Wednesday, December 30, 2009

19 फेब्रुवारी पुणे

राज्यभरात आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होतेय. तसंच शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली जाते. इथल्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ उपस्थित रहाणार आहेत.
सरकारनं लोकसभा निवडणुकांपूर्वी मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही तर शिवजयंतीला मुख्यमंत्र्यांना शिवनेरी किल्ल्यावर पाय ठेवू देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षणाची मागणी करणा-या संघटनांनी दिला होता. यापार्श्वभूमीवर शिवनेरीवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


दरम्यान सकाळी शिवजयंतीचा मुहूर्तसाधून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिवनेरीवर गोंधळ घातला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यात एस.पी. रवींद्र कदम आणि ऍडिशनल एस.पी. अशोक मोराळे यांच्यासह 10 पोलिस जखमी झाले. त्याचवेळी अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांच हेलिकॉप्टर शिवनेरीवर घिरट्या घालत होत.त्यामुळे हेलिपॅडची सुरक्षा वाढवण्यात आली. यावेळी सौम्य लाठीमारही करण्यात आलं.पण शांततेच्या आव्हानानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी थांबवली. आता शिवनेरीवरचं वातावरण निवळलं असून मुख्य कार्यक्रम सुरू आहे.


शिवजयंती निमित्त 19 रोजी विविध कार्यक्रम शिवछत्रपती बहुजन मित्र पुरस्कार डॉ.येवले, जाधव यांना जाहीर
जळगाव, (प्रतिनिधी)-
जळगाव, छत्रपती शिवाजी महाराजांची 379 वी जयंती 19 फेब्रुवारी रेजी साजरी होत आहे. हा शिवजयंती सोहळा छत्रपती शिवाजी ब्रिगेडतर्फे यावर्षी देखील विविध कार्यक्रम आयोजीत करुन आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, शिवचरितकार दादा नेवे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.जळगाव, (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांची 379 वी जयंती 19 फेब्रुवारी रेजी साजरी होत आहे. हा शिवजयंती सोहळा छत्रपती शिवाजी ब्रिगेडतर्फे यावर्षी देखील विविध कार्यक्रम आयोजीत करुन आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, शिवचरितकार दादा नेवे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शिवजयंती निमित् दि. 17 फेब्रुवारी रोजी शिवतीर्थ मैदानावर 3000 विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक ते साहित्य मोफत पुरविले जाणार आहे. 19 रोजी स. 11 वा. शिवतीर्थ मैदानावरील छत्रपतीच्या पुतळ्याला माल्यार्पण, मानवंदना सोबतच शहरातील 251 सुवासीनी मराठमोठ्या वेशभुषेत शिवप्रभुच्या पुतळ्याचे औक्षण करतील. ‘स्टार प्रवाह’ वाहीनीवरील राजा शिवछत्रपती मालेकेतील स्फुर्तीदायी प्रसंगाचे भव्य डिजीटल बॅनरचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात येणार आहे. शिवछत्रपती बहूजन मित्र पुरस्कार जाहिर जलदिंडी प्रतिष्ठानाचे अध्यक्ष डॉ.विश्वास येवले (पुणे), गेल्या 1200 वर्षातील विविध शस्त्रे संग्रहीत करणारे कोल्हापुरचे गिरीष जाधव हे छत्रपती बहूजन मित्र पुरस्काराचे मानकरी ठरले असून लवकरच त्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच एप्रिलमध्ये शस्त्र प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवजयंती सोहळ्यात जास्तीत जास्त शिवप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी केले. पत्रकार परिषदेत डॉ.धनंजय बेंद्रे, अर्जुनराव जगताप, प्रमोद मोरे, प्रा.संदीप पाटील, डॉ.मंगेश पाटील उपस्थित होते.

पनवेलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
20 February 2009 10:41:38
पनवेल
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पनवेलमध्ये गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये आमदार विवेक पाटील, पनवेल नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत ठाकूर, सर्वपक्षीय नगरसेवक व अधिकारी सहभागी झाले होते. पनवेलमधील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती या मिरवणुकीचे वैशिष्टय़ ठरले. रोटरी सर्कल येथील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला आमदार पाटील व नगराध्यक्ष ठाकूर यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर या मिरवणुकीला सुरुवात झाली. विविध शाळांचे चित्ररथ, छत्रपतींच्या जीवनावर आधारित देखावे, लेझीम पथके यामुळे मिरवणुकीत चैतन्य पसरले होते. ही मिरवणूक टपाल नाक्यावरील छत्रपतींच्या अर्धपुतळ्याजवळ विसर्जित झाली. यावेळी आमदार पाटील व अन्य नेत्यांनी शिवप्रेमींना संबोधित केले.

No comments: