शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांसमोर येणे गरजेचे
Friday, February 18, 2011 AT 12:00 AM (IST)

परभणी - "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन बदलते संदर्भ लक्षात न घेता त्यांच्या नावाचा राजकारणात काही मंडळी चुकीच्या पद्धतीने वापर करीत आहेत. त्यामुळे महाराजांचा व्यापक इतिहास लोकांसमोर आणणे गरजेचे आहे,'' असे प्रतिपादन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केले.
छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने येथील नटराज रंगमंदिरात आयोजित दोन दिवसांच्या महाराष्ट्र संगीतरत्न व हास्यसम्राट या सांस्कृतिक स्पर्धात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 17) झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्री फौजिया खान, आमदार विनायक मेटे, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, प्रा.
इंद्रजित भालेराव, विजय भांबळे, विनोद कदम, विजय वाकोडे, बाबासाहेब जामगे, डॉ. प्रफुल्ल पाटील, रत्नाकर गुट्टे, सुभाष जावळे, बालासाहेब मोहिते, जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, ""छत्रपती हे देशाचे प्रेरणास्थान आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. सर्व जातिधर्मांना सोबत घेऊन छत्रपतींनी साम्राज्यशाहीच्या विरोधात लढा दिला; परंतु आज छत्रपतींचे नाव घेऊन त्याचा राजकारणात चुकीचा वापर होत आहे. तो वापर छत्रपतींचा व्यापक इतिहास जनतेसमोर आणून थांबविणे गरजेचे आहे.'' आजवर राजांनी कलावंत, साहित्यिकांना प्रोत्साहन दिले. कलाकृती या आश्रदात्यास अजरामर बनवीत असतात. समाज पैशाने सधन होत नाही, तर कलेमुळे संपन्नता प्राप्त होते. यादृष्टीने प्रतिष्ठानने कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा सुरू केलेला हा प्रयत्न महत्वपूर्ण आहे, असेही पाटील म्हणाले. प्रतिष्ठानच्या या उपक्रमास एक लाख रुपयांचा निधी देण्याचे आर. आर. पाटील यांनी जाहीर केले.
श्री. पाटील यांचा सत्कार आयोजक ऍड. विष्णू नवले यांनी तलवार भेट देऊन केला. सूत्रसंचालन सुनील तुरूकमाने यांनी केले. या वेळी अरबी समुद्रात पोहल्याबद्दल डॉ. राजगोपाल कालानी व रेल्वेत रुजू झालेल्या तोशिबा शिंदे यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कंत्राटदार आर. डी. मगर यांना छ
त्रपती पुरस्कार देऊन पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले।
|
|
|
शिवजयंतीदिनी "दिलावर'चे नाण्यांचे प्रदर्शन सकाळ वृत्तसेवा Friday, February 18, 2011 AT 12:00 AM (IST) कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ नाणी व फोटोंचा संग्रह करण्याचा न्यू शाहूपुरी, बेकर गल्लीतील दिलावर पठाण या तरुणाने छंद जोपासला आहे. त्याचा हा छंद शिवजयंतीदिनी (ता. 19) प्रदर्शनाच्या रुपाने लोकांसमोर येत आहे. शनिवार पेठेतील बुरुड गल्लीतील खोलखंडोबा हॉलमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत हे प्रदर्शन असेल. छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेमापोटीच सतरा वर्षांपूर्वी लागलेल्या या छंदातून दिलावर याने महाराष्ट्रासह कर्नाटकात जाऊन शंभरावर शिवकालीन नाणी व महाराजांचे दुर्मिळ फोटो जमविले. इतकेच नव्हे; तर टपाल खात्याने आजवर प्रकाशित केलेले महाराजांचे फोटो असलेली दुर्मिळ पावती तिकिटे व पोस्टकार्डांचा समावेश आहे. 1905 ला प्रकाशित झालेले शिवाजी महाराजांचे पोस्टकार्ड आणि संस्थानकालीन मुद्रांकांचीही संचयात भर घातली. दिलावर यांच्याकडून या बहुमोल संचयाची माहिती घेऊन ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन, कोल्हापूर जिल्हा मुल्ला-मुल्लाणी समाज, मौलाना आझाद विचार मंच यांनी एकत्र येऊन प्रदर्शनाची जबाबदारी घेतली आहे. प्रदर्शनात शिवकालीन, पेशवेकालीन व मराठा रियासतची दुर्मिळ नाणी मांडण्यात येणार आहेत. कलायोगी जी. कांबळे व रविवर्मा यांनी काढलेली शिवाजी महाराजांची दुर्मिळ चित्रे व तलवारी, शिवाजी महाराजांची सोन्याची होनची रिप्लीकादेखील हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असेल, असे जिल्हा मुल्ला - मुल्लाणी समाजाचे जिल्हाध्यक्ष निजाम मुल्लाणी यांनी सांगितले। शिवरायांची तलवार बंद काचपेटीत तळपणार सकाळ वृत्तसेवा Saturday, February 12, 2011 AT 12:15 AM (IST) कोल्हापूर - सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे जतन करण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने पाऊल उचलले आहे. पंधरा हजार रुपये खर्चून बनविलेल्या काचपेटीत ही तलवार ठेवण्यात येणार आहे. सोमवारी (ता. 14) युवराज संभाजीराजे छत्रपती व खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते किल्ल्यावर हा विधिवत कार्यक्रम होईल, ही माहिती समितीचे अध्यक्ष इंद्रजित सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. शिवरायांची इंग्लंडमधील जगदंबा तलवारीसारखी समितीने बनवलेली प्रतिकृतीही रोजच्या पुजेसाठी मंदिराला भेट देण्यात येणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.
ते म्हणाले, ""सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवाजी महाराजांची चार फूट लांबीची तलवार आहे. शिवरायांच्या मोजक्याच वस्तूंपैकी ती एक आहे. शिवरायांच्या मूर्तीबरोबरच तलवारीचे रोज पूजन होत आहे; परंतु या तलवारीचा 20 ते 25 टक्के भाग गंजून गेला आहे. त्यामुळे समितीने तलवारीचे जतन करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार सोमवारी (ता. 14) ही तलवार खास बनवून घेतलेल्या काचपेटीत विधिवत ठेवण्यात येणार आहे.''
ते म्हणाले, ""तलवार काचपेटीत ठेवण्यासाठी किल्ल्यावरील शिवराजेश्वर देवस्थानची समितीने परवानगी घेतली आहे. या दिवशी शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. तलवारीच्या जतन कार्यक्रमाच्या निमित्ताने किल्ल्याच्या भविष्यातील संवर्धनासाठी भरीव अशी तरतूद करण्यात यावी, अशी मागणीही खासदार राणे यांच्याकडे समिती करणार आहे. एकूण कार्यक्रमासाठी सुमारे 150 हून शिवप्रेमी उपस्थित राहणार असून पहिल्या टप्प्यातील काही कायकर्ते उद्या (ता. 12) सिंधुदुर्गवर रवाना होत आहेत. यावेळी समितीचे सचिव राहुल भोसले, अमित आडसुळे, वसंतराव मुळीक उपस्थित होते। 16 ते 19 दरम्यान शिवजयंती महोत्सवाचे आयोजन - Monday, February 14, 2011 AT 05:00 AM (IST) परभणी (parbhani)- येथील संभाजी बि÷गेडच्या वतीने दिनांक 16 ते 19 फेब÷ुवारी दरम्यपन शिव जयंती निमित्त शिवाजी महाविद्यालयातील मैदानावर राजे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या महोत्सवाचे उदघाटन बुधवारी सायंकाळी सहा वाजता बि÷गेडचे प्रदेशाध्यक्ष गायकवाड यांच्या हस्ते होणार असुन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन खा. दुधगावकर, आ. जाधव, आ. बोर्डीकर, आ. देशमुख माजी मंत्री वरपूडकर, पोलीस अधिक्षक खैरे, माजी खा. रेंगे, उपविभागीय अधिकारी राहूल माकणीकर, जि.प. सदस्य भरोसे, हभप अच्युत महाराज, नपाथ महाराज आदी उपास्ंिथत राहणार आहे. यावेळी बोरुळकर यांचे व्याख्यान होणार आहे. दि. 17 फेब÷ुवारी रोजी तानाजी भोसले यांचे छत्रपती संभाजी राजे यांच्यावर व्याख्यान होणार आहे. यावेळी मनोज आखाडे, आ. रेंगे, जि.प. अध्यक्षा देशमुख, नगराध्यक्ष खोबे, माजी नगराध्यक्ष देशमुख, धोंडीराम चव्हाण, शिवाजी निर्दुडे, मुख्याधिकारी पुजारी, नगरसेवक देशमुख, विजय वरपूडकर आदी उपास्ंिथत राहणार आहे. दिनांक 18 रोजी जिल्हाधिकारी वानखेडे यांच्या उपास्ंिथतीत रक्तदान शिबीराचेउदघाटन करण्यात येणार आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी अंधारे, विजय भांबळे यांची उपास्ंिथती राहणार आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता शिवाजी महाराजांच्या तैलचित्राची मिरवणुक काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष घोडके, जिल्हाध्यक्ष लव्हाळे आदींनी केले आहे. शिवजयंती महोत्सव अध्यक्ष वलांडीकर, उपाध्यक्ष पाटील Latur News Monday, February 07, 2011 AT 05:00 AM (IST) लातूर (latur) - शहरातील पूर्व भागात सार्वजनिक शिव जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी मकबूल वलांडीकर व उपाध्यक्षपदी रवि पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - सचिव परमेश्र्वपर गुंडरे, ओम वाघमारे, नवाब शेख, सहसचिव शाम जाधव, संभाजी देडे, कार्याध्यक्ष शशिकांत स्वामी, कोषाध्यक्ष विनायक देडे यांची निवड करण्यात आली. पूर्व भागात सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्याच्या उद्देशाने झालेल्या बैठकीस व्यंकटराव आळणे, अतूल स्वामी, महादू गवळी, संदिप तेलगुंटे, जाफर शेख उपस्थित होते. | | शिवजयंती कार्यकारिणी जाहीर (Updated on 14/02/2011 23 : 12 IST) दहिफळ : कळंब तालुक्यातील दहिफळ येथे शिवजयंती कार्यकारणी जाहिर करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी अरुण दत्तात्रय भाजलवंडे यांची तर उपाध्यक्षपदी बालाजी दिगांबर मते यांची निवड करण्यात आली आहे. समितीच्या सदस्यपदी नितीन भातलवंडे, दिपक मते, जंगल आडागळे, जीवन भातलवंडे, प्रदिप मते, सुधाकर मते, फुलचंद पाटील, पप्पू गोरे, गणेश माते, तात्या भातलवंडे, शहाजी कदम, विवेक पाटील, अतुल गायकवाड, लाला लाटे यांची निवड करण्यात आली आहे. शिवजयंती निमित्त रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार असुन इच्छुकांनी योगराज पांचाळ व पांडूरंग मते यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. |
|
No comments:
Post a Comment