धुळे शहरात शिवजयंती उत्साहात साजरी | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
धुळे, दि.20 (प्रतिनिधी)-(21-February-2011) | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
Tags : Dhule | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येवुन शिवरायांना अभिवादन करण्यात आले. श्रीसाईनाथ मतिमंद विद्यालय- अंचाडे ता.धुळे येथील श्री साईनाथ मतिमंद निवासी विद्यालय येथे शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डी.बी. पाटील होते. मुख्याध्यापक छाया पाटील यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र कथन केले. अमरदीप खैरनार यांनी आभार मानले. कार्यक्रमास सुभाष पाटील, भरत पाटील, नंदराज पाटील, अणासाहेब पाटील, रवींद्र खैरनार, मोहन पाटील आदी उपस्थित होते. स्वाभिमान- येथील स्वाभिमान संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. साक्री रोडवरील स्वाभिमान संघटनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी धुळे जिल्हा स्वाभिमान संघटनेचे जिल्हा संघटक आनंद लोंढे, जिल्हा संपर्क प्रमुख राजन जगताप, जितेंद्र पाटील, अजय पाटील, प्रकाश अहिरे, दादु देसले, पप्पू पगारे, कपिल जाधव, विक्की लोंढे, गौरव सोनवणे, वंदेश साळवे, बंटी भामरे, विशाल वाघ, अमोल भामरे, राहुल वाघ, हेमंत लोंढे, सिध्दार्थ लोंढे, मिलिंद भालेराव, अरुण राऊत, प्रकाश ठाकरे, जितेंद्र वाघ, संदीप बनसोडे आदी उपस्थित होते. शाहूसेना- शाहुसेना जिल्हा धुळे शाखेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शाहु सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद साळुंके यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शाहीर भटू गिरमकर, संदीप पाटोळे, विजय देवकर, रवींद्र आघाव, मनोज बजाज, नेनेश साळुंके, राजेंद्र जाधव, अरुण मोहिते, चंद्रकांत थोरात, अनिल जगताप, चंद्रकांत थोरात आदी उपस्थित होते।
|
Monday, February 21, 2011
धुळे शिवजयंती २०११
नंदुरबार शिवजयंती २०११
नंदुरबार मध्ये शिवजयंती उत्साहात... | |||||||||||||||
नंदुरबार (प्रतिनिधी)- (21-February-2011) | |||||||||||||||
Tags : Nandurbar,Blog | |||||||||||||||
तालुक्यातील खोंडामळी येथील नुतन माध्यमिक विद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त शिवाजी महाराज व जिजाऊंचा जीवंत देखावा सादर करण्यात आला. मिरवणूक खोंडामळी गावात काढण्यात आली. गावातील शिवरायांच्या पुतळयाचे पुजन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.एम.पिंपळे, पर्यवेक्षक के.एन. साळूंके, डॉ.एन.डी.नांद्रे, ए.बी. पाटील, आर.पी.भामरे, बी.एस. कदमबांडे, एस.पी. पवार शिक्षकांनी केले. प्रा.एन.डी. वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन आर.एच.मोरे यांनी केले।
|
अहमदनगर शिवजयंती २०११
छत्रपती शिवाजीमहाराजांचा संघर्ष धार्मिक नव्हता, तर त्यावेळच्या परिस्थितीशी होता. शिवाजीमहाराज हे वैश्विक राजे होते. ते कोणत्या एका जातीचे राजे होते, अशी भूमिका घेता येत नाही. इतिहासाचे फेरलेखन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासन समितीचे अध्यक्ष प्रा. हरी नरके यांनी केले.
येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजीमहाराज शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी प्रा. नरके बोलत होते. जि. प. माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी डी. एस. भुजबळ अध्यक्षस्थानी होते. जि. प. सदस्य प्रा. मधुकर राळेभात, सरपंच प्रा. कैलास माने, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरूण चिंतामणी, डॉ. पी. जी. गदादे, सय्यद मन्सूरभाई, जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य आर. बी. देशमुख, संस्थेचे अध्यक्ष भानुदास बोराटे, छत्रपती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य पी. जे. नागरगोजे उपस्थित होते.
प्रा. नरके म्हणाले की, शून्य टक्क्य़ाने कर्ज देणारा पहिला राजा छत्रपती शिवाजी होय. पेरणी, तसेच अन्य कामासाठी गरजेप्रमाणे कर्ज दिले जाते. एखाद्यास कर्जाने दिलेली मुद्दल फेडणेही शक्य नसेल, अशा शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे असे राजांनी सांगितले होते. छत्रपती शिवरायांनी संपत्ती मिळविली, परंतु ती एकटय़ाची मानली नाही. ती त्यांनी रयतेची मानली. आता मात्र पुण्याई शाहू, फुले, आंबेडकरांची आणि प्रत्यक्ष काम वेगळेच अशी स्थिती आहे. प्रा. राहुल चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रा. के. बी. सगळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. बी. तरटे यांनी आभार मानले।
पारनेर मध्ये शिवजयंती उत्साहात | | | | |
प्रभावी सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत अवघ्या १० वर्षांच्या प्रांजली साठे या विद्यार्थिनीने मराठा सेवासंघ, संभाजी ब्रिगेड व विविध शिवप्रेमी संघटनांनी आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवात पारनेरकरांची मने जिंकली. भाषणानंतर तिच्यावर बक्षिसांचा अक्षरश: वर्षांव झाला.
मराठा सेवासंघाने घेतलेल्या ४ गटांतील वक्र्तृत्व स्पर्धेत प्रांजलीने खुल्या गटातील स्पर्धकांची बोलतीही बंद केली. पारनेर बसस्थानक परिसरात पार पडलेल्या शिवजयंती सोहळ्यात मोठय़ा जनसमुदायासमोर प्रांजलीने प्रभावी भाषण केले. मराठा सेवासंघ, संभाजी ब्रिगेड, तसेच दोस्ती ग्रूपच्या वतीने आयोजित शिवजयंती महोत्सवाचा प्रारंभ तहसीलदार गोविंद शिंदे यांच्या हस्ते शिवरायांच्या अर्धकृती पुतळ्याच्या पूजनाने झाला. पोलीस निरीक्षक तुकाराम वहिले, बाजार समितीचे सभापती काशिनाथ दाते, जि. प. सदस्य वसंत चेडे, सरपंच राजेंद्र तारडे, उपसरपंच विजय डोळ, सैनिक बँकेचे अध्यक्ष अर्जुन चौधरी, दीपक नाईक, बबन वाबळे, दादाभाऊ शेटे, सुदाम कोरडे आदी उपस्थित होते. मराठा सेवासंघाचे विभागीय अध्यक्ष संभाजी औटी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिवजयंतीनिमित्त ग्रामीण रूग्णालयात आयोजित रक्तदान शिबिरासही चांगला प्रतिसाद मिळाला. सुधाकर डुंबरे यांचे शिवचरित्रावरील व्याख्याने, तसेच शहरातून काढलेल्या मिरवणुकीस पारनेरकरांचा प्रतिसाद मिळाला. शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत माऊली बालकाश्रमाच्या विद्यार्थ्यांनी शारीरिक कसरती, लाठी-काठी, तलवारबाजी यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. अध्यापक विद्यालयाचे विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी झाले होते. जयप्रकाश साठे यांनी सूत्रसंचालन केले. शंभू दुधाडे यांनी आभार मानले. किरण सोनवणे, संजय रेपाळे, केशव अडसूळ, संपत म्हस्के, के. बी. बांडे, कांतिलाल कोकाटे, संजय कावरे, अभय गट, विजय वाबळे, संजय ढवळे आदींनी परिश्रम घेतले.
निघोज, वडनेरला उत्साहात
निघोज/वार्ताहर - येथील मळगंगा विद्यालय, तसेच वडनेरच्या जि. प. प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथे आयोजित कार्यक्रमात कॅप्टन विठ्ठलराव वराळ, निमा संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक सरोदे, निवृत्त प्राचार्य शिवाजी पिंपरकर, हिंदवी शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजी वराळ, मळगंगा पतसंस्थेचे संचालक रामदास लंके, व्यवस्थापक दिलीप वराळ, भैरवनाथ पतसंस्थेचे व्यवस्थापक सोमनाथ वरखडे, मुख्याध्यापिका रेखाताई वराळ आदी उपस्थित होते. डॉ. सरोदे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. पिंपरकर यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले. किसन वरखडे यांनी आभार मानले.
कोल्हारला ५ तास मिरवणूक
कोल्हार/वार्ताहर - छत्रपती शिवाजीमहाराज की जय, अस जयघोष, झांजपथकाचा निनाद, मावळ्यांच्या पोशाखातील घोडेस्वार, फटाक्यांची आतषबाजी अशा जल्लोषात शिवजयंतीनिमित्त आज शिवप्रतिमेची येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली.दुपारी ग्रामदैवत श्री भगवतीमाता मंदिरापासून शिवप्रतिमेच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. मावळ्यांच्या पोशाखातील ४ घोडेस्वार मिरवणुकीच्या अग्रभागी होते. नानगाव (दौंड) येथील झांजपथक, भंडारदरा येथील कलाकारांनी सादर केलेले आदिवासी काम्बड नृत्य हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले. या मिरवणुकीत शिवजयंती महोत्सव समितीचे सदस्य, विविध सामाजिक संघटना, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व शिवप्रेमी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. कोल्हार भगवतीपूर शिवजयंती महोत्सव समितीतर्फे सकाळी ग्रामदैवत भगवतीमाता मंदिरासमोरील भव्य प्रांगणात उत्सवास प्रारंभ झाला. शिवनेरीहून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले. सरपंच सुरेंद्र खर्डे, डॉ. संजय खर्डे, उपसरपंच श्रीकांत खर्डे, वसंतराव खर्डे, अशोकलाल आसावा, कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष हरिभाऊ जिजाबा खर्डे, भास्कर दिगंबर खर्डे, बाळकृष्ण खर्डे, सयाजी खर्डे आदींच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले।
राजमुद्रा ग्रुपच्या वतीने कर्जतला | | | | |
कर्जत, १९ फेब्रुवारी/वार्ताहर
येथे शिवजयंतीनिमित्त राजमुद्रा ग्रुपने अध्यक्ष विजय तोरडमल यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रम आयोजित केले होते. सकाळी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सायंकाळी शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी राजेंद्र फाळके, नामदेव राऊत, अशोक खेडकर, बाळासाहेब साळुंके, विजय तोरडमल, शरद भैलुमे, सचिन पोटरे, सचिन जाधव, स्वप्नील देसाई, दीपक शिंदे, ज्ञानदेव लष्कर आदी उपस्थित होते. बसस्थानकाजवळ रिपाइंच्या वतीने शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वरील सर्व मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी शहरातून शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी शिवप्रतिमेचे पूजन केले. यावेळी राजमुद्राचे विजय तोरडमल उपस्थित होते.
तालुक्यातील दिघी येथेही शिवछत्रपती तरूण मंडळाच्या वतीने शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. शिवप्रतिमेस प्रा. चंद्रकांत राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रोहित राजेनिंबाळकर, दीपक राजेनिंबाळकर, महेश राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते।
मराठा महासंघातर्फे पाथर्डीत भव्य मिरवणूक | | | | |
शहर व तालुक्यात शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. युवक राष्ट्रवादी काँग्रेस व मराठा महासंघाच्या वतीने या वेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली.
केळवंडीच्या तरूणांनी शिवनेरीहून आणलेली शिवज्योत पाथर्डी ते केळवंडी अशी मिरवणुकीने नेण्यात आली, तर शिरापूर, खांडगाव व टाकळीमानूर येथेही मिरवणुका काढण्यात आल्या. कसबा विभागातील स्वराज युवा प्रतिष्ठानने प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केला होता. युवक राष्ट्रवादी व मराठा महासंघाने काढलेल्या मिरवणुकीत शिवाजीमहाराजांचा न्याय हे पथनाटय़, मावळ्यांचे पथक, बँड, ढोलीबाजापथक सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर भगवे झेंडे लावले होते. मिरवणुकीत युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष महेश बोरूडे, मराठा महासंघाचे अध्यक्ष बंडू बोरूडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अभय आव्हाड, नगरसेवक नंदकुमार शेळके, संजय भागवत आदी सहभागी झाले होते.
तिसगाव येथे दिलीप अकोलकर मित्रमंडळ व तिसगाव विकास मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. येथे राजीव राजळे यांचे व्याख्यान झाले. कसबा विभागातील शिवपुतळ्यास आमदार चंद्रशेखर घुले यांनी, तर पंचायत समिती आवारातील पुतळ्याला सभापती काकासाहेब शिंदे यांनी पुष्पहार घातला. राजीव राजळे मित्रमंडळाचे कार्यकर्ते नगरसेवक बंडू बोरूडे, सीताराम बोरूडे यांनीही शिवजयंती साजरी केली.
छत्रपतींच्या विचारांची शिदोरी प्रत्येक घटकाला उपयोगी - विखे | | | | |
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या विचारांची शिदोरी तरूण पिढीला आणि समाजातील प्रत्येक घटकाला उपयोगी पडत आहे, असे प्रतिपादन कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या ३८०व्या जयंतीनिमित्त डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित अभिवादन सोहळ्यात ते बोलत होते.
कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे यांच्या अध्यक्षस्थानी हा कार्यक्रम झाला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, कामगार संघटनेचे सरचिटणीस अविनाश आपटे, कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर, कारखान्याचे संचालक उपस्थित होते.
विखे यांच्या हस्ते शिवाजीराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. ते म्हणाले की, रयतेचे शिलेदार म्हणून राजांचे व्यक्तिमत्व आपल्यापुढे उभे राहते. स्वराज्य मिळवून देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन त्यांनी नवा विचार दिला.
यावेळी कारखान्याचे संचालक शांतीनाथ आहेर, अण्णासाहेब कडू, केरूनाथ चेचरे, शशिकांत घोलप, सर्जेराव खर्डे, दीपक पाटील, रामदास निकम, कार्यकारी संचालक आर.डी. शितोळे, सरव्यवस्थापक बी. एन. सरोदे आदी उपस्थित होते।
ढोलताशांचा गजर, तसेच खंडेश्वराचा यळकोट या वातावरणात पिंपरी जलसेन येथे आयोजित बैलगाडय़ांच्या शर्यतीला आज अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव शेळके यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्गाटन झाले. जि. प. सदस्य राजाराम एरंडे, जिल्हा बँकेचे संचालक उदय शेळके, पं. स. सदस्य सुभाष बेलोटे, उद्योगपती विष्णुशेट कदम, सरपंच लहू थोरात आदी उपस्थित होते. आंबेगाव, जुन्नर, पारनेर, शिरूर या ४ तालुक्यांतून शेकडो बैलगाडय़ांनी शर्यतीत सहभाग घेतला.
मालमोटारी, टेम्पो या वाहनांतून वाजतगाजत बैलगाडे येत होते. घाटाच्या सभोवती कडय़ावरून हजारो गाडाशौकिन शर्यतीचा आनंद लुटत होते. दुपारी दीडवाजता सुरू झालेली शर्यत सुमारे ४ तास चालली. उदय शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सरपंच थोरात यांच्या नेतृत्वाखाली शर्यतीचे नियोजन करण्यात आले. सुमारे लाखभर रूपयांची बक्षिसे देण्यात आली.
बैलगाडा शर्यतीचा घाट दुरूस्त करण्यासाठी गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून खर्च केला. सकाळी काठय़ांची मिरवणूक, खंडेश्वराचा अभिषेक, महाप्रसादाचे आयोजन, शिवजयंती उत्सव, विविध विकासकामांची उद्घाटने व भूमिपूजन करीत ही यात्रा गावकऱ्यांनी मोठय़ा उत्साहात साजरी केली।
शिवजयंतीनिमित्त आज नगरमध्ये मिरवणूक | | | | |
उद्या (शनिवारी) साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी जिल्ह्य़ात सुमारे पावणेतीन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या परिसरात विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन, पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उद्या पुतळ्याची पूजा करून अभिवादन करतील. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने सकाळी आठ वाजता मिरवणूक काढण्यात येणार आहे. विविध पथके, शाळकरी मुले व नागरीक मिरवणुकीत सहभागी होतील.
शिवजयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे भिस्तबाग चौकात आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन काल सत्यपाल महाराजांच्या हस्ते झाले. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे यांचे व्याख्यान आज झाले. छावातर्फे भिंगार येथे शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आलमगीर रस्त्यावरील द्वारकाधीश कॉलनी येथे होईल. दुपारी १० ते २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर, तसेच सायंकाळी ५ वाजता शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. रविवारी वसतिगृहातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येईल, असे जिल्हाध्यक्ष गणेश िशदे यांनी सांगितले.
शिवजयंतीच्या पाश्र्वभूमीवर पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरात २ अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ३ उपअधीक्षक, १० निरीक्षक, १८ उपनिरीक्षक व ४५० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्य़ात ८ पोलीस उपअधीक्षक, ४५ निरीक्षक, ५२ उपनिरीक्षक व २ हजार ५०० पोलीस असा बंदोबस्त असेल.
वाशिम शिवजयंती २०११
वाशिम जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात शिवजयंतीनिमित्त वाशीममध्ये मोफत नेत्रतपासणी | | | | |
अखिल भारतीय छावा संघटना व राष्ट्रीय अपंग विकास महासंघातर्फे शिवजयंतीनिमित्त शनिवार, १९ फेब्रुवारीला वाशीम बसस्थानकासमोर मोफत नेत्र तपासणी व आंतरभिंगारोपण नेत्रशस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबीर सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत होणार असून नेत्ररुग्णांची शस्त्रक्रिया येथील सामान्य रुग्णालयात होणार असल्याची माहिती आयोजक व छावा संघटनेचे विदर्भ संपर्क प्रमुख मनीष डांगे यांनी दिली.
या शिबिरामध्ये जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. अभय पाटील, डॉ. कविता ठाकरे, नेत्रचिकित्सा अधिकारी जगदीश बाहेकर, किरण हाके व त्यांचे सहकारी नेत्ररुग्णांची तपासणी करून उपचार करणार आहेत. या शिबिराचे उद्घाटन रतनगड येथील संत गोपाल बाबा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव इंगोले राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. म्हात्रे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजू चौधरी, वाशीमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, सार्वजनिक शिवजयंती सोहोळ्याचे अध्यक्ष गंगूभाई बेनिवाले, भाजप शहर अध्यक्ष मिठूलाल शर्मा, नगरसेवक नागोराव ठेंगडे, राजू वानखेडे, अजय वाघ, हरीश सारडा, बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन पगार, कार्याध्यक्ष बाळासाहेब देशमुख, मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे, पीरिपाचे जिल्हाध्यक्ष दौलत हिवराळे, रिपाइंचे अध्यक्ष गोवर्धन चोथमल, वसंत धाडवे, अॅड. जोगी, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अध्यक्ष सोनाली ठाकूर, काँग्रेस महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अलका मकासरे, सरकार इंगोले, बबन भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष बबलू अहीर आदी उपस्थित राहणार आहेत.
यवतमाळ शिवजयंती २०११
शिवजयंती उत्सव आर्णीत थाटात साजरी | | | | |
येथे शिवजयंती उत्सव सोहोळा मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शिवनेरी चौक व शिवाजी चौकातील शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मराठा सेवा संघाच्यावतीने आयोजित सोहोळ्यात असंख्य शिवप्रेमींनी मोठय़ा संख्येनी हजेरी लावली होती. गांधीनगरातील प्राथमिक मराठी शाळेत आयोजित सोहोळ्यात माजी आमदार श्रीकांत मुनगीनवार, मौलाना आझाद आर्थिक अल्पसंख्याक विकास महामंडळाचे संचालक ख्वाजाबेग, यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजूदास जाधव प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तिन्ही वक्तयांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. त्अध्यक्षस्थानी तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. गिरीधर कुबडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बबन मुडवाईक यांनी केले. कार्यक्रमाला पंचायत समितीने उपसभापती विठ्ठल देशमुख, हरीश कुडे, सरपंच श्रावण मडावी, उपसरपंच शे. मोहीब, माजी उपसरपंच छोटू देशमुख, माजी सरपंच अरुण राऊत, खुशाल ठाकरे आदी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. कार्यक्रमासाठी गिरीधर कुबडे, सुदर्शन चव्हाण, लक्ष्मण हिरवे, गजानन जगताप, पुरुषोत्तम झापे, दिलीप वानखडे, विश्वंभर उपाध्ये आदींनी विशेष परिश्रम घेतले।
शिवाजी महाराज बुद्धिवान लढवय्ये होते - डॉ. आ.ह. साळुंके | | | | |
शिवरायांचा प्रताप आठवत असताना ते अत्यंत बुद्धिमान लढवय्ये होते, याचे भान २१व्या शतकात जपणे अत्यावश्यक आहे, ही खरी शिवरायांप्रती निष्ठा असावी, असे कळकळीचे आवाहन डॉ. आ.ह. साळुंके यांनी ‘शिवरायांचे संस्कार आणि शिक्षण’ या विषयावर बोलताना केले.
येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शिवजयंतीनिमित्त चार दिवसीय व्याख्यानमाला सोशल क्लबच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना डॉ. साळुंके यांनी शिवरायांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडवण्यात मॉ जिजाऊ व शहाजी यांचे योगदान कसे महत्त्वाचे आहे, हे सोप्या शब्दात व्यक्त केले. संस्कार आणि शिक्षणातून ते अत्यंत बुद्धिमान लढवय्ये बनले. शिवराय बुद्धिमान लढवय्ये होते, याचा कधीही विसर पडू नये, अशी त्यांनी कळकळीची विनंती केली.
अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री संजय देशमुख होते. दिनेश नरवडे यांनी आभार मानले. व्याख्यानास श्रोत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. उद्या १८ फेब्रुवारीला प्रभाकर गावंडे यांचे व्याख्यान होणार असून १९ फेब्रुवारीला मिरवणुकीचे आयोजन केले आहे.
परभणी शिवजयंती २०११
परभणीत शिवभक्तांची जल्लोषी मिरवणूक | | | | |
अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने आज शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत जिल्हाभरातून वारकरी मंडळी सहभागी झाली होती. टाळमृदंगाच्या गजरात विठुरायाच्या जयघोषात ही मिरवणूक श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघाली.
आज सकाळी श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या कार्यक्रमात प्रथम शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे, पोलीस अधीक्षक रघुनाथ खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, अ. भा. वारकरी मंडळाचे अध्यक्ष बालासाहेब मोहिते-पाटील आदी उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांनी यज्ञकुमार करेवार, ह. भ. प. धोंडीगिरी मिरखेलकर, लक्ष्मी काळदाते, ह. भ. प. मधुकरबुवा लोहगावकर, केशवराव नावकीकर, राधिका भालेराव आणि पोलीस कर्मचारी सय्यद अफसर सय्यद जफर यांना सन्मानित करण्यात आले. यानंतर शिवजयंतीची मिरवणूक निघाली. यामध्ये मोठय़ा संख्येने वारकरी सहभागी झाले होते. भजनी मंडळे तल्लीन होऊन टाळमृदंगाच्या गजरात विठुरायाचा जयघोष करीत मार्गस्थ झाले. या वेळी डॉ. शालिग्राम वानखेडे आणि रघुनाथ खैरे यांनीही टाळ हाती घेऊन काही काळ सोबत केली. भजनी मंडळींमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. वयोवृद्ध वारकऱ्यांनी मृदंगाच्या ध्वनीवर ताल धरला. यानंतर महाप्रसादाने मिरवणुकीची सांगता झाली.
नगरपालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण
परभणी नगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा जयश्री खोबे यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी मुख्याधिकारी दीपक पुजारी, श्री. देशमुख, मुंढे आदी कर्मचारी उपस्थित होते.
रायगड मित्रमंडळाची रॅली
रायगड मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शिवरायांचा जयघोष करीत ती शहराच्या विविध भागांतून नेण्यात आली. या वेळी सहभागी युवकांकडे भगवा ध्वज होता.
हिंगोली शिवजयंती २०११
हिंगोलीत विविध कार्यक्रमांद्वारे शिवजयंती उत्साहात साजरी | | | | |
शहरात विविध कार्यक्रमांतून शिवजयंती साजरी करण्यात आली. मराठा सेवा संघ व इतर संस्थांनी एकत्रपणे विविध स्पर्धाचे तसेच २३ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गांधी चौकात शनिवारी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडय़ाचा कार्यक्रम घेण्यात आला.
महात्मा गांधी चौकात शनिवारी मराठा महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी माजी खासदार शिवाजी माने यांनी शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक केशव पाटील यांनी शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र आणून स्वराज्याची स्थापना केली त्यांनी इतरांच्या धर्माचा आदर राखल्याचे सांगितले.
माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणातून हिंगोलीत शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी पालिकेतून एकमताने जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मंजूर करून रामकृष्णा लॉजसमोर जागा दिल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय निलावार यांनी केले.
शनिवारी दोन गटात सामान्य ज्ञान स्पर्धा व कराटे स्पर्धा घेण्यात आल्या. रविवारी जागतिक सामाजिक दिवस, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले आहे. २३ ला रांगोळी स्पर्धा व विविध स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. शहरातील निरंजन चौकात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन, जिल्हा गणित अध्यापक मंडळ, सत्यनारायण विद्यामंदिर, आदर्श महाविद्यालय तसेच ग्रामपंचायत औंढा नागनाथ,कलमनुरी,वसमत, सिरसम (बु।), केंद्रा (बु।), पुसेगाव आदी ठिकाणी शिवजयंती विविध कार्यक्रमांतून साजरी करण्यात आली.
नांदेड शिवजयंती २०११
शिवरायांच्या जयजयकाराने लोहानगरी दुमदुमली | | | | |
छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने लोहानगरी दुमदुमली. संपूर्ण शहरात रोषणाई, आकर्षक आणि मनोवेधक आतीषबाजी, आदिवासी नृत्य, स्वराज्यभिषेकाचा जिवंत देखावा आणि उंच घोडय़ाचा समावेश असलेली छत्रपती शिवरायांची भव्य मिरवणूक आज शहरातून निघाली. माजी आमदार प्रताप पाटील यांच्या वतीने काढलेल्या मिरवणुकीत नागरिक सहभागी झाले होते.
शिवाजी चौकापासून मोटरसायकल फेरी निघाली. जुन्या शहरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रताप पाटील यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आल्यानंतर शिवरायांना अभिवादन करून मिरवणूक निघाली. यामध्ये सर्व जातीधर्माचे लोक सहभागी झाले होते. शिवजयंतीनिमित्त मिलिंद पवार यांनी मोटारसायकल फेरी काढली होती.
आदिवासी नृत्य, स्वराज्यभिषेकाचा जिवंत सोहळा, आकर्षक मूर्ती मंडप यासह लेझिम आणि आतीषबाजीने जयंती सोहळा आनंदात पार पडला. या वेळी शहरातील मान्यवर, राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी शिवरायांना अभिवादन केले. यामध्ये पंचायत समिती सभापती केशव पाटील, कंधारचे पंचायत समिती सभापती रामचंद्र राठोड, कृउबा सभापती रुस्तुम धुळगंडे, उपसभापती रंगनाथ भुजबळ आदींसह मोठय़ा संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते.
भोकरमध्ये अपूर्व उत्साह
भोकर- नगरपालिकच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष डॉ. विजयकुमार दंडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी सभापती शिवाजीराव पांचाळ, डॉ. पुरुषोत्तम कल्याणकर, विनोद पा. चिंचाळकर, विनायक कदम यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
गंगाखेडमध्ये देखाव्यांसह मिरवणूक
गंगाखेड- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज शहरात उत्साहात साजरी झाली. सकाळी विविध कार्यालयांत छत्रपतींना अभिवादन करण्यात आले. दुपारी सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा व प्रतिमेची सवाद्य देखाव्यांसह मिरवणूक काढली. प्रतिमेचे पूजन नगरसेवक रामप्रभू मुंडे, गोविंद निरस, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गोविंद यादव यांनी केले. कलावंत गोपी मुंडे यांच्या नादबिंदू मंडळाने सादर केलेल्या शिवरायांच्या सजीव देखाव्याने लक्ष वेधले. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष उमाकांत फड, बाळासाहेब मडके, विवेकानंद माने, विजय अवचार, सिद्धार्थ धिटे, संतोष वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.
मराठवाडा शिवजयंती २०११
औरंगाबाद शहरात शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी | | | | |
औरंगाबाद शहरात शनिवारी शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध पक्ष आणि संघटनांतर्फे मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीपासून शनिवारी सायंकाळी मिरवणुकीला प्रारंभ झाला. रात्री उशिरा या मिरवणुकीचा समारोप झाला.
औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीतर्फे मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत अनेक संस्थांनी सजीव देखावे साकारले होते. लेझिम, टाळ मृदंग यामुळे शहांगज, सराफा, मच्छली खडक, गुलमंडी हा मार्ग दणाणून गेला होता. या मिरवणुकीचा समारोप क्रांतिचौकात करण्यात आला. या मिरवणुकीत आमदार डॉ. कल्याण काळे, आमदार संजय वाघचौरे, माजी खासदार उत्तमसिंह पवार, ज्येष्ठ नेते मधुकरराव मुळे, पोलीस आयुक्त श्रीकांत सावरकर, शिवजयंती समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, अध्यक्ष विनायक गुंजाळ, हर्षवर्धन तुपे पाटील, रंगनाथ काळे, प्रकाश मुगदिया, सुभाष झांबड, अभिजीत देशमुख, संदीप शेळके, मनमोहनसिंग ओबेरॉय, जी.एस.ए. अन्सारी, तनसुख झांबड आदी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांदे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त नामदेव जोगदंड यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
विद्यापीठात शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ कुलगुरु डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. प्रवेशद्वारापासून ते विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताश्यांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा घोषणा देत ही मिरवणूक काढण्यात आली.
उस्मानाबादेत शिवजयंती साजरी

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या प्रमिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना जिल्हाधिकारी डॉ.प्रविण गेडाम.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपविभागीय अधिकारी सुनील यादव,उपजिल्हाधिकारी दिनकर जायभाय दिसत आहेत.
श्रमिक गोजमगुंडे यांना शिवबा पुरस्कार प्रदान
Sunday, February 20, 2011
अकोला शिवजयंती २०११
शिवप्रेमीनी केली शिवजयंती साजरी | | | | |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८२ व्या जयंतीनिमित्त मराठा सेवा मंडळाच्या वतीने स्थानिक शिवाजी पार्क येथे शिव जन्मोत्सव व पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ७ वाजता नगरसेविका प्रभावती जाधव व रोहिणी पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मराठा सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यां सविता कदम, दुर्गा पवार, कुसुम कावळे, संध्या काकडे, माधुरी बिडवे, मीना सराफ यांच्या द्वारे छत्रपती शिवाजी महाराजांची छोटी प्रतिमा पाळण्यात ठेवून परंपरेनुसार पाळणा म्हणण्यात आला.
पेढे व प्रसाद वाटप करत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी ९ वाजता महापौर सुरेश पाटील, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, आमदार गोवर्धन शर्मा, भाजपा महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे पाटील, कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष रमेश तायडे, मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष अनिल बिडवे, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे प्रा. प्रदीप वाघ, संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले, यावेळी सामाजिक कार्यकर्ता महादेव भुईभार, मनोहर हरणे, विनायक पवार, राजाभाऊ देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले।
अकोल्यात अवतरली शिवशाही...
मराठमोळ्या पोषाखात महिलांची स्कुटर मिरवणूक | | | | |
अकोला, १७ फेब्रुवारी/वार्ताहर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम शनिवारी येथे घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाची माहिती एका पत्रकार परिषदेत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. प्रदीप वाघ व संयोजक पंकज जायले यांनी दिली.
शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठीचे नियोजन पूर्ण झाल्याची माहिती यावेळी वाघ यांनी दिली. शहरातील गणमान्य व्यक्तींच्या हस्ते शिवाजी पार्क येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे विधिवत पूजन सकाळी ९.३० वाजता करण्यात येईल. शनिवारी सकाळी १०.३० वाजता येथील तोष्णीवाल लेआऊट येथील प्रभात किड्स येथून मराठमोळ्या पोषाखात महिलांची स्कुटर रॅली शहरातील विविध भागातून काढण्यात येईल व तेथेच या रॅलीचे समापन होईल तर, सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क येथून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदा शिवजयंती भव्य स्वरूपात साजरी करण्यासाठी ५१ मोठय़ा नगाऱ्यांचा समूह असलेले पथक बोलवण्यात आले आहे. ते भव्य मिरवणुकीत महत्वाची भूमिका बजावतील. त्याचबरोबर राजंदा येथील दिंडी देखील या मिरवणुकीत सहभागी होणार आहे तर, शहरातील दोन व्यायामशाळांचे विद्यार्थी चित्तथरारक कसब दाखवणार आहे. शिवकालीन परंपरा असलेल्या गोंधळी नृत्य या मिरवणुकीत असेल तर, जाणता राजा या महानाटय़ातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारे विवेक कोल्हे शोभायात्रेत शिवरायांच्या वेशात त्यांच्या मावळ्यासह सहभागी होणार आहे.
पुणे येथील प्रसिध्द एअर फायर शो चे आयोजन या भव्य मिरवणुकीच्या समापनाच्या वेळी स्थानिक स्वराज्य भवनात रात्री ८ वाजता करण्यात आले आहे. एअर फायर शो रात्रीचे विशेष आकर्षण राहणार आहे. यंदा पहिल्यांदा अकोल्यात अशा प्रकारे एअर फायर शो होणार असल्याची माहिती उत्सव समितीने दिली. सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे कार्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीमार्फत करण्यात येणार आहे. शहरातील तरुणांनी व ज्येष्ठ नागरिकांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यस्मृतीला सामूहिक उजाळा देण्यासाठी हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला उत्सव समितीचे उपाध्यक्ष अनिल बिडवे, मनोहर हरणे, विनायक पवार, प्रा.मधु जाधव, मुरलीधर झटाले हे उपस्थित होते.
रायगड शिवजयंती २०११
रायगडला ‘हेरिटेज-1’ दर्जासाठी प्रयत्न करेन
महाद- कोकणातील किल्ले पुरातत्त्व खात्याच्या ‘सर्वसामान्य’ यादीवर आहेत. ते ‘हेरिटेज-1’च्या यादीवर आल्यास अधिक निधी मिळेल व किल्ल्यांवर सुधारणा अधिक जलद गतीने होतील. याचा विचार करूनच सिंधुदुर्ग, विजयदुर्ग या किल्ल्यांसोबत किल्ले रायगडचे नाव सरकारच्या ‘हेरिटेज-1’ यादीत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन काँग्रेसचे खासदार डॉ. निलेश राणे यांनी रायगडावर दिले. गुरुवारी त्यांच्या हस्ते किल्ले रायगड ते शिवमंदिर (सिंधुदुर्ग) या ‘शिवतेज मशाल रॅली’स सुरुवात झाली. शिवजयंतीचे औचित्य साधून या रॅलीचे प्रथमच आयोजन केले जात आहे.
या रॅलीच्या निमित्ताने डॉ. निलेश राणे गुरुवारी सकाळी रायगडवर आले. त्या वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व जगदीश्वराची विधिवत पूजा केली व त्यांना अभिषेकही केला. त्यानंतर त्यांनी रायगडाची पाहणी करून जगदीश्वर मंदिराच्या प्रांगणातून मशाल पेटवून ‘शिवतेज मशाल रॅली’चा शुभारंभ केला. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, अशा प्रकारच्या रॅलीच्या माध्यमातून तरुणपिढीला छ. शिवाजी महाराजांचा इतिहास, शौर्य, तेज सांगण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. डॉ. राणे यांनी रायगडवरील आणि परिसरातील रहिवाशांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच या प्रश्नांचा संपूर्ण अभ्यास करून परिपूर्ण माहितीसह आपण पुन्हा येथे येऊ, असेही आश्वासन त्यांना दिले.
‘रायगड रोप-वे’ सहा दिवस बंद
वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी रायगडवर जाणारा रोप-वे 21 ते 26 फेब्रुवारीदरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. रायगडावर जाणा-या पर्यटकांची संख्या वाढत असल्याने सुरक्षितताही महत्त्वाची आहे. त्यामुळे वार्षिक दुरुस्तीमध्ये काही बदलही करण्यात येणार आहेत.जळगाव शिवजयंती २०११
शहरातून आज काढण्यात आलेल्या मिरवणूकीची सुरवात गोलाणी मार्केट समोरील आदिती साडीयॉं येथून सकाळी 10 वाजता करण्यात आली. शिवाजी ब्रिगेडच्या मंगलमय शिवकालीन मिरवणूकीची सुरवात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. मिरवणूकीचे उद्घाटन आ. सुरेशदादा जैन, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र), प्रमोद पवार, जळगाव पिपल्स को-ऑप बॅंकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, नगरसेवक विष्णू भंगाळे, शरद लाठी यांनी बालशिवाजी महाराजांचे पूजन करून केले. हि मिरवणूक आदिती साडीयॉंपासून सुरवात झालेली मिरवणूक टावर चौक, चित्रा चौक या मार्गाने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून मिरवणूकीचा समारोप करण्यात आला. मिरवणूकीत 300 महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी शिवाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक शिवराज दादा नेवे, संस्थापक अध्यक्ष अशोकराव शिंदे, प्रकाश पाटील, डॉ. धनंजय बेद्रें, अर्जुनराव जगताप, डॉ. स्नेहल फेगडे, शशिकांत धांडे आदी उपस्थित होते.
मिरवणूकीची सुरवात मॉं साहेब जिजाऊ यांच्यासोबत बालशिवाजी महाराज सोन्याच्या नांगराने जमीन नांगरतात असा जिवंत देखावा करण्यात आला होता. या सोन्याच्या नांगराचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मिरवणूकीत बालशिवाजी म्हणून सोहम वाणी, तर जिजाऊ मॉं साहेब म्हणून तेजस्वीनी आठवले (रावेर) हे होते.
मिरवणूकीत सजविण्यात आलेल्या रथात सनई चौघडे, मागे अबदागिरी झेंडे धारी मावळे, जिजाऊ मॉं सोबत बालशिवाजी, अष्टप्रधान मंडळ नंतर ब्रम्हवृंद व नऊवारी परिधान केलेल्या मुली, स्त्रिया व मावळे, दमणी अशी अत्यंत शिस्तबद्ध मिरवणूक सनई चौघड्यांच्या गजरात मंगलमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीदरम्यान कसल्याही घोषणा किंवा गुलालाची उधळण करण्यात आली नाही.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंती
सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीतर्फे बहुजन प्रतिपालक कुळवाडी भुषण जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी महाराज क्रिडा संकूल येथे हजारो शिवप्रेमी अनुयायी एकत्र येवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूतळ्याचे पूजन कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष उदय पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश मोरे, सार्व. शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकूंद सपकाळे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे विनोद देशमुख आदी पूजन व अभिवादन करून भव्य मिरवणूकीला सुरवात केली.
सद्गुरू एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र व शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त विद्यार्थी शिक्षक व शिक्षिकांचा समावेश असलेली शोभायात्रा काढण्यात आली. संस्थेचे प्रमुख प्रा. डॉ. नारायण खडके यांच्या हस्ते फीत कापून शोभायात्रेस प्रारंभ झाला. नगरसेविका प्रा. वर्षा खडके, प्रा. अजय इंगळे, प्रा. माधुरी चौधरी, प्रा. प्रतिभा पाटील, प्रा. अश्विनी अमृतकर, प्रा. दीपाली पाटील, प्रा. लीना पाटील, प्रा. अनिता वानखेडे, प्रा. विजय नारखेडे, प्रा. समाधान बोरसे, प्रा. भादोलकर, प्रा. बन्नोरकर, प्रा. बांगले, प्रा. वंजारी, विद्यापीठ प्रतिनिधी नरेश चौधरी आदी याप्रसंगी उपस्थित होते. घोड्यावरस्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा विद्यार्थी शिक्षक किरण अडकमोल यांनी केली तर, योगेश लांबोळे व मधुसूदन सोनवणे हे मावळ्यांच्या वेशभूषेत होते. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हातात भगवे ध्वज व विविध घोषणांची फलके होती. ख्वाजामियॉं, वकील चेंबर्स, नूतन मराठा महाविद्यालय, कोर्ट चौक यामार्गे आलेल्या या शोभायात्रेचा समारोप "शिवतीर्थ' (जी. एस. ग्राउंड) मैदानावर झाला. सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले।
शिवजयंती उत्साहात साजरी | |
तोंडापूर, ता. जामनेर दि. 21 (वार्ताहर) -(22-February-2011) | |
Tags : Jalgaon,Blog | |
येथून जवळच असलेल्या ढालसिंगी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी शिवाजी चौक येथे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पुजा करण्यात आली. त्यानंतर गावातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी गावातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोभायात्रेत दामू गोतमारे, निलेश गोतमारे, डॉ. दिलीप पाटील, सुधाकर साबळे, अनिले बेलेकर, देवानंद गोतमारे, रितेश गोतमारे, गणेश गाढवे, कमलाकर पाटील, सुनिल गोतमारे, गजानन पवार, प्रविण गोतमारे, कृष्णा इंगळे, निलेश उगले, भारत गाढवे, लक्ष्मण गव्हारे, दीनकर अहिरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. |