केले आहे.

कल्याण मध्ये भव्य शिवजयंती मिरवणूक

दरवर्षी कल्याणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे वेगवेगळी शिवजयंती साजरी होत होती. यंदा मात्र या तिन्ही संघटनांनी एकत्र येऊन 'ऐक्या'ची शिवजंयती साजरी करणार आहेत. यंदाच्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत अनेक चित्ररथही असतील. कल्याणच्या सीमेवरील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गा देवीच्या पूजनानंतर या मिरवणुकीचा दणक्यात समारोप होणार आहे.

राज्य सरकारतफेर् साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या दिवशी पक्षीय मतभेदांमुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतफेर् स्वतंत्र शिवजयंतीची मिरवणूक काढली जाते. त्यामध्ये पूवीर्पासून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या शिवजयंतीची भर पडते. या दिवशी शहरात शिवजयंतीच्या स्वतंत्र मिरवणुका निघतात. त्यामुळे समाजातील एकोपा वाढविण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे, उशिराने का होईना, परंतु राजकीय पक्षांच्या ध्यानात आले आहे. त्यामुळे या वषीर् काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतफेर् वेगवेगळ्या मिरवणुका काढण्याऐवजी उत्सव समितीच्या नेतृत्वाखाली एकच भव्य मिरवणूक निघणार असल्याचे समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल गवळी यांनी सांगितले.

शनिवारी दुपारी ४ वाजता सरकारी विश्रामगृहापासून सनई चौघडा, टाळ मुदुंग, लेझीम पथक आणि बँडच्या गजरात तसेच घोडेस्वार मावळे आणि शिवरायांच्या जीवनावर आधारित अनेक चित्ररथांच्या साक्षीने मिरवणुकीला प्रारंभ होईल. महात्मा फुले चौक, नेहरू चौक, महादेव चौक, बाजारपेठ मागेर् गांधी चौक, लक्ष्मीनारायण चौक, पारनाका, लोकमान्य टिळक चौक, अहिल्याबाई चौक, सहजानंद चौक मागेर् लालचौकीहून दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी या मिरवणुकीचा समारोप होईल. तिथे किल्ल्यावरील दुर्गा देवीची पूजा व आरती होऊन मिरवणुकीची सांगता होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सेनेलाही आमंत्रण

शिवसेना यंदाही तिथीनुसारच शिवजयंती साजरी करणार असली तरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना या मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन केल्याचे उत्सव समितीचे पदाधिकारी राजा अक्केवार यांनी सांगितले.


No comments: