‘शिवजयंती लोकोत्सव व्हायला हवा’ | | | | |
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आता सर्व वाडय़ा, वस्त्यांसह शहरांमध्ये सार्वजनिक स्वरूपात साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवजयंती उत्सव हा लोकोत्सव झाला पाहिजे, असे मत ज्येष्ठ पत्रकार व वाशीम पालिकेचे उपाध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी व्यक्त केले.
स्थानिक संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा कार्यालयात रविवारी पार पडलेल्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीची निवड करण्याबाबत आयोजित बैठकीत माधवराव अंभोरे अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी गवळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगुभाई बेनिवाले, व्यापारी मंडळाचे सचिव जुगलकिशोर कोठारी, मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय शिंदे, जिल्हाध्यक्ष अशोक महाले आदी उपस्थित होते.
येत्या १९ फेब्रुवारीला पार पडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८१ वी जयंती वाशीम शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सार्वजनिक स्वरूपात साजरी करण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती २०११ चे गठन करण्यात आले.
१७ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त येथील शिवाजी चौकात हास्य कवी मिर्झा बेग यांचा ‘मिर्झा एक्सप्रेस’ हा छत्रपती शिवरायांचे विचार मांडणारा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. १८ फेब्रुवारीला शहरातील विद्यालये व महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा तर १९ फेब्रुवारीला शहरातून भव्य मोटार सायकल रॅली, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक महाले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष बोरकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे, गंगुभाई बेनिवाले, गणेश आढाव यांनी मनोगत व्यक्त केले.
संचालन डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष नारायण काळबांडे यांनी केले तर आभार बालाजी वानखेडे यांनी मानले. या बैठकीला ज्ञानेश्वर वाघ, गजानन बोरकर, बबलू अहीर, गणेश शिंदे, राजू काळे, किसनराव खोडे, शंकर शिंदे, कैलास सुर्वे, शिवराज पाटील, आनंद पुंडगे, सोपान काकडे, दगडू काकडे, आसिफखा पठाण, कृष्णा चौधरी, आकाश माळेकर, सचिन सिरसाट, शेख इसाक, प्रकाश कवडे, गंगाधर बोरकर, राजू जोगदंड, अविनाश पसारकर, विठ्ठल ढगे, सुनील पाटील, सुशील भीमजियाणी, तेजराव वानखेडे, गजानन गोटे, सुनील बोरकर, आनंद गडेकर, नीलेश सोमाणी, गजानन धामणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते।
शिवजयंती २०११ निमित्त स्मरणिका प्रकाशित होणार
शिवपर्व २०११ पुसद

No comments:
Post a Comment