Sunday, February 21, 2010

shivaji maharaj birth anniversary celebrated ....

शिवजयंती उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 20, 2010 AT 12:00 AM (IST)

पिंपरी - "छत्रपती शिवाजी महाराज की जय,' "जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पिंपरी-चिंचवड शहर परिसरात शुक्रवारी (ता. 19) उत्साहात साजरी करण्यात आली.महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत महापौर योगेश बहल आणि आयुक्त आशिष शर्मा यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. हिंदुस्थान अँटिबायोटिक्‍स (एचए) कंपनी, खराळवाडी, पिंपरी वाघेरे, डांगे चौक (थेरगाव), रहाटणी, भक्ती-शक्ती चौक (निगडी), लांडेवाडी (भोसरी), मोशी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांसही महापौर बहल यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. महापालिकेत उपमहापौर डब्बू आसवानी, "ड' प्रभाग अध्यक्षा विजया सुतार, प्रभाग अधिकारी दिलीप गावडे, विश्‍वास भोसेकर, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे उपस्थित होते. रहाटणी, लांडेवाडी, दापोडी, फुगेवाडी, मोहननगर (चिंचवड), थेरगाव गावठाण, पीसीएमटी चौक (भोसरी) येथील शिवरायांच्या पुतळ्यांस स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. अखिल भारतीय विकास आघाडीच्या वतीने आघाडीचे अध्यक्ष ईश्‍वर कांबळे यांनी एचए कॉलनीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. सचिव प्रवीण कांबळे, कार्याध्यक्ष आनंद नरवाडे, भागवत कांबळे उपस्थित होते. शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खराळवाडी येथील कार्यालयात झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष अशोक भगत, सेवा दलाचे अध्यक्ष विजय लोखंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. रवींद्र ओव्हाळ, आनंदा कुदळे उपस्थित होते. सावित्रीबाई फुले भाजी व्यवसाय मार्गदर्शक संघातर्फे श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मंदाकिनी रोकडे यांनी पुष्पहार अर्पण केला. यशवंत शेउबाळे, राजाराम भोसले, संस्थेचे सचिव सूर्यकांत उबाळे यांनी मनोगत व्यक्त केले. भीमराव वाघमारे, महादेव वडमारे, भाऊसाहेब अभंग उपस्थित होते. चिंचवडमध्ये उपक्रमप्रेमलोक पार्कमधील प्रेमलोक पार्क मित्रमंडळाच्या वतीने सकाळी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला. चिंचवड गावात मोरया रिक्षा स्टॅंड व वंदना पॅलेस ग्रुपतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. शिव गर्जना ग्रुप, झुंजार ग्रुपच्या आणि गांधी पेठ तालीम मित्रमंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. आकुर्डीत पूजनयेथील विठ्ठलवाडीत नगरसेविका सविता वायकर यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. अमर कांबळे, योगेश साळुंके उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या वॉर्ड क्रमांक 51 शाखा आणि नगरसेवक उल्हास शेट्टी मित्र परिवाराच्या वतीने दत्तवाडी येथे श्री. शेट्टी आणि सामाजिक कार्यकर्ते जयराम मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष हरेश तापकीर यांच्या हस्ते रहाटणीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवाजी खुळे, संतोष ओझा उपस्थित होते. महात्मा फुले जनसेवा मंडळातर्फे अध्यक्ष विजय जाधव, विठ्ठल लडकत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. बोपोडीतील वंदे मातरम संघटनेने उत्साहाने शिवजयंती साजरी केली. माणिकराव खेडेकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. खडकीतील संघटनेचे अध्यक्ष मोतीराज स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. संघटनेचे सतीश यमतेलू, आनंद चंडालिया, संतोष भिसे आदी उपस्थित होते. "शिवाजी महाराजांच्या नीतीची गरज' श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने एचए कॉलनीत आयोजित कार्यक्रमात पुणे-इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहनराव शेटे म्हणाले, ""देशापुढे असणाऱ्या दहशतवादी आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नीतीची गरज आहे.'' एचए कंपनीचे महाव्यवस्थापक के. पी. राजन अध्यक्षस्थानी होते. विजय कापसे, महंमद पानसरे उपस्थित होते.

"जय भवानी...जय शिवाजी'
Saturday, February 20, 2010 AT 03:57 PM (IST)
गजराने दुमदुमली शाहूनगरी ! सातारा, दि. 19 : डफावर पडणारी थाप, कडाडणारी हलगी, धडाडणारे ढोल आणि ताशांच्या कडकडाटात शुक्रवारी सातारा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एकच गजर झाला तो म्हणजे, "जय भवानी...जय शिवाजी'चा! अशा अंगावर रोमांच उभे करणाऱ्या वातावरणात संपूर्ण जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून सातारा शहरात 19 फेब्रुवारीची शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. यंदाही सातारा पालिकेने पुढाकार घेवून शिवजयंतीला शाही स्वरुप दिले. शिवजयंतीनिमित्त गांधी मैदानापासून शहरातील दोन्ही प्रमुख रस्त्यांवर भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. राजवाड्यासमोरील जवाहर बागेस विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पोवई नाक्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शहरातील विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रायगड, प्रतापगड, अजिंक्यतारा, सज्जनगड, वर्धनगड आदी ठिकाणांहून शिवज्योत आणली. सायंकाळी 6 च्या सुमारास शिवजयंतीच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत विविध शाळांनी साकारलेले चित्ररथ शाहूनगरवासियांचे आकर्षण ठरले होते. शिवजन्म सोहळ्यापासून राज्याभिषेकापर्यंतच्या घटना जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून दाखविणारे 22 चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. या चित्ररथांसह लेझीम पथक, झांजपथक, घोडेस्वारांसह काढलेल्या या मिरवणुकीने सातारकरांसमोर शिवकाल उभा केला. मिरवणुकीच्या अग्रभागी भगवे फेटे परिधान केलेले बाल मावळे, युवतींचे लेझीम पथक, घोडेपथक, बालशिवाजी, पारंपरिक वेषभूषेतील युवती सहभागी झाल्या होत्या. सनई, चौघडा, ढोल-ताशे, लेझीम पथक, हलगी पथक, पारंपरिक वेशभूषेतील वासुदेव, सयाजीराव महाविद्यालयातील मुलांचे बॅंडपथक आणि विविध शाळांची झांजपथके सहभागी झाली होती. यांच्यापाठीमागे शिवाजी उदय मंडळाच्या पालखीची मिरवणूक होती. त्यामध्ये पारंपरिक वेषभूषेतील फेटाधारी युवक-युवती सहभागी झाले होते.शाहूनगरवासियांचे खरे आकर्षण ठरले ते विविध शाळांचे चित्ररथ. निर्मला कॉन्व्हेंटचे पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी, कलाविहार विद्यालयाची ग्रंथ दिंडी, शाळा क्र. 20 ची ज्ञानेश्वरांची पालखी, शाळा क्र. 11 चा जातीभेद विरोधी देखावा, मराठी मिशन युनियन स्कूलचा पावन खिंड हा देखावा, तुकाराम भेट, इक्रा स्कूलचा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा सन्मान, आबासाहेब चिरमुले विद्यालयाचा पावन खिंड, हिंदवी पब्लिक स्कूलचा राज्याभिषेक सोहळा, जानकीबाई प्रेमसुख झंवर शाळेचा कोंढाणा, नूतन मराठी शाळेचा हिरकणी बुरूज आदी चित्ररथ सहभागी झाले होते. शिवाजीराजे व रामदास स्वामी भेट, शिवरायांचे बालपण, शिवरायांचे गोरक्षण आदी चित्ररथ मिरवणुकीचे आकर्षण ठरले. दरम्यान, मिरवणुकीच्या पूर्वी उत्कृष्ट खेळाडूंना खा. श्री.छ.उदयनराजे यांच्या हस्ते गुणगौरव पुरस्कार देवून गौरवण्यात आले. कार्य आणि कर्तृत्वावर व्यक्ती मोठी होते, छ. शिवाजी महाराज त्याचे उदाहरण आहेत, असे प्रतिपादन खा. उदयनराजे यांनी यावेळी केले. किल्ले प्रतापगडावर शिवजयंती साजरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले प्रतापगड येथे जिल्हा परिषदेच्यावतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त रयत सेवक प्राध्यापक शिवाजीराव चव्हाण यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले. किल्ले प्रतापगड येथे शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. ज्योती जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. मुळूक, कृषी सभापती राजाभाऊ शेलार, शिक्षण सभापती भास्करराव गुंडगे, समाजकल्याण सभापती अशोकराव खरात, महिला व बालकल्याण सभापती सौ. जयश्री भोसले, उद्योजक राजेंद्र भोसले, पंचायत समित्यांचे सभापती, वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर, शिवप्रेमी उपस्थित होते. शिवजयंती उत्सवा-निमित्त जिल्हा परिषदेच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात भवानी मातेची पूजा करुन करण्यात आली. यावेळी भवानी माता मंदिरात सौ. ज्योती जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, विलास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नंतर मिरवणुकीने शिंग तुतारी, लेझीम पथक यांच्या निनादात मिरवणुकीस सुरुवात होऊन ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजंाच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रारंभी चंद्रकांत जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, उपशिक्षणाधिकारी जगदाळे यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. या समारंभास उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, शिक्षणाधिकारी उदयसिंह भोसले, दीपक मगर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोकरे, कृषी विकास अधिकारी चांगदेव बागल यांच्यासह विषय समित्यांचे तसेच पंचायत समित्यांचे सन्माननीय सभापती, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि गावपातळीवरील पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, नागरिक, ग्रामस्थ आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरी करण्यात आली. शिवजयंतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील सभागृहात आयोजित करण्यात येवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून अभिवादन केले. शिवजयंती कार्यक्रमास तहसीलदार अंकुश भिलावे, जिल्हाधिकारी यांचे चिटणीस नेताजी कुंभारे तसेच अधिकारी, कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: