Wednesday, December 30, 2009

शिवजयंती

शिवजयंती उत्साहात साजरी
सकाळ वृत्तसेवा
Feb 19 2009 AT 9:03 PM

छत्रपती शिवाजीमहाराजांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.

पुणे- छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहर व परिसरात विविध कार्यक्रम आयोजिण्यात आले होते.
"अखिल भवानी पेठ शिवजयंती उत्सव समिती'तर्फे शाहिरांनी विविध पोवाडे सादर केले.
शाहीर दादा पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. या वेळी शिवपालखी काढण्यात आली. अभिनेते उदयन काळे यांनी संत तुकाराममहाराज यांच्या वेशभूषेत तुकारामांचे अभंग गायिले.
अखिल रास्ता पेठ मराठा मित्रमंडळातर्फे नंदकुमार लोणकर यांनी शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. मंडळाचे अध्यक्ष उमेश शेडगे, उपाध्यक्ष अनिकेत शेळके या वेळी उपस्थित होते. स्वराज मित्र मंडळातर्फे "पुरंदर ते भांडूप'(ठाणे) ज्योतयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहर एनएसयूआयचे अध्यक्ष ऍड. राहुल म्हस्के यांच्या हस्ते यात्रेला प्रारंभ झाला. मंडळाचे अध्यक्ष दिलीप घोरपडे या वेळी उपस्थित होते. सिंहगड प्रतिष्ठानतर्फे सिंहगडावर जन्मोत्सव साजरा करण्यात आला. डोणजे फाटा ते गोळेवाडी चौकदरम्यान मिरवणूक काढण्यात आली. शिवप्रेमी तरुण मित्र मंडळातर्फे मिरवणूक काढण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष अमोल लाड, श्रीकांत कड या वेळी उपस्थित होते.
"भगवं वादळ प्रतिष्ठान'तर्फे रक्तदान शिबिर व किल्लेप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर जाधव यांनी हा कार्यक्रम आयोजिला. "मेहतर-बाल्मीकी युवा मंचा'तर्फे बंडू उमंदे यांनी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. मंचाचे प्रमुख नरेश जाधव या वेळी उपस्थित होते.
निंबाळकर तालीम गणेश मंडळ व चिमण्या गणपती गणेश मंडळांनी सजावट केलेल्या शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला श्रीगोपाळ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी हार अर्पण केला. मुख्याध्यापिका विशाखा भुरके या वेळी उपस्थित होत्या.
"क्रांतिवीर लहुजी शक्ती सेने'तर्फे प्रदेशाध्यक्ष शंकर तडाखे यांनी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. शहराध्यक्ष निरंजन गायकवाड, उपाध्यक्ष रामदास साळवे या वेळी उपस्थित होते. पुणे समाजसेवा केंद्रातील मुलांना आर्थिक मदत करण्यात आली

No comments: