Sunday, February 19, 2012

औरंगाबाद शिवजयंती २०१२

शिवजयंतीनिमित्त आज भरगच्च् कार्यक्रम

प्रतिनिधी । औरंगाबाद

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 382 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दुपारी 4.30 वाजता संस्थान गणपती येथून मिरवणुकीस प्रारंभ होईल.

नवीन शहर शिवजयंती महोत्सव समितीतर्फे मोटारसायकल रॅली सकाळी 7.30 वाजता एन-4 येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून निघणार आहे. सकाळी 8 वाजता क्रांती चौक येथील महाराजांच्या पुतळ्यास जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात येईल. सकाळी 10 वाजता क्रांती चौकातून दुचाकी वाहन रॅली काढण्यात येईल. सकाळी 8.30 वाजता मुकुंदवाडी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवशाहीर लक्ष्मण मोकासरे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती एन-2 सिडकोच्या वतीने ठेवण्यात आला आहे. संस्थान गणपती येथून काढण्यात येणार्‍या मिरवणुकीत कोल्हापूर येथील युवा प्रतिष्ठान या पथकाद्वारे शिवकालीन कलेचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. मिरवणुकीत शंभर युवकांचे झांज पथक व तीन लेझीम पथके सहभागी होणार आहेत. छावा मराठा युवा संघटनेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुग्धाभिषेक, फळांचे वाटप, दुचाकी रॅली आणि सायंकाळी 6 वाजता गजानन मंदिर येथे देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

शिवजयंती कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी योगेश थोरात

गाजगाव । नुकतीच गाजगाव येथे शिवजयंती उत्सव समितीची बैठक पार पडली. यात शिवजयंती कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी योगेश थोरात यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्ष -योगेश थोरात, उपाध्यक्ष-नितीन डोंगरे, सचिव-पुंडलिक पाटेकर, कोषाध्यक्ष-सुनील थोरात, संघटक- राहुल डोंगरे, कार्याध्यक्ष- गणेश
डोंगरे, नियंत्रण अध्यक्ष- सचिन डोंगरे, सदस्य - गणेश थोरात, भारत गवळी, मुकेश धुमाळ, सुरेश पाटेकर, रमेश डोंगरे, सुरेश यवले, साईनाथ रावते, आदींची निवड करण्यात आली.

No comments: