Sunday, February 19, 2012
बीड शिवजयंती २०१२

युगायुगाच्या अंध रुढीला दृष्टी लाभली भीमामुळे’ |
प्रतिनिधी । अंबाजोगाई |
सुखी संसाराची सोडूनी गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट व ‘युगायुगाच्या अंध रुढीला दृष्टी लाभली भीमामुळे’ यासह जुन्या व नव्या अवीट मराठी गीतांनी आनंद शिंदे यांची मैफल रंगली. रसिकांनीही त्याला भरभरून दाद दिली. अंबाजोगाई येथे शिवजन्मोत्सवानिमित्त 17 फेब्रुवारी रोजी वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात मराठीतील आघाडीचे व सुप्रसिद्ध गायक आनंद प्रल्हाद शिंदे यांच्या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. ढोलकी आणि तबल्याच्या जुगलबंदीने कार्यक्रमाला प्रारंभ झाल्यानंतर आनंद शिंदे यांनी वडील दिवंगत गायक प्रल्हाद शिंदे यांच्या आठवणी जागवल्या. या गीताने सुरुवात करून, ‘भीमरायाचा आम्हाला स्वाभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राची शान आहे’. तसेच विठ्ठल उमाप यांच्या ‘भीमाचे नाव विचारा तुम्ही आपल्या अंत:करणाला’, चंद्रकांत निरभवणे यांचे ‘शिवाजी जन्मला, हर हर महादेव बोला’, ‘आंबेडकरने हम दलितोंको इन्सान बनाया’ या गीतांबरोबरा ‘काय सांगू मेरी बरबादी गे; सुन मेरे आमिना दीदी’ या लोकगीताला उपस्थित तरुणांनी उत्स्फूर्त दाद दिली. ‘राजा राणीच्या जोडीला, पाच मजले माडीला; आहे कोणाचे योगदानं, सांगा कोणाचे योगदान लाल दिव्याच्या गाडीला’ या गीतालाही महिला आणि तरुणांनी वन्समोर दिला. मराठी लोकगीते, भीमगीते, शिवमहिना सांगणारी गीते आणि लोकप्रिय गीतांचा अनमोल नजराणा सादर करणार्या आनंद शिंदे आणि ग्रुपला रसिकांनी डोक्यावर घेतले. या वेळी सुनीता साळवे आणि बाल गायकांनी लोकप्रिय गीते सादर केली. प्रारंभी वकील संघाचे अध्यक्ष अँड. किशोर गिरवलकर, सरकारी अभियोक्ता ई.व्ही. चौधरी, अँड. खंदारे यांच्यासह विधी आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्यांचा रणजित लोमटे यांनी सत्कार केला. अँड. किशोर गिरवलकर म्हणाले ,हा उपक्रम अंबाजोगाईच्या सांस्कृतिक व सामाजिक परंपरेला साजेसा असून रणजित लोमटे आणि त्यांच्या सहकार्यांची प्रशंसा केली. जत मनोरजंन आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजनाने शहराच्या सौंदर्यात आणि वैचारिक योगदानात भर घातली आहे, असे ते म्हणाले. शिक्षण विस्तार अधिकारी एस.एस. बगाटे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित कविता सादर केली. |
औरंगाबाद शिवजयंती २०१२
शिवजयंतीनिमित्त आज भरगच्च् कार्यक्रम |
प्रतिनिधी । औरंगाबाद |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 382 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दुपारी 4.30 वाजता संस्थान गणपती येथून मिरवणुकीस प्रारंभ होईल. नवीन शहर शिवजयंती महोत्सव समितीतर्फे मोटारसायकल रॅली सकाळी 7.30 वाजता एन-4 येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून निघणार आहे. सकाळी 8 वाजता क्रांती चौक येथील महाराजांच्या पुतळ्यास जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात येईल. सकाळी 10 वाजता क्रांती चौकातून दुचाकी वाहन रॅली काढण्यात येईल. सकाळी 8.30 वाजता मुकुंदवाडी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवशाहीर लक्ष्मण मोकासरे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती एन-2 सिडकोच्या वतीने ठेवण्यात आला आहे. संस्थान गणपती येथून काढण्यात येणार्या मिरवणुकीत कोल्हापूर येथील युवा प्रतिष्ठान या पथकाद्वारे शिवकालीन कलेचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. मिरवणुकीत शंभर युवकांचे झांज पथक व तीन लेझीम पथके सहभागी होणार आहेत. छावा मराठा युवा संघटनेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुग्धाभिषेक, फळांचे वाटप, दुचाकी रॅली आणि सायंकाळी 6 वाजता गजानन मंदिर येथे देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. |
शिवजयंती कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी योगेश थोरात |
गाजगाव । नुकतीच गाजगाव येथे शिवजयंती उत्सव समितीची बैठक पार पडली. यात शिवजयंती कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी योगेश थोरात यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्ष -योगेश थोरात, उपाध्यक्ष-नितीन डोंगरे, सचिव-पुंडलिक पाटेकर, कोषाध्यक्ष-सुनील थोरात, संघटक- राहुल डोंगरे, कार्याध्यक्ष- गणेश |
अहमदनगर शिवजयंती २०१२
जिजाऊंनी शिवरायांना घडविले : महापौर शिंदे |
प्रतिनिधी । नगर |
आई जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांना घडविले. जिजामाताच शिवरायांच्या गुरू आणि मार्गदर्शिका आहेत. आईच्या चांगल्या संस्कारामुळे सर्व जातीधर्मांना सामावून घेऊन शिवरायांनी राज्य निर्माण केले. जिजाऊंच्या आदर्श विचारांचे आचरण सध्याच्या आईने करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महापौर शीला शिंदे यांनी केले. शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी नगरसेवक निखिल वारे, दिलीप सातपुते, माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले, नितीन शेलार, माधव मुळे, रार्जशी शितोळे, दशरथ शिंदे, जालिंदर बोरुडे, संगीता खरमाळे आदी उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त येथील भिस्तबाग चौक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मार्ग, सावेडी येथे दि. 17, 18 व 19 रोजी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवारी प्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा. र्शीमंत कोकाटे म्हणाले, भारतासारखा इतिहास इतर कुठल्याही देशाला नाही. समाजापुढे आपला इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. या देशात आतापर्यंत अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले आहेत. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फु ले यांनी हिराबाग, पुणे यैथे शिवजयंती सुरूकेली. बहुजन यांचा इतिहास वाचा म्हणजे या गोष्टी समजतील. |
Saturday, February 18, 2012
शिवजयंती २०१२ विशेष

राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंनी ज्या महामानवाला संस्काराचे, राजनीतीचे, सर्वधर्मसमभावाचे, लोकशाहीचे बाळकडू देऊन आई आणि गुरू या दोन्हींची भूमिका पार पाडली आणि या शिदोरीच्या जोरावर ज्या महामानवाने हजारो वर्षे गुलामगिरीच्या खाईत पडलेल्या समाजाला नवी दिशा दिली, असे बहुजनांचे उद्धारकर्ते, स्वराज्य संस्थापक, क्षत्रीयकुलवंशज छत्रपती शिवाजी महाराज यांची 382 वी जयंती आज संपूर्ण भारतामध्ये मोठय़ा उत्साहात साजरी होत आहे.
संपूर्ण भारताचा श्वास असलेल्या छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रात आत्मसन्मानाची आग पेटवत स्वराज्य घडवण्याचे महान असे कार्य केले. 382 हा आकडाच राजांच्या लोकप्रियतेची साक्ष देतो. 382 वष्रे उलटून गेली तरीही जनसामान्यांच्या मनात राजांबद्दल असलेले प्रेम, र्शद्धा, सन्मान यामध्ये तिळमात्र कमतरता आलेली नाही. उलट दिवसेंदिवस ते प्रेम वाढतच चाललेलं आहे. आज जगामध्ये शिवरायांच्या विचारांचा, वेगवेगळ्या संकटांत त्यांनी वापरलेल्या शिवतंत्राचा, त्यांनी निर्माण केलेल्या न्यायव्यवस्थेचा, प्रशासनव्यवस्थेचा, त्यांनी घालून दिलेल्या सवयी-शिस्तीचा अभ्यास करून गोरे लोक स्वत:चा व त्यांच्या राष्ट्राचा विकास करून घेत आहेत, पण आपल्या देशात ‘दिव्याखाली अंधार’ अशी परिस्थिती आहे. भारतभूमीत शिवरायांनी विजयाचे घोडे चौफेर उधळवले, र्मद मावळ्यांचा ‘हर हर महादेव’चा नारा आजही महाराष्ट्राच्या दर्याखोर्यांत घुमतो आहे. स्वराज्याचे 350 किल्ले आजही राजांच्या पराक्रमाची साक्ष देत खंबीर उभे आहेत, पण आज त्याच शिवरायांचे वारसदार, भक्त म्हणवून घेणार्या आम्हा भारतीयांना शिवरायांचे खरे विचार अजूनही कळू शकले नाहीत हे आमचं दुर्दैव.
छत्रपतींची व अफजलखानाची लढाई राजकीय अस्तित्वाची लढाई होती. त्यांचे वैर धार्मिक नसून राजकीय होते. शिवरायांचा कोणी खानदानी शत्रू नव्हता. त्यांचा फक्त एकच शत्रू होता, अन् तो म्हणजे स्वराज्याच्या जो आड येईल तो नंबर एकचा शत्रू. मग तो घरचा असो वा दारचा, कोणत्याही जातीचा असो, वा धर्माचा. त्याला वठणीवर आणल्याखेरीज शिवराय स्वस्थ बसत नसत.
शिवरायांकडे येणारा प्रत्येक माणूस हा जातीवर नव्हे, तर तो स्वराज्यासाठी किती उपयोगी आहे या कसोटीवर पारखला जायचा. राजाकडे अठरापगड जातींचे लोक गुण्यागोविंदाने राहायचे. शिवरायांनी या लोकांना इतका जीव लावला की, या लोकांनी शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी पाण्यासारखं रक्त वाहिलं. हाडांची काडं करून शिवरायांचे हात स्वराज्य उभारणीसाठी मजबूत केले. इतकं बंधूप्रेम छत्रपतींनी या मावळ्यांना दिलं होतं.
आज खरोखर आपण स्वत:ला शिवरायांचे भक्त, त्यांचे वारसदार मानत असू तर आज आपण एक निश्चय करूया की, शिवरायांना कधीच कोणत्या जातीच्या चौकटीत कोंडायचं नाही. कोणतीच जात शिवरायांच्या आड येता कामा नये. आपण जर खरे शिवभक्त असू तर छत्रपती शिवाजी महाराज कोणाची मक्तेदारी नाही हे ठणकावून सांगणं आपलं आद्य कर्तव्य असेल. शिवरायांचा कार्यकाळ जर बघितला तर इ. स. 1630 ते 1680 या 50 वर्षांच्या काळामध्ये शिवराय रात्रंदिवस झिजत राहिले. कोणासाठी? तर तुमच्या-आमच्यासाठी, जनतेच्या कल्याणासाठी, प्रत्येक जाती-धर्मांच्या लोकांना आपलं, स्वत:चं वाटेल असं स्वराज्य निर्माण करण्यासाठी.
शेवटी आपण सर्व तरुण मंडळी या शिवजयंतीनिमित्त एक पक्का संकल्प करूया, खर्या शिवचरित्राचा अभ्यास करून राष्ट्रीय एकतेचं प्रतीक असणार्या शिवरायांचे विचार आत्मसात करूया
नवा भारत घडवूया..।।
देश महासत्ता बनवूया..।।
-गणेश गिरणारे पाटील
वाशीम शिवजयंती २०१२
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने रविवारी शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती समितीचे सचिव व मराठा सेवा संघाचे केंद्रीय सदस्य सुभाष गायकवाड यांनी दिली. यानिमित्ताने वाशीम शहरातून मोटर सायकल फेरी व व्याख्याने होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची ३८३ वी जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यासाठी रविवारी दुपारी १२ वाजता येथील शिवाजी शाळेपासून मोटर सायकल फेरीचे प्रस्थान होणार आहे. या सदभावना फेरीस नगराध्यक्ष रेखा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक महादेव तांबडे हिरवी झेंडी दाखविणार आहेत.
ही फेरी शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गस्थ होऊन स्थानिक शिवाजी चौकात या फेरीची सांगता होणार आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्सव समितीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष बाळाभाऊ इन्नाणी राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून बुलढाणा येथील प्रा अनिल राठोड हे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व आजचा समाज’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार भावना गवळी, वाशीम जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा चौधरी, आमदार लखन मलीक, आमदार सुभाष झनक, माजी आमदार सुभाष ठाकरे, राजेंद्र पाटणी, अॅॅड. विजय जाधव, सुरेश इंगळे, भीमराव कांबळे, पुरुषोत्तम राजगुरू, पालिकेचे उपाध्यक्ष गंगूभाई बेनिवाले, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक राजू चौधरी, बाजार समितीचे सभापती भागवत कोल्हे, पंचायत समितीचे सभापती तुकाराम काकडे, तालुका खरेदी-विक्रीचे अध्यक्ष पांडूरंग महाले, देखरेख संघाचे अध्यक्ष दामोदर गोटे, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोक महाले, संभाजी ब्रिगेडचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अनिल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. दिलीप सरनाईक, मनसेचे जिल्हाप्रमुख राजू पाटील राजे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बाजड, कॉंग्रेस महिला आघाडीच्या उपाध्यक्ष डॉ अलका मकासरे, सुनील पाटील, रिपाईचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे, देवा इंगळे, पीरिपाचे जिल्हाध्यक्ष दौलत हिवराळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, उपविभागीय अधिकारी रमेश काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदेव आखरे, पालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे, पालिकेच्या सभापती कमल माने, लता उलेमाले, विद्या लाहोटी, मोतीराम तुपसांडे, नगरसेवक राजू वानखेडे, मोहम्मद जावेद आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास शहरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
जळगाव शिवजयंती २०१२
छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे पुरस्कार जाहीर
Thursday, February 9, 2012 AT 3:00 PM
Tags: chatrapati shivaji brigade
जळगाव- छत्रपती शिवाजी महाराज बहुजन मित्र पुरस्कार वितरण सोहळा व शंभुराजे या महानाट्याचा प्रयोग दि. १७ रोजी सायंकाळी ५.३० वा. आयोजीत करण्यात आला आहे.
समाजाच्या तळागळातील उपेक्षीत घटकांसाठी व महाराष्ट्राच्या ऐतिहासीक परंपरेसाठी कला साहित्य संस्कृतीच्या माध्यमातुन सतत कार्य करणार्या व्यक्तींना छत्रपती शिवाजी ब्रिगेडतर्फे छत्रपती शिवाजी महाराज बहुजन मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा छत्रपती शिवाजी महाराज बहुजन मित्र पूरस्कार प्रतापगडाची पूर्ण बांधणी व माराठयांच्या स्मृती व शौर्य स्थळांच्या सर्ंदभात अजोड कोष बनविने, मराठी इतिहास जिवंत करणारे प्रविण भोसले सांगली आणि पतसंस्थाच्या माध्यामातुन महाराष्ट्रभर कार्य करणारे महाराष्ट्रातील शेतकरी व शेतीपुरक उद्योगांना अर्थ सहाय्य करून हजारो शेतकरी गरीब व सर्व सामान्यांना जीवनात स्वाभिमानाने उभे करणारे राधेश्यामजी चांडक बुलढाणा यांना देण्यात येणार आहे. सदरचा कार्यक्रम व शभुराजे या महानाट्याचा प्रयोग बालगर्ंधव नाटयगृह येथे दि. १७ फुबु्रवारी २०१२ शुक्रवार रोजी सायंकाळी ५.३० वा. संपन्न होणार आहे. तसेच शिवजयंतीच्या निमित्ताने संधटनेच्या वतीने विविध ऐतिहासीक क शिवकालीन पद्धतीने शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात येतो. या सोहळ्यासाठी पद्मश्री ना.धो.महानोर विशेष महानिरीक्षक टी.एस. भाल मुंबई अप्पर जिल्हाधिकारी ठाणे कैलासराव जाधव पुण्याचे सहकार विभागाचे सहनिबधंक सुनिल पवार जळगाव पिपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील अप्पर जिल्हाधिकारी सोमनाथ गुजाळ पुरूषोत्तम निकम आर.टी.ओ. जळगाव यांचेसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असुन यासाठी आनंदराव मराठे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती जय्यत तयारी करीत आहे. शंभुराजे महानाटयासाठी विद्यार्थ्यांंना संभाजी राजांचा पराक्रमी इतिहास कळावा म्हणुन विशेष सवलत देण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला नाटय प्रेमी, शिवप्रेमी इतिहास प्रेमी रसीकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे मार्गदर्शक दादनेवे, डॉ. दिपक पाटील, डॉ. धनंजय बेदे, शशिकांत धांडे डॉ. स्नेहल फेगडे अर्जूनराव जगताप, दत्तात्रय पाटील, पंढरी पाटील, किरण देखने, रोशन मराठे, संजय आवटे, नितीन चौबे, आनदराव साळुंखे, रणजित मोरे, प्रा. संदिप पाटील, प्रमोद मोरे, यशवंत महाडीक, संजय काळे, गिरीष मिस्त्री, मनोज पाटील, महेश पाटील, अमित पाटील, विजय पाटील, डॉ. गणेश पाटील, यांनी केले आहे.
सोलापूर शिवजयंती २०१२
|
लातूर शिवजयंती २०१२
मुस्लिम बांधव साजरी करणार शिवजयंती औसा येथील आदर्श उदाहरण
लातूर। दि. १८ (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात ५७ टक्के मुस्लिम सैनिक होते. चार अंगरक्षक, तोफखाना प्रमुख, आरमार प्रमुख, अशा महत्वाच्या पदावरही मुस्लिम सैनिक होते. त्यामुळे औश्यात मुस्लिम समाजबांधवांकडून शिवजयंती साजरी करण्यात येत असल्याची माहिती मुस्लिम समाज सार्वजनिक शिवजयंती महोत्सव औसाचे कार्याध्यक्ष रियाज पटेल यांनी लातूर येथे शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
मुस्लिम समाज सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने औसा येथे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता औसा बसस्थानकासमोर ध्वजारोहण व प्रतिमा पूजन करण्यात येईल. २0 रोजी सायंकाळी ७ वाजता नागपूर येथील प्रा. जावेद पाशा यांचे ‘बहुजनांच्या कल्याणासाठी शिवराज्य’ या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. मुजाहीद शरिफ राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून मोहसीन खान, अँड. गोविंद सिरसाठ, खुशालराव जाधव,कामाजी पवार उपस्थित राहणार असल्याचे रियाज पटेल म्हणाले. पत्रपरिषदेस अँड. शहानवाज पटेल, अँड. फेरोज पठाण, मुजफ्फरअली इनामदार, सुलतान बागवान, ईस्माईल शेख, हकिम बागवान, माजीद काझी, चाँद पटेल उपस्थित होते.
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव
Updated on : 11/02/2012 23 : 6
प्रतिनिधी उदगीर : प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८२ वी जयंती दि.१९ फेब्रुवारी २०१२ रोजी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील एकंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात येणार आहे. गेल्या पाच वर्षापासून शिवजयंतीचे आयोजन करण्यात येत असून मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी वेशभूषा, पोवाडे, शिवजयंतीवर आधारीत गीते सादर केली जाणार आहेत. कार्यक्रमात उंट, घोडे, लेझिमपथक, झांज पथक, झेंडा पथक, वासुदेव, आराधी, गोंधळी, पोतराज मसनजोगी यांचा सहभागाने देखाव्यासह शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. उदगीर शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, तांत्रिक प्रशिक्षण संस्था, संगीत विद्यालय यांनी सहभागी होण्याचे आवाहन शिवजयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रा.व्ही.एस. कणसे यांनी केले आहे.
रत्नागिरी शिवजयंती २०१२
चिपळूण |
पुणे शिवजयंती २०१२

म. टा. प्रतिनिधी पुणे शिवजयंतीनिमित्त रविवारी (१९) शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. संत कबीर चौक ते सोन्या मारुती चौकापर्यंतची वाहतूक मिरवणूक संपेर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच मिरवणूक मार्गालगतच्या शंभर फूट परिसरात वाहने उभी करण्यास बंदी आहे. सकाळी आठ वाजल्यापासून हा बदल करण्यात येणार आहे. मिरवणूक संपेपर्यंत वाहनचालकांनी अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी केले आहे. शहरातील मुख्य मिरवणुकीला भवानी पेठेतील भवानीमाता मंदिरापासून दुपारी चार वाजता प्रारंभ होणार आहे. त्यामुळे संत कबीर चौक, अरुणा चौक, डुल्या मारुती चौक, तांबोळी मशीद चौक, फडके हौद चौक, जिजामाता उद्यान, शिवाजी रोड या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. तसेच; हमाल पंचायत, अल्पना टॉकीज, सिटी पोस्ट चौक हा मार्गही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. लष्कर परिसरातील पूना कॉलेज, मिरवणूक शिवाजी पुतळा चौकात जाणार आहे. त्यामुळे मार्गावराील वाहतूक बंद राहणार आहेत. तसेच पूना कॉले, हरकानगर, जुना मोटार स्टॅण्ड हा मागही बंद ठेवण्यात येणार आहे. |

छत्रपति शिवाजी महाराजांची पालखी यात्रा"(वर्ष दुसरे)
दि.३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी २०१२.
"किल्ले शिवनेरी"ते"शिवतीर्थ किल्ले रायगड"
देशातील शिवरायांची पहिली (धारकरयाची) वारी
"राजाश्रयाविराज ित, सकलगुणमंडळीत, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराजाधिराज महाराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय"
शुक्रवार ३ फेबृ.२०१२
वेळ स्थळ कार्यक्रम / वैशिष्ट्ये:
स. ६.०० दत्त मंदिर (हॉल) जुन्नर सकाळचा नास्ता व चहा
स. ६.३० शिवजन्म स्थान शिवनेरी किल्ला अभिषेक राज्यातील ४०० गडावरून आणलेल्या तसेच बारा ज्योतिर्लिंग व अष्टविनायक येथून आणलेल्या पवित्र जलाने अभिषेक सोहळा
स. ८.०० श्री. शिवछत्रपती महा विद्यालय जुन्नर व्याख्यान : छत्रपती शिवरायाचे मावळे व्याख्याते:ह भ प रोहिदास हांडे महाराज
स. ९.३० जयहिंद प्लॉलीटेक्निक कॉलेज मर्दानी खेळ कार्यक्रम स. १०.३० नारायणगाव पालखीचे नारायण गाव येथे आगमन स. १०.४० नारायणगाव बसस्थानक शिवकालीन युद्ध प्रात्यक्षिके दु. १२.०० मंचर पालखीचे मंचर येथे आगमन दु. १२.१० विघ्नहर मंगल कार्यालय मंचर भोजन
दु. १.३० छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर व्याख्यान : छत्रपती शिवरायाची दुरदुष्टी व्याख्याते:श्री रमेश शिंदे (हिंदू जनजागृती समिती प्रवक्ते )
दु. ३.०० कृषी उत्पन बाजार समिती खेड व्याख्यान : विषय राजमाता जिजाऊ
व्याख्याते:ह भ प कांचनताई नेहरे
सां ६.०० संग्रामदुर्ग किल्ला(चाकण)
व्याख्यान : छत्रपती शिवरायांचा आठवावा प्रताप
व्याख्याते: प्रा.मोहन शेटे (इतिहास संशोधक)
सां ८.३0 आळंदी येथे आगमन रात्री ८.४५ राट्रीय रेड्डी वलंम संस्था,आळंदी भोजन रात्री ९.३० राट्रीय रेड्डी वलंम संस्था,आळंदी शिवभक्तांचा विविध गुण दर्शनाचा कार्यकम व मुक्काम
शनिवार ४ फेबृ.२०१२
वेळ स्थळ कार्यक्रम / वैशिष्ट्ये:
स. ७ ०० राट्रीय रेड्डी वलंम संस्था,आळंदी सकाळचा नास्ता व चहा
स. ७ ३० आळंदी ज्ञानेश्वर माउलीच्या पादुकांचे दर्शन
स. ९.०० देहूगाव मोशी मार्ग पालखीचे देहू येथे आगमन व जगदगुरु श्री. तुकाराम महाराज यांच्या पादुका दर्शन
स. १०.०० बजाज मेटेरियल गेट,यमुनानगर पालखीचे आगमन स. १०.३० भक्ती - शक्ती चौक निगडी पालखीचे भक्ती - शक्ती आगमन स. १०.४० भक्ती - शक्ती उद्यान शिवकालीन युद्ध प्रात्यक्षिके स ११ .३० निगडी पालखीचे निगडी येथे आगमन स. ११.४५ आकुर्डी पालखीचे आकुर्डी येथे आगमन दु. १२.०० चिंचवड स्टेशन पालखीचे चिंचवड स्टेशन येथे आगमन दु. १२.०५ चिंचवड ते आंबेडकर पुतळा छत्रपती शिवरायांच्या पालखीची भव्य मिरवणूक दु १.०० आंबेडकर पुतळा, पिंपळी चौक पालखीचे पिंपळी येथे आगमन दु १.१५ एच. ए कॉलनी पिंपळी पालखीचे एच. ए कॉलनी येथे आगमन दु १.२५ ऑफिसर क्लब एच. ए कॉलनी भोजन दु २.३० कासारवाडी पालखीचे कासारवाडी येथे आगमन दु ३.०० दापोडी मर्दानी खेळ सां ४.०० वाकडेवाडी मर्दानी खेळ सां ५ .०० जंगली महाराज मार्ग छ. संभाजी चौक छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण
सां ७ .३० विठ्ठल मंदिर मनपा शाळेजवळ कर्वेवाडी व्याख्यान : छत्रपती शिवरायांचे प्रशासन व आजचे शासन व्याख्याते: श्री.बी.जे.कोळस े पाटील (मा. न्यायमूर्ती ) रात्री ९.५० विठ्ठल मंदिर कर्वेवाडी भोजन व मुक्काम
रविवार ५ फेबृ.२०१२
वेळ स्थळ कार्यक्रम / वैशिष्ट्ये:
स. ७ ३० विठ्ठल मंदिर कर्वेवाडी सकाळचा नास्ता व चहा स. ८ .०० कोथरूड वरून प्रस्तान चांदणी चौक मार्गे शिंदेवाडी स. ९ .३० शिंदेवाडी शिंदेवाडीत आगमन व मर्दानी खेळ स. ११ ०० पौंड पौंड येथे आगमन व शाहिरी कार्यक्रम दु. १२ .३० शेरे पालखीचे शेरे येथे आगमन दु १ .०० शेरे भोजन दु. २.०० शेरे शाहिरी कार्यक्रम सां ६ .३० निजामपूर पालखीचे निजामपूर येथे आगमन मर्दानी खेळ सां ७ .३० मानगाव पालखीचे मानगाव येथे आगमन
रात्री ८.०० अशोक दादा साबळे विद्यालय व्याख्यान :अपरिचित छत्रपती शिवराय व्याख्याते:श्री रवींद्र यादव (इतिहास संशोधक)
रात्री १०.०० अशोक दादा साबळे विद्यालय भोजन
सोमवार ६ फेबृ.२०१२
वेळ स्थळ कार्यक्रम / वैशिष्ट्ये:
स. ७ ०० अशोक दादा साबळे विद्यालय सकाळचा नास्ता व चहा स. ७ ३० मानगाव छत्रपती शिवरायांच्या पालखीचे भव्य मिरवणूक स. ९ .३० अशोक दादा साबळे विद्यालय मर्दानी खेळ स. ११ ३० लोणेरे पालखीचे लोणेरे येथे आगमन स. ११ ४० लोणेरे युद्ध प्रात्यक्षिके दु. १ .०० महाड पालखीचे महाड येथे आगमन दु १ .१५ जाकमाता मंदिर ते शिवाजी चौक भोजन दु. २.ते ४ जाकमाता मंदिर ते शिवाजी चौक पालखी विश्रांती सां. ४ .ते ६ जाकमाता मंदिर ते शिवाजी चौक छत्रपती शिवरायांच्या पालखीचे भव्य मिरवणूक
सां ६ .३० महादेव मंदिर महाड
व्याख्यान : पानिपतचा रणसंग्राम
व्याख्याते:श्री पांडुरंग बलकवडे (इतिहास संशोधक)
रात्री ९ .०० पाचाड पालखीचे पाचाड येथे आगमन रात्री ९ .३० पाचाड भोजन व मुक्काम रात्री १० .३० पाचाड जागरण गोंधळ कार्यक्रम
मंगळवार ७ फेबृ.२०१२
वेळ स्थळ कार्यक्रम / वैशिष्ट्ये:
स. ७ ३० पाचाड सकाळचा नास्ता व चहा
स. ७ .४५ जिजाऊ स्मारक,पाचाड राजमाता जिजाऊच्या मूर्तीचे दर्शन
स. ०८.०० छत्रपती शिवरायांच्या पालखीचे रायगडाकडे प्रस्तान
स. १० ३० किल्ले रायगड गडावरील शिवरायांचा मूर्तीला राज्याभिषेक
स. ११ .३० होळीचा माळ रायगड शिवकालीन मर्दानी प्रात्यक्षिके दु १२.३० होळीचा माळ रायगड जागरण गोंधळ दु. १.३० किल्ले रायगड भोजन दु. २ .३० आभार व शिवरथ यात्रेचा समारोप..
"बहुत काय लिहावे, अगत्य येण्याचे करावे"_____________________________शिव जयंती महोत्सव-२०१२ वजनकल्याण स्वयंसेवी पुरस्कार २०१२दिनांक : १९ फेब्रुवारी २०१२स्थळ: शिव छत्रपती क्रिडा संकुल, म्हाळुंगे, ता.मुळशी, जि.पुणे- ४११०४५उद्घाटक
मा. छत्रपती उदयनराजे भोसले(खासदार)
___________________________________________________
मराठा लायन्स
|| सन्मान मराठीचा … अभिमान महाराष्ट्राचा ||
श्री शिवजयंती कार्यक्रम २०१२
१९ फेब्रु. २०१२
“प्रेरणा ज्योत” सिंहगड ते भारती विद्यापीठ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा.
१९ फेब्रु. २०१२
सकाळी ९ वाजता – शिव मूर्ती पुजन
सायंकाळी ७ वाजता : दीपोत्सव – छत्रपती शिवजी महाराज पुतळा भारती विद्यापीठ, पुणे.
२२ फेब्रु. २०१२
श्री शिवजयंती व्याख्यान
वक्ते : प्रा. नामदेराव जाधव
( राष्ट्रामाता जिजाऊ साहेब यांचे वंशज, सुप्रसिद्ध इतिहास संशोधक)
वेळ : सकाळी १० वाजता स्थळ : मेडिकल ऑडिटोरीयम, भारती विद्यापीठ, पुणे – ४३
दि.३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी २०१२.
"किल्ले शिवनेरी"ते"शिवतीर्थ किल्ले रायगड"
देशातील शिवरायांची पहिली (धारकरयाची) वारी
"राजाश्रयाविराज ित, सकलगुणमंडळीत, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराजाधिराज महाराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय"
शुक्रवार ३ फेबृ.२०१२
वेळ स्थळ कार्यक्रम / वैशिष्ट्ये:
स. ६.०० दत्त मंदिर (हॉल) जुन्नर सकाळचा नास्ता व चहा
स. ६.३० शिवजन्म स्थान शिवनेरी किल्ला अभिषेक राज्यातील ४०० गडावरून आणलेल्या तसेच बारा ज्योतिर्लिंग व अष्टविनायक येथून आणलेल्या पवित्र जलाने अभिषेक सोहळा
स. ८.०० श्री. शिवछत्रपती महा विद्यालय जुन्नर व्याख्यान : छत्रपती शिवरायाचे मावळे व्याख्याते:ह भ प रोहिदास हांडे महाराज
स. ९.३० जयहिंद प्लॉलीटेक्निक कॉलेज मर्दानी खेळ कार्यक्रम स. १०.३० नारायणगाव पालखीचे नारायण गाव येथे आगमन स. १०.४० नारायणगाव बसस्थानक शिवकालीन युद्ध प्रात्यक्षिके दु. १२.०० मंचर पालखीचे मंचर येथे आगमन दु. १२.१० विघ्नहर मंगल कार्यालय मंचर भोजन
दु. १.३० छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर व्याख्यान : छत्रपती शिवरायाची दुरदुष्टी व्याख्याते:श्री रमेश शिंदे (हिंदू जनजागृती समिती प्रवक्ते )
दु. ३.०० कृषी उत्पन बाजार समिती खेड व्याख्यान : विषय राजमाता जिजाऊ
व्याख्याते:ह भ प कांचनताई नेहरे
सां ६.०० संग्रामदुर्ग किल्ला(चाकण)
व्याख्यान : छत्रपती शिवरायांचा आठवावा प्रताप
व्याख्याते: प्रा.मोहन शेटे (इतिहास संशोधक)
सां ८.३0 आळंदी येथे आगमन रात्री ८.४५ राट्रीय रेड्डी वलंम संस्था,आळंदी भोजन रात्री ९.३० राट्रीय रेड्डी वलंम संस्था,आळंदी शिवभक्तांचा विविध गुण दर्शनाचा कार्यकम व मुक्काम
शनिवार ४ फेबृ.२०१२
वेळ स्थळ कार्यक्रम / वैशिष्ट्ये:
स. ७ ०० राट्रीय रेड्डी वलंम संस्था,आळंदी सकाळचा नास्ता व चहा
स. ७ ३० आळंदी ज्ञानेश्वर माउलीच्या पादुकांचे दर्शन
स. ९.०० देहूगाव मोशी मार्ग पालखीचे देहू येथे आगमन व जगदगुरु श्री. तुकाराम महाराज यांच्या पादुका दर्शन
स. १०.०० बजाज मेटेरियल गेट,यमुनानगर पालखीचे आगमन स. १०.३० भक्ती - शक्ती चौक निगडी पालखीचे भक्ती - शक्ती आगमन स. १०.४० भक्ती - शक्ती उद्यान शिवकालीन युद्ध प्रात्यक्षिके स ११ .३० निगडी पालखीचे निगडी येथे आगमन स. ११.४५ आकुर्डी पालखीचे आकुर्डी येथे आगमन दु. १२.०० चिंचवड स्टेशन पालखीचे चिंचवड स्टेशन येथे आगमन दु. १२.०५ चिंचवड ते आंबेडकर पुतळा छत्रपती शिवरायांच्या पालखीची भव्य मिरवणूक दु १.०० आंबेडकर पुतळा, पिंपळी चौक पालखीचे पिंपळी येथे आगमन दु १.१५ एच. ए कॉलनी पिंपळी पालखीचे एच. ए कॉलनी येथे आगमन दु १.२५ ऑफिसर क्लब एच. ए कॉलनी भोजन दु २.३० कासारवाडी पालखीचे कासारवाडी येथे आगमन दु ३.०० दापोडी मर्दानी खेळ सां ४.०० वाकडेवाडी मर्दानी खेळ सां ५ .०० जंगली महाराज मार्ग छ. संभाजी चौक छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण
सां ७ .३० विठ्ठल मंदिर मनपा शाळेजवळ कर्वेवाडी व्याख्यान : छत्रपती शिवरायांचे प्रशासन व आजचे शासन व्याख्याते: श्री.बी.जे.कोळस े पाटील (मा. न्यायमूर्ती ) रात्री ९.५० विठ्ठल मंदिर कर्वेवाडी भोजन व मुक्काम
रविवार ५ फेबृ.२०१२
वेळ स्थळ कार्यक्रम / वैशिष्ट्ये:
स. ७ ३० विठ्ठल मंदिर कर्वेवाडी सकाळचा नास्ता व चहा स. ८ .०० कोथरूड वरून प्रस्तान चांदणी चौक मार्गे शिंदेवाडी स. ९ .३० शिंदेवाडी शिंदेवाडीत आगमन व मर्दानी खेळ स. ११ ०० पौंड पौंड येथे आगमन व शाहिरी कार्यक्रम दु. १२ .३० शेरे पालखीचे शेरे येथे आगमन दु १ .०० शेरे भोजन दु. २.०० शेरे शाहिरी कार्यक्रम सां ६ .३० निजामपूर पालखीचे निजामपूर येथे आगमन मर्दानी खेळ सां ७ .३० मानगाव पालखीचे मानगाव येथे आगमन
रात्री ८.०० अशोक दादा साबळे विद्यालय व्याख्यान :अपरिचित छत्रपती शिवराय व्याख्याते:श्री रवींद्र यादव (इतिहास संशोधक)
रात्री १०.०० अशोक दादा साबळे विद्यालय भोजन
सोमवार ६ फेबृ.२०१२
वेळ स्थळ कार्यक्रम / वैशिष्ट्ये:
स. ७ ०० अशोक दादा साबळे विद्यालय सकाळचा नास्ता व चहा स. ७ ३० मानगाव छत्रपती शिवरायांच्या पालखीचे भव्य मिरवणूक स. ९ .३० अशोक दादा साबळे विद्यालय मर्दानी खेळ स. ११ ३० लोणेरे पालखीचे लोणेरे येथे आगमन स. ११ ४० लोणेरे युद्ध प्रात्यक्षिके दु. १ .०० महाड पालखीचे महाड येथे आगमन दु १ .१५ जाकमाता मंदिर ते शिवाजी चौक भोजन दु. २.ते ४ जाकमाता मंदिर ते शिवाजी चौक पालखी विश्रांती सां. ४ .ते ६ जाकमाता मंदिर ते शिवाजी चौक छत्रपती शिवरायांच्या पालखीचे भव्य मिरवणूक
सां ६ .३० महादेव मंदिर महाड
व्याख्यान : पानिपतचा रणसंग्राम
व्याख्याते:श्री पांडुरंग बलकवडे (इतिहास संशोधक)
रात्री ९ .०० पाचाड पालखीचे पाचाड येथे आगमन रात्री ९ .३० पाचाड भोजन व मुक्काम रात्री १० .३० पाचाड जागरण गोंधळ कार्यक्रम
मंगळवार ७ फेबृ.२०१२
वेळ स्थळ कार्यक्रम / वैशिष्ट्ये:
स. ७ ३० पाचाड सकाळचा नास्ता व चहा
स. ७ .४५ जिजाऊ स्मारक,पाचाड राजमाता जिजाऊच्या मूर्तीचे दर्शन
स. ०८.०० छत्रपती शिवरायांच्या पालखीचे रायगडाकडे प्रस्तान
स. १० ३० किल्ले रायगड गडावरील शिवरायांचा मूर्तीला राज्याभिषेक
स. ११ .३० होळीचा माळ रायगड शिवकालीन मर्दानी प्रात्यक्षिके दु १२.३० होळीचा माळ रायगड जागरण गोंधळ दु. १.३० किल्ले रायगड भोजन दु. २ .३० आभार व शिवरथ यात्रेचा समारोप..
"बहुत काय लिहावे, अगत्य येण्याचे करावे"

|| सन्मान मराठीचा … अभिमान महाराष्ट्राचा ||
१९ फेब्रु. २०१२
“प्रेरणा ज्योत” सिंहगड ते भारती विद्यापीठ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा.
१९ फेब्रु. २०१२
२२ फेब्रु. २०१२
वक्ते : प्रा. नामदेराव जाधव
( राष्ट्रामाता जिजाऊ साहेब यांचे वंशज, सुप्रसिद्ध इतिहास संशोधक)
________________________________________________
|| भव्य शिवजयंती महोत्सव ||
Venue : स्थळ:- मु. पो. उंबरे(शिव भूमी), ता. भोर, जि. पुणे.
Created By : Ganesh Raje
|| भव्य शिवजयंती महोत्सव ||
(रविवार, दि. १९ फेब्रुवारी २०१२.)
स्थळ:- मु. पो. उंबरे(शिव भूमी), ता. भोर, जि. पुणे.
सर्व शिवभक्तांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे कि,
सालाबादप्रमाणे यंदाही १२ गाव मावळातील "हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान" आणि "श्री भैरवनाथ तरुण मित्र मंडळ - उंबरे" यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवरायांच्या ३८२ व्या जयंती निमित्त भव्य महोत्सव आयोजित केला आहे.
या महोत्सवाअंतर्गत "किल्ले अजिंक्यतारा - सातारा" येथून दिमाखात आणि वाजत गाजत शिवज्योत आणली जाणार आहे.
त्याचप्रमाणे, शिवप्रतिमेचे पूजन आणि भव्य-दिव्य मिरवणूक होणार आहे.
तरी सर्व शिवप्रेमींनी या महोत्सवात सहभागी होऊन शिवरायांना विश्वव्यापक बनवावे,
हि नम्र विनंती......
|| १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करूया, छत्रपती शिवरायांना विश्वव्यापक बनवूया ||
"जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय"
आयोजक:-
"हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान."
"श्री भैरवनाथ तरुण मित्र मंडळ - उंबरे."
संपर्क:-
गणेशराजे खुटवड (पाटील) - ९५४५९५२४२९.
समीर खुटवड (पाटील) - ९८५०८१५२३१.
तुषार पवार - ८६०५४२७४१५.
सचिन(पप्पू) मोरे - ९६३७१५५२०५.
राहुल खुटवड (पाटील) - ९७६७९०२०३१.
सचिन कांबळे - ९९२२२३२०८७.