Showing posts with label शिवजयंती. Show all posts
Showing posts with label शिवजयंती. Show all posts

Friday, February 18, 2011

३८१ व्या शिवजयंतीच्या हार्दिक शिवेच्छा..

रयतेवर जिवापाड प्रेम करणारा राजा
श्रीमंत कोकाटे
Saturday, February 19, 2011 AT 01:00 AM (IST)

छत्रपती शिवाजी महाराज यांनी लिहिलेल्या पत्रांमधून त्यांची संवेदनशीलता, प्रेम, शिस्त असे अनेक गुण दिसतात. त्याविषयी शिवजयंतीनिमित्त (ता. १९) एक दृष्टिक्षेप.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या निर्दालनासाठी हाती तलवार घेतली. हा लढायांचा इतिहास तर आपणा सर्वांना ज्ञात आहेच. ढाल-तलवारीच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजीराजांनी रयतेबद्दल व्यक्त केलेल्या भावना, प्रजेच्या सुरक्षिततेसाठी, कल्याणासाठी घेतलेले निर्णय, काळजी, कळवळा त्यांच्या पत्राद्वारे आपणास प्रकर्षाने जाणवते. छत्रपती शिवाजीराजांनी रयतेवर केलेले जिवापाड प्रेम त्यांच्या विविध पत्रांवरून आपणास समजते.

२३ ऑक्‍टोबर १६६२ रोजी शिवाजी महाराजांनी सर्जेराव जेधे यांना एक पत्र लिहिलेले आहे. शाहिस्तेखानाचे संकट स्वराज्यावर येत आहे. त्याप्रसंगी रयतेची कशाप्रकारे काळजी घ्यावी, हे महाराजांनी सांगितलेले आहे. ""मोगल प्रस्तुत तुमच्या तपियात धावणीस येताती म्हणौन जासुदानी समाचार आणिला आहे. तरी तुम्हास रोखा अहडताच तुम्ही तमाम आपलेतपियात गावचा गाव ताकिदी करून माणसे, लेकरेबाळे समतर तमाम रयेति लोकास घाटाखाले बाका जागा असेल तेथे पाठविणे. ये कामात हैगै न करणे ..... गावचा गाव हिंडोनु रातीचा दिवस करून लोकाची माणसे घाटाखाली जागा असेल तेथे पाठवणे. या कामास एक घडीचा दिरंग न करणे.'' रयतेच्या रक्षणासाठी एक क्षणाचाही विलंब करू नका, अशा सूचना शिवरायांनी प्रस्तुत पत्रात सर्जेराव जेधे यांना दिलेल्या आहेत.

१९ मे १६७३ रोजी शिवाजी महाराजांनी चिपळूण येथील आपल्या जुमलेदार, हवालदार आणि कारकुनांना एक पत्र लिहिलेले आहे. यातून शिवरायांना शेतकऱ्यांबद्दल किती कळवळा होता, हे स्पष्टपणे लक्षात येते. लष्कराची छावणी चिपळूण येथे पडलेली असताना आपल्या अधिकाऱ्यांनी कशी काळजी घ्यावी, याबाबत लिहिलेल्या पत्रातील काही भाग "".......... पागेस अधिक बैठी पडली; परंतु जरूर जालें त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास, तुम्ही मनास ऐसा दाणा, रातीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंढी करून चाराल.

नाहीसें जालें म्हणजे मग काही पडल्या पावसात मिळणार नाही, उपास पडतील, घोडी मरायास लागतील म्हणजे घोडी तुम्हीच मारिली ऐसे होईल व विलायतीस तसवीस देऊ लागाल. ऐशास, लोक जातील कोण्ही कुणब्याचे थील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिले आहेत, तेहि जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल, की मोगल मुलकांत आले त्याहुनहि अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल! ....... रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाही. ........ कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही. ........ हाली उनाळ्याला आहे ........ कोण्ही आगट्या करितील, कोण्ही भलतेच जागा चुली, रंधनाळा करितील .......... आगट्या जाळीता, अगर रात्रीस दिवा घरांत असेल, अविस्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. ........'' शिवरायांचे हे पत्र मुळातूनच वाचण्यासारखे आहे. लष्करातील लोकांनी काटकसरीने वागावे. स्थानिक रयतेला त्रास देऊ नये.
शेतकऱ्यांच्या काडीलादेखील हात लावू नये; अन्यथा रयत म्हणेल की मोगलापेक्षा तुम्ही वाईट आहात. आगीपासून धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना शिवरायांनी आपल्या सैनिकांना दिलेल्या आहेत. यातून शिवरायांचा मानवतावाद प्रकर्षाने जाणवतो.

शिवरायांनी शेतकरी कष्टकरी, श्रमकरी वर्गाचे हित जोपासले. आपल्या सैनिकांवर सहकाऱ्यांवर जिवापाड प्रेम केले. २ सप्टेंबर १६६० रोजी शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधे यांना एक पत्र लिहिलेले आहे. कान्होजी जेधे आजारी असल्याची माहिती मिळाल्यामुळे महाराज त्यांना लिहितात, ""औसध घेऊन शरीरासी आरोग्य होई ते करणे. उपचाराचे विशी आलस न करणे... औषधोपचार घेऊन बरे होणे. त्याबाबत हयगय करू नये,'' असा अत्यंत मायेचा सल्ला शिवरायांनी कान्होजी जेधेंना दिलेला आहे.

शिवाजी महाराजांची अनेक पत्रं आहेत. त्यातून शिवरायांची संवेदनशीलता, प्रेमळपणा, वक्तशीरपणा, शिस्त, व्यवस्थापन, धर्मनिरपेक्षता, नैतिकता, प्रशासनव्यवस्था याची माहिती मिळते. शिवाजी महाराजांच्या पत्रावरून लक्षात येते की, शिवरायांचे स्वराज्य हे रयतेचे लोककल्याणकारी राज्य होते. Thanks-e-sakal.कॉम

हरी नरके ह्यांचा शिवजयंतीनिमित्त लेख॥

Thursday, February 17, 2011

शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर येणे गरजेचे

Friday, February 18, 2011 AT 12:00 AM (IST)


परभणी - "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन बदलते संदर्भ लक्षात न घेता त्यांच्या नावाचा राजकारणात काही मंडळी चुकीच्या पद्धतीने वापर करीत आहेत. त्यामुळे महाराजांचा व्यापक इतिहास लोकांसमोर आणणे गरजेचे आहे,'' असे प्रतिपादन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केले.

छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने येथील नटराज रंगमंदिरात आयोजित दोन दिवसांच्या महाराष्ट्र संगीतरत्न व हास्यसम्राट या सांस्कृतिक स्पर्धात्मक कार्यक्रमाचे उद्‌घाटन पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 17) झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्री फौजिया खान, आमदार विनायक मेटे, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, प्रा. इंद्रजित भालेराव, विजय भांबळे, विनोद कदम, विजय वाकोडे, बाबासाहेब जामगे, डॉ. प्रफुल्ल पाटील, रत्नाकर गुट्टे, सुभाष जावळे, बालासाहेब मोहिते, जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, ""छत्रपती हे देशाचे प्रेरणास्थान आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. सर्व जातिधर्मांना सोबत घेऊन छत्रपतींनी साम्राज्यशाहीच्या विरोधात लढा दिला; परंतु आज छत्रपतींचे नाव घेऊन त्याचा राजकारणात चुकीचा वापर होत आहे. तो वापर छत्रपतींचा व्यापक इतिहास जनतेसमोर आणून थांबविणे गरजेचे आहे.'' आजवर राजांनी कलावंत, साहित्यिकांना प्रोत्साहन दिले. कलाकृती या आश्रदात्यास अजरामर बनवीत असतात. समाज पैशाने सधन होत नाही, तर कलेमुळे संपन्नता प्राप्त होते. यादृष्टीने प्रतिष्ठानने कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा सुरू केलेला हा प्रयत्न महत्वपूर्ण आहे, असेही पाटील म्हणाले. प्रतिष्ठानच्या या उपक्रमास एक लाख रुपयांचा निधी देण्याचे आर. आर. पाटील यांनी जाहीर केले.

श्री. पाटील यांचा सत्कार आयोजक ऍड. विष्णू नवले यांनी तलवार भेट देऊन केला. सूत्रसंचालन सुनील तुरूकमाने यांनी केले. या वेळी अरबी समुद्रात पोहल्याबद्दल डॉ. राजगोपाल कालानी व रेल्वेत रुजू झालेल्या तोशिबा शिंदे यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कंत्राटदार आर. डी. मगर यांना छत्रपती पुरस्कार देऊन पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले।





शिवजयंतीदिनी "दिलावर'चे नाण्यांचे प्रदर्शन
सकाळ वृत्तसेवा
Friday, February 18, 2011 AT 12:00 AM (IST)

कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ नाणी व फोटोंचा संग्रह करण्याचा न्यू शाहूपुरी, बेकर गल्लीतील दिलावर पठाण या तरुणाने छंद जोपासला आहे. त्याचा हा छंद शिवजयंतीदिनी (ता. 19) प्रदर्शनाच्या रुपाने लोकांसमोर येत आहे. शनिवार पेठेतील बुरुड गल्लीतील खोलखंडोबा हॉलमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे प्रदर्शन असेल.

छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेमापोटीच सतरा वर्षांपूर्वी लागलेल्या या छंदातून दिलावर याने महाराष्ट्रासह कर्नाटकात जाऊन शंभरावर शिवकालीन नाणी व महाराजांचे दुर्मिळ फोटो जमविले. इतकेच नव्हे; तर टपाल खात्याने आजवर प्रकाशित केलेले महाराजांचे फोटो असलेली दुर्मिळ पावती तिकिटे व पोस्टकार्डांचा समावेश आहे. 1905 ला प्रकाशित झालेले शिवाजी महाराजांचे पोस्टकार्ड आणि संस्थानकालीन मुद्रांकांचीही संचयात भर घातली. दिलावर यांच्याकडून या बहुमोल संचयाची माहिती घेऊन ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन, कोल्हापूर जिल्हा मुल्ला-मुल्लाणी समाज, मौलाना आझाद विचार मंच यांनी एकत्र येऊन प्रदर्शनाची जबाबदारी घेतली आहे. प्रदर्शनात शिवकालीन, पेशवेकालीन व मराठा रियासतची दुर्मिळ नाणी मांडण्यात येणार आहेत. कलायोगी जी. कांबळे व रविवर्मा यांनी काढलेली शिवाजी महाराजांची दुर्मिळ चित्रे व तलवारी, शिवाजी महाराजांची सोन्याची होनची रिप्लीकादेखील हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असेल, असे जिल्हा मुल्ला - मुल्लाणी समाजाचे जिल्हाध्यक्ष निजाम मुल्लाणी यांनी सांगितले।

शिवरायांची तलवार बंद काचपेटीत तळपणार
सकाळ वृत्तसेवा
Saturday, February 12, 2011 AT 12:15 AM (IST)

कोल्हापूर - सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे जतन करण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने पाऊल उचलले आहे. पंधरा हजार रुपये खर्चून बनविलेल्या काचपेटीत ही तलवार ठेवण्यात येणार आहे. सोमवारी (ता. 14) युवराज संभाजीराजे छत्रपती व खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते किल्ल्यावर हा विधिवत कार्यक्रम होईल, ही माहिती समितीचे अध्यक्ष इंद्रजित सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

शिवरायांची इंग्लंडमधील जगदंबा तलवारीसारखी समितीने बनवलेली प्रतिकृतीही रोजच्या पुजेसाठी मंदिराला भेट देण्यात येणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.

ते म्हणाले, ""सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवाजी महाराजांची चार फूट लांबीची तलवार आहे. शिवरायांच्या मोजक्‍याच वस्तूंपैकी ती एक आहे. शिवरायांच्या मूर्तीबरोबरच तलवारीचे रोज पूजन होत आहे; परंतु या तलवारीचा 20 ते 25 टक्के भाग गंजून गेला आहे. त्यामुळे समितीने तलवारीचे जतन करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार सोमवारी (ता. 14) ही तलवार खास बनवून घेतलेल्या काचपेटीत विधिवत ठेवण्यात येणार आहे.''

ते म्हणाले, ""तलवार काचपेटीत ठेवण्यासाठी किल्ल्यावरील शिवराजेश्‍वर देवस्थानची समितीने परवानगी घेतली आहे. या दिवशी शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. तलवारीच्या जतन कार्यक्रमाच्या निमित्ताने किल्ल्याच्या भविष्यातील संवर्धनासाठी भरीव अशी तरतूद करण्यात यावी, अशी मागणीही खासदार राणे यांच्याकडे समिती करणार आहे. एकूण कार्यक्रमासाठी सुमारे 150 हून शिवप्रेमी उपस्थित राहणार असून पहिल्या टप्प्यातील काही कायकर्ते उद्या (ता. 12) सिंधुदुर्गवर रवाना होत आहेत. यावेळी समितीचे सचिव राहुल भोसले, अमित आडसुळे, वसंतराव मुळीक उपस्थित होते।

16 ते 19 दरम्यान शिवजयंती महोत्सवाचे आयोजन
-
Monday, February 14, 2011 AT 05:00 AM (IST)

परभणी (parbhani)- येथील संभाजी बि÷गेडच्या वतीने दिनांक 16 ते 19 फेब÷ुवारी दरम्यपन शिव जयंती निमित्त शिवाजी महाविद्यालयातील मैदानावर राजे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या महोत्सवाचे उदघाटन बुधवारी सायंकाळी सहा वाजता बि÷गेडचे प्रदेशाध्यक्ष गायकवाड यांच्या हस्ते होणार असुन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन खा. दुधगावकर, आ. जाधव, आ. बोर्डीकर, आ. देशमुख माजी मंत्री वरपूडकर, पोलीस अधिक्षक खैरे, माजी खा. रेंगे, उपविभागीय अधिकारी राहूल माकणीकर, जि.प. सदस्य भरोसे, हभप अच्युत महाराज, नपाथ महाराज आदी उपास्ंिथत राहणार आहे. यावेळी बोरुळकर यांचे व्याख्यान होणार आहे. दि. 17 फेब÷ुवारी रोजी तानाजी भोसले यांचे छत्रपती संभाजी राजे यांच्यावर व्याख्यान होणार आहे. यावेळी मनोज आखाडे, आ. रेंगे, जि.प. अध्यक्षा देशमुख, नगराध्यक्ष खोबे, माजी नगराध्यक्ष देशमुख, धोंडीराम चव्हाण, शिवाजी निर्दुडे, मुख्याधिकारी पुजारी, नगरसेवक देशमुख, विजय वरपूडकर आदी उपास्ंिथत राहणार आहे. दिनांक 18 रोजी जिल्हाधिकारी वानखेडे यांच्या उपास्ंिथतीत रक्तदान शिबीराचेउदघाटन करण्यात येणार आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी अंधारे, विजय भांबळे यांची उपास्ंिथती राहणार आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता शिवाजी महाराजांच्या तैलचित्राची मिरवणुक काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष घोडके, जिल्हाध्यक्ष लव्हाळे आदींनी केले आहे.

शिवजयंती महोत्सव अध्यक्ष वलांडीकर, उपाध्यक्ष पाटील
Latur News
Monday, February 07, 2011 AT 05:00 AM (IST)

लातूर (latur) - शहरातील पूर्व भागात सार्वजनिक शिव जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी मकबूल वलांडीकर व उपाध्यक्षपदी रवि पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - सचिव परमेश्र्वपर गुंडरे, ओम वाघमारे, नवाब शेख, सहसचिव शाम जाधव, संभाजी देडे, कार्याध्यक्ष शशिकांत स्वामी, कोषाध्यक्ष विनायक देडे यांची निवड करण्यात आली. पूर्व भागात सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्याच्या उद्देशाने झालेल्या बैठकीस व्यंकटराव आळणे, अतूल स्वामी, महादू गवळी, संदिप तेलगुंटे, जाफर शेख उपस्थित होते.

शिवजयंती कार्यकारिणी जाहीर
(Updated on 14/02/2011 23 : 12 IST)

दहिफळ : कळंब तालुक्यातील दहिफळ येथे शिवजयंती कार्यकारणी जाहिर करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी अरुण दत्तात्रय भाजलवंडे यांची तर उपाध्यक्षपदी बालाजी दिगांबर मते यांची निवड करण्यात आली आहे. समितीच्या सदस्यपदी नितीन भातलवंडे, दिपक मते, जंगल आडागळे, जीवन भातलवंडे, प्रदिप मते, सुधाकर मते, फुलचंद पाटील, पप्पू गोरे, गणेश माते, तात्या भातलवंडे, शहाजी कदम, विवेक पाटील, अतुल गायकवाड, लाला लाटे यांची निवड करण्यात आली आहे. शिवजयंती निमित्त रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार असुन इच्छुकांनी योगराज पांचाळ व पांडूरंग मते यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Wednesday, December 30, 2009

19 फेब्रुवारी पुणे

राज्यभरात आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होतेय. तसंच शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली जाते. इथल्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ उपस्थित रहाणार आहेत.
सरकारनं लोकसभा निवडणुकांपूर्वी मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही तर शिवजयंतीला मुख्यमंत्र्यांना शिवनेरी किल्ल्यावर पाय ठेवू देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षणाची मागणी करणा-या संघटनांनी दिला होता. यापार्श्वभूमीवर शिवनेरीवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


दरम्यान सकाळी शिवजयंतीचा मुहूर्तसाधून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिवनेरीवर गोंधळ घातला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यात एस.पी. रवींद्र कदम आणि ऍडिशनल एस.पी. अशोक मोराळे यांच्यासह 10 पोलिस जखमी झाले. त्याचवेळी अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांच हेलिकॉप्टर शिवनेरीवर घिरट्या घालत होत.त्यामुळे हेलिपॅडची सुरक्षा वाढवण्यात आली. यावेळी सौम्य लाठीमारही करण्यात आलं.पण शांततेच्या आव्हानानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी थांबवली. आता शिवनेरीवरचं वातावरण निवळलं असून मुख्य कार्यक्रम सुरू आहे.


शिवजयंती निमित्त 19 रोजी विविध कार्यक्रम शिवछत्रपती बहुजन मित्र पुरस्कार डॉ.येवले, जाधव यांना जाहीर
जळगाव, (प्रतिनिधी)-
जळगाव, छत्रपती शिवाजी महाराजांची 379 वी जयंती 19 फेब्रुवारी रेजी साजरी होत आहे. हा शिवजयंती सोहळा छत्रपती शिवाजी ब्रिगेडतर्फे यावर्षी देखील विविध कार्यक्रम आयोजीत करुन आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, शिवचरितकार दादा नेवे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.जळगाव, (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांची 379 वी जयंती 19 फेब्रुवारी रेजी साजरी होत आहे. हा शिवजयंती सोहळा छत्रपती शिवाजी ब्रिगेडतर्फे यावर्षी देखील विविध कार्यक्रम आयोजीत करुन आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, शिवचरितकार दादा नेवे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शिवजयंती निमित् दि. 17 फेब्रुवारी रोजी शिवतीर्थ मैदानावर 3000 विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक ते साहित्य मोफत पुरविले जाणार आहे. 19 रोजी स. 11 वा. शिवतीर्थ मैदानावरील छत्रपतीच्या पुतळ्याला माल्यार्पण, मानवंदना सोबतच शहरातील 251 सुवासीनी मराठमोठ्या वेशभुषेत शिवप्रभुच्या पुतळ्याचे औक्षण करतील. ‘स्टार प्रवाह’ वाहीनीवरील राजा शिवछत्रपती मालेकेतील स्फुर्तीदायी प्रसंगाचे भव्य डिजीटल बॅनरचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. शिवछत्रपती बहूजन मित्र पुरस्कार जाहिर जलदिंडी प्रतिष्ठानाचे अध्यक्ष डॉ.विश्वास येवले (पुणे), गेल्या 1200 वर्षातील विविध शस्त्रे संग्रहीत करणारे कोल्हापुरचे गिरीष जाधव हे छत्रपती बहूजन मित्र पुरस्काराचे मानकरी ठरले असून लवकरच त्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच एप्रिलमध्ये शस्त्र प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवजयंती सोहळ्यात जास्तीत जास्त शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी केले. पत्रकार परिषदेत डॉ.धनंजय बेंद्रे, अर्जुनराव जगताप, प्रमोद मोरे, प्रा.संदीप पाटील, डॉ.मंगेश पाटील उपस्थित होते.

पनवेलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
20 February 2009 10:41:38
पनवेल
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पनवेलमध्ये गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये आमदार विवेक पाटील, पनवेल नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर, सर्वपक्षीय नगरसेवक व अधिकारी सहभागी झाले होते. पनवेलमधील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती या मिरवणुकीचे वैशिष्टय़ ठरले. रोटरी सर्कल येथील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला आमदार पाटील व नगराध्यक्ष ठाकूर यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर या मिरवणुकीला सुरुवात झाली. विविध शाळांचे चित्ररथ, छत्रपतींच्या जीवनावर आधारित देखावे, लेझीम पथके यामुळे मिरवणुकीत चैतन्य पसरले होते. ही मिरवणूक टपाल नाक्यावरील छत्रपतींच्या अर्धपुतळ्याजवळ विसर्जित झाली. यावेळी आमदार पाटील व अन्य नेत्यांनी शिवप्रेमींना संबोधित केले.